Interesting Facts About X-rays In Marathi | एक्स-रे बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे

Interesting Facts About X-rays In Marathi | एक्स-रे बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे

X-rays/एक्स-रे म्हणजे खुप जास्त energy वाली Electromagnetic Radiation आहे, ज्यांना x-radiation सुद्धा बोलले जाते. X-rays वेग-वेगळ्या कामांसाठी उपयोगी येते जसे की शरीराच हाड तुटले असेल तर व कोणाला क्षयरोग झाले असेल तर जाणून घेण्यासाठी. तसेच या किरणांचा उपयोग सुरक्षतेसाठी सुद्धा केला जातो कारण या किरणांचा उपयोग करून बागेमद्धे लपवलेले शस्त्र किव्हा तस्करी चे सामान खुप सोप्या रित्या ओळखले जाऊ शकते.

X-rays चा शोध कोणी लावला होता?
१८९५ मद्धे X-rays चा शोध जर्मनीचे विलहम रॉटजन यांनी लावला होता. आणि सगळ्यात पहिला x-ray चा प्रयोग विलहम यांनी त्यांच्या पत्नीच्या हातावर केला होता. चला मग जाणुन घेउया एक्स-रे किरणांबद्द काही महत्वाची माहीती.
१. विलहम रॉटजन यांनी एक्स-रे चा शोध हा योगा-योगाने लागला होता. खर तर ते एक दिवस व्हॅक्यूम ट्यूब सोबत कुठला तरी प्रयोग करत होते आणि अचानक काही विचित्र विकिरण जाणवले. नंतर असे समजले की ते कुठले साधारण तरंग न्ह्वते.

२. एक्स-रे च्या शोधासाठी विलहम रॉटजन यांना १९०१ मधे नोबेल पुरस्कार भेटला होता.

३. विलहम यांची पत्नी आपल्या पतीच्या या सोधामुळे जास्त खुश न्हवती. कारण जेव्हा त्यांनी आपल्या हाताची विचित्र छवि बघितली तेव्हा त्या बोलल्या होत्या की, “मला असे वाटले जणू काही मी माझ मरण च बघितले”

४. एक्स-रे च्या शोधमुळे वैद्यकीय क्षेत्रामद्धे खुप फायदा होणार होता आणि म्हणूनच विलहम यांनी एक्स-रे चा पेटेंट केला न्ह्वता कारण त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या या शोधाचे सगळ्यानां लाभ झाला पाहिजे.

५. x-rays ला इंग्लिश मधे वेगवेगळ्या प्रकारे लिहले जाते जसे की xray, x ray, x-ray आणि X-ray.

६. ज्या शास्त्रन्यांना x-rays च्या किरणांमुळे होणाऱ्या नुकसानानबद्दल माहिती न्हवती, अशा लोकांना खुप प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते जसे की, त्वचेची जळ-जळ, केसांचे गळणे, कॅन्सर इत्यादी.

७. Clarence Dally हे पहिले व्यक्ती होते जे x -ray किरणांमुळे मरण पावले होते. त्यांनी थॉमस एडिसन यांच्या X-ray light bulb वर खूप वर्ष काम केले होते, ज्यामुळे त्यांच्या शरीरावर कॅन्सर चे खूप वेग वेगळे घाव झाले होते आणि केवळ ३९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

८. जेव्हा X-ray ची किरणे आपल्या शरीरातून जातात तेव्हा काही किरणे आपल्या शरीरातील आतल्य भागांमद्धे अडकले जातात तर काही किरणे शरीरातून निघून जातात. आणि याच कारणामुळे आपल्या शरीरातील आतील भागाचे चित्र आपल्याला x-ray graph वर दिसून येते.

९. CT scans, Fluoroscopy, Dental X-rays आणि Mammograms मद्धे सुद्धा X-rays चा उपयोग केला जातो. आणि सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड आणि MRI मध्ये X-rays चा वापर केला जात नाही आणि हे आपल्या शरीरासाठी सुरक्षित आहेत.

१०. जस कि तुम्हाला आता समजले असेल कि x-rays आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात आणि म्हणूनच गर्भवती महिलांचं x-ray केला जात नाही. आणि केलाच तर मुलगा विकलांग जन्माला येतो.

११. एका सर्वेच्या नुसार अमेरिकेमध्ये ०.४ % लोकांना कॅन्सर हे CT-scans केल्या मुले होतो.

१२. x-rays ची wavelength आपल्याला दिसणाऱ्या प्रकाशा पेक्षा कमी असतात.

१३. x-rays आपल्या शरीरासाठी का धोकादायक असतात?
x-rays इलेकट्रॉन्स ला उत्सर्जीत करतात आणि जेव्हा आपले टिशू x-rays च्या संपर्कात येतात तेव्हा हे इलेकट्रॉन आपल्या DNA ला नुकसान पोचवतात आणि ज्या मुळे कॅन्सर होण्याचा सुद्धा धोका असतो. म्हणूनच बोलले जाते कि कधी हि छोट्या छोट्या गोष्टींसाठी x-ray नाही केला पाहिजे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Interesting Facts About X-rays In Marathi | एक्स-रे बद्दल महत्वाची माहीती मराठी मद्धे”

Leave a Comment