जगातील सर्वात जास्त ताकदवर देश तसेच सर्वात जास्त प्रगतीशील देश म्हटले कि अमेरिका या देशाचे नाव प्रथम घेतले जाते. क्रिस्टोफर कोलंबस याने १४९२ मध्ये अमेरिका देशाचा शोध लावला. त्याने १४९२ मध्ये भारताकडे जाणारे मार्ग शोधण्यासाठी समुद्री यात्रा सुरु केली.
पहिले दोन आठवडे त्याला कोठेही भूभाग नजरेस नाही आला. आणि जेंव्हा त्यानंतर त्याने जमिनीवर पाय ठेवले त्याला वाटले त्याने भारताचा शोध लावला परंतु तो भारत नसून अमेरिका होता आणि अश्या प्रकारे अमेरिका देशाचा शोध लागला. अमेरिकेला “संयुक्त राज्य अमेरिका (United State Of America)” या नावाने देखील ओळखले जाते, हे नाव थोमास पेन यांनी सुचविले होते आणि ४ जुलै १७७६ च्या स्वतंत्र घोषणापत्रात संपूर्ण अधिकाराने नोंद करण्यात आले.
अमेरिकेने चंद्रावर पहिले पाउल टाकण्यासोबातच इतर अनेक असे इतिहास रचले आहेत कि ज्यांची आपण मोजणी करायला लागलो तर अंक विसरून जाऊ. तर चला मग जाणून घेऊया अमेरिकेबद्दल काही आकर्षित माहिती.
१) अमेरिका देखील भारतासारखा पहिले इंग्लंड चा गुलाम होता, त्यांना ४ जुलै १७७६ मध्ये “जॉर्ज वाशिंग्टन” यांनी आझाद केले.
२) अमेरिकेमध्ये एकून ५० राज्य आहेत ज्यामधील ४८ राज्य एकमेकांना जोडले गेले आहेत परंतु २ राज्य अलास्का आणि हवाई हे वेगवेगळे आहेत.
३) प्रत्येकी ४ अमेरेकी लोकांपैकी १ व्यक्ती कोठेना कोठे तरी एखाद्या टेलीविजन कार्यक्रमात झळकलेला आढळेल.
४) अमेरिका मध्ये ५ करोड २६ लाख पेक्षाही जास्त कुत्रांची संख्या आहे.
५) अमेरिकेमध्ये दर वर्षी ८ करोड ५० लाख टन कागद वापरला जातो.
६) साधारणपणे प्रत्येक अमेरिकन व्यक्ती वर्षाला ६०० शीतपेय (cold drink) पितो.
७) सुप्रसिद्ध “The statue of liberty” १८८४ मध्ये फ्रांस ने अमेरिकेला भेट म्हणून दिले होते.
८) अमेरिका हा सर्वात जास्त जाडेपणा या आजाराने त्रस्त असलेला देश आहे. येथिल ३३% लोक जाडेपणाला बळी पडले आहेत.
९) अमेरिकेमध्ये दर वर्षी सरासरी ५५ अरब डॉलर सट्टेबाज़ी वर उडवला जातो.
१०) प्रत्येक अमेररिकन आपला ९०% वेळ घरातच घालवतो.
११) १९१३ मध्ये अमेरिकेमध्ये जवळजवळ १० लाख कार विकल्या गेल्या होत्या.
१२) १८% अमेरिकन लोक अजूनही हे मानतात कि सूर्य पृथ्वी भोवती प्रदिक्षणा घालतो.
१३) अमेरिकेतील लोक प्रत्येक वर्षाला १ करोड ५० लाखाहून अधिक हॉट डॉग खातात.
१४) अमेरिकेमध्ये दर वर्षी २५ लाखाहून अधिक प्लास्टिक बाटल्या फेकल्या जातात.
१५) जगात सर्वात जास्त आईसक्रीम हि अमेरिकेत खाल्ली जाते.
१६) प्रत्येक ४५ सेकंदाला, अमेरिकेमधील एक घर हे आगीत जळून खाक होतो.
१७) अमेरिकेतील १% लोकांकडे अमेरिकेचा ३३% पैसा आहे व ५०% लोकांकडे फक्त २.५% पैसा आहे.
१८) अमेरिकेची नौदल सेना हि जगातील दुसरी सर्वात मोठी सेना आहे व वायुसेना प्रथम क्रमांकावर आहे.
१९) अमेरिकेतील सर्वात उंच पर्वताचे नाव माउंट मैककिनल आहे ज्याची उंची ६,१९४ मीटर आहे.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.