सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र | Savitribai Phule information in Marathi

सावित्रीबाई फुले जीवन चरित्र । Savitribai Phule Biography in Marathi

समाज सेविका सावित्रीबाई फुले यांचे चरित्र, महिला शिक्षणातील योगदान आणि मृत्यू । Savitribai Phule Biography, Role in Women’s Education and Death story in Marathi

सावित्रीबाई ज्योतिराव फुले (Savitribai Jyotirao Phule) या एक प्रमुख भारतीय समाज सुधारक, शिक्षिका आणि कवयित्री होत्या. त्यांनी 19 व्या शतकात महिला शिक्षण आणि सशक्तीकरणामध्ये खूप महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांना त्या काळातील काही साक्षर असलेल्या महिलांमध्ये मोजले जाते.

सावित्रीबाईं व त्यांचे पती ज्योतिराव फुले यांना पुण्यातील भिडेवाडा येथे शाळा सुरू करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनी बाल विवाहा या रुढी परंपरेचे मुळापासून निर्मूलन करण्यासाठी कार्य केले. त्यांनी सती प्रथेच्या विरोधात जनजागृती करून विधवा पुनर्विवाह या मुद्द्याला कायम पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि त्यांना सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या सोबत दलित सुधारणा चळवळीचे प्रतीक म्हणून स्थान दिले जाते. सावित्रीबाईंनी अस्पृश्यतेच्या(Untouchability) विरोधात मोहीम चालवली आणि जाती व लिंगाच्या अनुसार जे भेदभाव केले जातात त्याविरोधात आवाज उठवला.

Jyotibha phule and Savitribhai phule information in marathi
Jyotibha phule and Savitribhai phule information in marathi

Jyotibha phule and Savitribhai phule information in Marathi

नाव: सावित्रीबाई फुले
जन्म: 3 जानेवारी, 1831
मृत्यू: 10 मार्च 1897
जन्म स्थळ: सातारा जिल्हा
कार्यक्षेत्र: समाज सुधारक
वडिलांचे नाव: खंडोजी नवसे पाटील
पतीचे नाव: ज्योतिराव फुले
सावित्रीबाई फुले यांचे सुरुवातीचे जीवन(Savitribai Phule Early Life)

सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा जिल्ह्यामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मी होते. त्या काळात मुलींचा विवाह हा लवकर केला जात असे. त्यामुळे या चालू असलेल्या रूढी परंपरेनुसार सावित्रीबाई 9 वर्षाच्या असताना 1840 मध्ये 12 वर्ष वय असलेल्या ज्योतिराव फुले यांच्या सोबत विवाह झाला. ज्योतिराव हे एक विचारक, लेखक, सामाजिक कार्यकर्ता आणि जाती विरोधी समाज सुधारक होते. त्यांना महाराष्ट्राच्या समाज सुधारणा चळवळीतील मुख्य व्यक्तींपैकी एक मानले जाते.

सावित्रीबाई या लग्ना अगोदर काहीच शिकल्या नव्हत्या, लग्नानंतर त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. त्यांचे पती असे होते की त्यांनीच सावित्रीबाईंना शिक्षणासाठी आणि लेखनासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी एका साधारण शाळेतून तिसरी आणि चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथी मिस फरार इन्स्टिटय़ूशन(Ms Farar’s Institution) मध्ये पुढील प्रशिक्षण घेतले. सावित्रीबाईंना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणीत ज्योतिराव कायम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असत.

महिला शिक्षण आणि सशक्तीकरनात कार्य (Role of Savitribai Phule in Woman Education and Empowerment)

ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी पुण्यात 1848 मध्ये मुलींसाठी पहिली स्वदेशी शाळा सुरू केली. त्यांच्या या कार्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आणि समाजातील लोकांनी बहिष्कृत केले होते. अशा अडचणीच्या प्रसंगी त्यांचे एक मित्र उस्मान शेख आणि त्यांची बहीण फातिमा शेख यांनी ज्योतिराव व सावित्रीबाईंना आश्रय दिला. यांनीच स्वतःच्या जागेत शाळा सुरू करण्यासाठी जागा देखील दिली. सावित्रीबाई फुले या त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या.

