जगातील सर्वात जास्त खेळलेला आणि सर्वात लोकप्रिय असा कुठला खेळ असेल तर तो म्हणजे फुटबॉल. चला तर मग जाणून घेऊया फुटबॉल खेळाशी संबंधित माहिती.
१) १९५० च्या विश्वचषक स्पर्धेतून भारतीय फुटबॉल संघाला बाहेर काढले गेले होते कारण भारतीय खेळाडूंकडे बूट नव्हते.
२) फुटबॉल खेळ जवळजवळ ४७६ बी.सी दरम्यान चीनमध्ये सर्वात प्रथम खेळला गेला होता. त्यावेळी या खेळाचे नाव कुजू असे होते. फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त खेळलेला आणि पाहीलेला खेळ आहे.
३) जगातील ८०% पेक्षा जास्त फुटबॉल फक्त पाकिस्तानामध्ये बनवले जातात. तेथे हाताने तयार केलेले फुटबॉल मिळतात.
४) व्यावसायिक फुटबॉल ची सुरुवात ३१ ऑगस्ट, १८९५ साली झाली.
५) एकेरी सामन्यात कोणत्याही खेळाडूने मिळवलेल्या सर्वाधिक गोलांची संख्या, १६ गोल आहे. डिसेंबर १९४२ मध्ये फ्रान्सच्या स्टीफन स्तानिस याने “रेसिंग क्लब दी लान्स” च्या वतीने खेळून हा रेकॉर्ड केलेला.
६) फुटबॉल खेळाला केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लोक सॉकर म्हणतात आणि संपूर्ण जगभरात फुटबॉल म्हणतात.
७) २ मे, १९६४ मध्ये पेरू च्या सामन्यात रेफरी च्या निर्णयामुळे मैदानात दंगा झाला. या दंग्यात जवळजवळ तीनशे लोक मरण पावले होते.
८) चंद्रावर सर्वात पहिले पाऊल ठेवणारा मनुष्य नील आर्मस्ट्राँग आपल्याबरोबर फुटबॉल घेऊन जाण्यास इच्छुक होता परंतु नासा ने त्याला अनुमती दिली नाही.
९) गेल्या १२० वर्षापासून व्यावसायिक फुटबॉल चा आकार सारखाच आहे. फुटबॉलची २८ परिमिती आहे आणि वजन ४५० ग्रॅम आहे.
१०) १९९८ मधे आफ्रिका मध्ये वीज कोसळल्यामुळे एका संघाच्या ११ खेळाडूंचा मृत्यू झाला होता परंतु दुसऱ्या संघातील खेळाडूंना काहीच झाले नव्हते.
११) पहिला विश्वचषक खेळ १९३० मध्ये खेळला गेला. उरुग्वे हे यजमान देश होते. या स्टेडियम वर या खेळासाठी सुमारे तीनशे लोक उपस्थित होते.
१२) १९३७ मध्ये फुटबॉल सामनेची पहिली स्पर्धा थेट टीव्ही वर दर्शविली गेली. तो एक प्रकारचा सराव सामना होता.
१३) १९७४ च्या विश्वचषक सामन्यात चिलीतील कार्लोस केजली हा प्रथम खेळाडू होता ज्याला रेड कार्ड दाखवले गेले होते.
१४) टीव्हीवर फुटबॉल विश्वचषक पहाणारे जवळजवळ शंभर करोड पेक्षा अधिक चाहते आहेत.
१५) १९६२ पासून ते १९६६ पर्यंत युरोप व दक्षिण अमेरिका या दोन देशांनी विश्वचषक स्पर्धेचे विश्वकप इतर कुठल्याही देशास जिंकू दिले नाही.
१६) दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या अनेक फुटबॉल सामन्यांचे “द डेथ मॅच” असे नाव देण्यात आले होते. हे सामने जर्मनी द्वारे नियंत्रीत करण्यात येत असत.
१७) एका फुटबॉल सामन्यादरम्यान, खेळाडू सरासरी ९.३ मैल म्हणजेच १५ किलो मीटर धावतो.
१८) ख्रिस्तियानो रोनाल्डो सामन्याच्या प्रत्येक मिनिटात गोल करणारा पहिला खेळाडू आहे.
१९) २००२ च्या विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल जिंकणारा ओलीवर कान हा पहिला आणि एकमेव असा गोलकीपर आहे.
२०) ली टोड या खेळाडूला इतिहासामधे सर्वात लवकर रेड कार्ड मिळण्याचा रेकॉर्ड आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेकंदांमध्येच त्याला रेड कार्ड मिळाले होते.
२१) पेले हा सतरा वर्षाचा असतानाच फुटबॉल विश्वकप जिंकणाऱ्या सर्वात छोटा खेळाडू आहे. तर दिने जौफ वयाच्या ४० व्या वर्षी फुटबॉल विश्व कप जिंकणारा सर्वाधिक वयोगटाचा खेळाडू आहे.
२२) पहिला बास्केटबॉल हा खेळ फुटबॉल ने खेळला गेला होता.
२३) १९१३ पर्यंत गोलरक्षक आपल्या संघाच्या कपड्यांचा जो रंग आहे तोच घालत असत.
२४) १९३० आणि १९५० साल वगळता युरोपियन संघ नेहमी अंतिम फेरीत पोहोचला आहे.