Savitribai Phule biography in Marathi
Savitribai Phule biography in Marathi

ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी पुढे महार आणि मांग जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील शाळा सुरू केली. त्याकाळात महार आणि मांग जातीच्या लोकांना अस्पृश्य म्हणून संबोधले जातं होते. 1852 साल उजाडले तेव्हा तीन शाळा फुले कुटुंब चालवत होते. याच वर्षी 16 नोव्हेंबरला फुले दाम्पत्याला ब्रिटिश सरकार कडून शिक्षण क्षेत्रातील कामाबद्दल पुरस्कार देण्यात आला. सावित्रीबाईंना देखील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार मिळाला. याच वर्षी त्यांनी महिलांमध्ये त्यांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, महिलांच्या अनेक इतर सामाजिक समस्यांविषयी समाधान आणि जागरूकतेसाठी महिला सेवा संस्था देखील सुरू केली. विधवा महिलेचे केश कर्तन बंद करावे यासाठी त्यांनी मुंबई आणि पुण्यात न्हावी समाजाचा संप यशस्वी केला होता.

फुले दाम्पत्याद्वारे सुरू असलेल्या तिन्ही शाळा 1858 पर्यंत बंद झाल्या होत्या. यासाठी अनेक कारणे होती, ज्यामध्ये 1857 च्या भारतीय उठावानंतर, स्कुल प्रतिबंध समिती वरून ज्योतिरावांनी राजीनामा दिला होता. याशिवाय समाजाद्वारे पीडित समजल्या जाणाऱ्या समूहाला शिक्षण दिल्याचा आरोप देखील ज्योतिराव व सवित्रीबाईंवर लावला गेला होता. परंतु फक्त एक वर्षानंतरच सावित्रीबाईंनी 18 नवीन शाळा सुरू केल्या आणि त्यात विविध जातीच्या मुलांना त्यांनी शिकवले. सावित्रीबाई आणि फातिमा यांनी महिलांना आणि खालच्या जातीच्या समजल्या जाणाऱ्या समूहाला शिक्षण द्यायला सुरुवात केली. या गोष्टीकडे अनेक लोकांनी वाईट नजरेने बघायला सुरुवात केली, विशेषतः पुण्यातील जे उच्चभ्रू जातीचे लोक आहेत ते दलित शिक्षणाच्या विरोधात असल्याने त्यांनी याला विरोध केला.

सावित्रीबाईंना त्या लोकांनी धमक्या द्यायला सुरुवात देखील केली. जेव्हा सावित्रीबाई शाळेकडे जायला निघत तेव्हा त्यांच्या अंगावर गाईचे शेण, चिखल आणि दगड फेकले जात. त्यांना सामाजिक दृष्ट्या अपमानित केले जात होते. परंतु या सर्व गोष्टी सावित्रीबाईंना आणि फातिमा शेख यांना त्यांच्या ध्येयापासून किंचित सुद्धा डगमगऊ शकल्या नाही. अखेरीस या दोघींच्या सोबतीला सगुणा बाई देखील आल्या आणि त्याच पुढे शिक्षा आंदोलनात अग्रेसर होत्या. यासोबतच फुले दाम्पत्याने 1855 मध्ये शेतकरी व कामगारांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या, जेणेकरून ते दिवसभर शेतात काम करतील व रात्री शिक्षण घेऊ शकतील.

मुले शाळा सोडून जाऊ नये यासाठी सावित्रीबाईंनी त्या मुलांना वेतन किंवा मोबदला देण्याची प्रथा सुरू केली. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवले होते त्यांच्यासाठी त्या प्रेरणा बनून राहिल्या. त्या मुलांनी पुढे जाऊन लेखन आणि पेंटिंग सारख्या गोष्टी देखील शिकवल्या. यातीलच एक म्हणजे मुक्ता साळवे ही विद्यार्थिनी पुढे जाऊन निबंध लिहिते आणि तोच पुढे दलित स्त्रीवाद आणि साहित्याचा चेहरा बनतो. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे महत्व पालकांना समजण्यासाठी काही नियमित कालावधीत पालक शिक्षकांची बैठक आयोजित केल्या.

1863 मध्ये ज्योतिराव व सावित्रीबाईंनि एक देखभाल केंद्र सुरू केले. यात बालहत्या होऊ नये आणि ज्या गर्भवती ब्राम्हण विधवा आहेत त्यांना सहारा देणे, बलात्कार पीडित महिला व तिच्या बालकाला आसरा देणे हे कार्य होते. कदाचित अशा प्रकारे भारतातील ही पहिलीच संस्था होती. या उपक्रमातून विधवा हत्या रोखण्यास मदत झाली व बाल हत्येचे प्रमाण देखील कमी झाले. 1874 मध्ये ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण विधवा महिलेकडून पुत्र दत्तक घेतला आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला. हाच मुलगा म्हणजे यशवंतराव पुढे डॉक्टर बनले.

ज्योतिरावांनी विधवा पुनर्विवाह साठी वकिली देखील केली. सावित्रीबाईंनी सती प्रथा सारख्या सामाजिक रुढीं विरोधात अनेक प्रयत्न केले. हे दोन्ही मुद्दे असे होते
कि ज्यामुळे महिलांचे अस्तित्व कमी होत होते. त्यांनी बालविधवांना शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा देखील अथक प्रयत्न केला.

सावित्रीबाईंनी अस्पृश्यता आणि जातिवादाच्या विरोधात त्यांच्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन काम केले. खालच्या जातीच्या लोकांना देखील समान अधिकार देण्यासाठी आणि हिंदू समाजात कौटुंबिक जीवनात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी काम केले. ज्या काळात अस्पृश्यांची सावली देखील वाईट मानली जात होती, ते लोक पाण्यावाचून मरत होते तरी देखील उच्च जातीचे लोक त्यांना पाणी घेऊ देत नव्हते तेव्हा ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी स्वतःच्या घरातील विहीर त्यांना मोकळी केली.

सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू (Savitribai Phule Death)

सावित्रीबाईंचे दत्तक पूत्र यशवंतराव यांनी डॉक्टरच्या रुपात सेवा द्यायला सुरुवात केली होती. 1897 मध्ये नालासोपारा आणि महाराष्ट्राच्या इतर भागात बुलेसोनिक प्लेग या महामारीने थैमान घातले होते. धाडसी सावित्रीबाई आणि यशवंतराव यांनी पुण्याच्या बाहेर लोकांच्या सेवेसाठी एक दवाखाना सुरू केला. सावित्रीबाई या महामारीच्या रुग्णांना दवाखान्यात घेईन येत व यशवंतराव त्यांच्यावर उपचार करत असे. रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई स्वतः या महामारीच्या विळख्यात अडकल्या आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचे निधन झाले.

समाजाकडून अनेक वर्षे जुन्या वाईट परंपरांवर अंकुश लावून त्यातील ज्या चांगल्या सुधारणा आहेत त्या पुढे घेऊन जाण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. हे कार्य आजच्या पिढीला देखील प्रेरणादायी आहे. 1983 मध्ये पुणे महानगरपालिकेद्वारे त्यांच्या सन्मानार्थ स्मारक बांधण्यात आले. भारतीय डाक ने त्यांच्या स्मरणार्थ 10 मार्च 1998 रोजी एक डाक तिकीट देखील प्रकाशित केले. 2015 मध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठाचे नाव बदलून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले गेले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुरस्कार महाराष्ट्रातील महिला समाज सुधारकांना देण्यात येत असतो.

सावित्रीबाई फुले यांचे कोट्स | Savitribai Phule Quotes in Marathi

“शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार.”

“घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माली माय.”

“तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देवू नकोस फुले; तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले.”

“शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”

“ती लढली म्हणून आम्ही घडलो!”

“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हा Savitribai Phule biography in Marathi लेख वाचून सावित्रीबाईंबद्दल जाणून घ्यायला थोडी मदत झाली असेल.

तुम्हाला जा का या Savitribai Phule information in Marathi या लेखामध्ये काही चुकीचे किंव्हा अजून काही सावित्रीबाईंबद्दल माहिती सांगायची असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आम्ही वेळोवेळो आमचा हा लेख update करत असतो.

तसेच हा लेख वाचून तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर हा लेख Facebook किव्हा whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment