Importance of Saving Money In Marathi | पैसे कसे वाचवायचे

Importance of Saving Money In Marathi | पैसे कसे वाचवायचे

Importance of Saving Money In Marathi: म्हणतात ना “ज्याने पैसे वाचवायला शिकले त्याने जगणे शिकले.” सत्य आहे हे की ज्या माणसाला पैसे कसे वाचवायचे हे माहित आहे त्याला या कठोर आणि स्वार्थी जगामध्ये आरामात जगता येईल. पण बचत करणे हे देखील एक कौशल्याचे काम आहे. प्रत्येकजण पैसे वाचवू शकत नाही.

पैसे कसे वाचवायचे? (How To Save Money In Marathi)

मित्रांनो मी लेखात तुम्हाला दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे.

सनी आणि मनी हे दोन चांगले मित्र होते. ते एकत्र काम करायचे. सनी हुशार, कामात कुशल आणि निपुण होता आणि मनी सनीपेक्षा थोडा कमी कुशल आणि थोडासा अधिक खर्चिक होता. दोघेही एकाच खेड्यातील होते आणि शहरात काम करत होते. दोघांचे कुटुंबही त्यांच्यासोबत राहत असे. सनीला पैश्याचे खूप महत्त्व होते. तो पैश्याला लक्ष्मी मानत असे आणि मन्याला पैशाचे महत्व नव्हते. जेव्हा जेव्हा त्याला पैसे मिळत, तेव्हा तो ते गैरवाजवी खर्च करीत असे.

दोघांना 1 तारखेला पगार मिळत असेल. आज वाचवलेला पैसा उद्या अडचणीत नक्कीच कामाला येईल असा विचार करून सनी पगारातील अर्ध्यापेक्षा जास्त पैसे वाचवायचा. पण मनी त्याच्या गरजेनुसार पैसे वाचवायचा आणि अर्ध्यापेक्षा जास्त पैसे खर्च करत असे. तो फक्त आजच्या पुरता जगत असे त्याला उद्याची पर्वा नव्हती. सनी त्याला वारंवार समजावून सांगे कि पैसे वाचवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ही बचत आपल्या फायद्याची आहे. पण तो त्याचे ऐकत नसे व स्वतःच्या मनासारखे वागत असे.

एक दिवस सनी आणि मनी दोघे काम करत होते, अचानक मनीला हॉस्पिटलमधून फोन आला की त्याच्या पत्नीचा अपघात झाला आहे. मनी खूप घाबरला आणि तत्काळ रुग्णालयात निघून गेला. जेव्हा तो रुग्णालयात पोचला तेव्हा त्याच्या पत्नीच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीने सांगितले की घरी येताना एका कारने चुकून तिला धडक दिली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली.” काही लोकांनी मला दवाखान्यात दाखल करून डॉक्टरांना दाखवलं”.

मनी तिची प्रकृती पाहून फार दुःखी झाला. थोड्या वेळाने डॉक्टर त्याच्याकडे आले आणि म्हणाले की घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व काही ठीक आहे. कृपया आपल्या पत्नीची काळजी घ्या. त्याच वेळी डॉक्टरांनी सांगितले की, ‘उपचारांचा एकूण खर्च पन्नास हजार रुपये आहे. कृपया हे पैसे भरा आणि आपल्या पत्नीला घरी घेऊन जा.

हे ऐकून मनी म्हणाला, ‘डॉक्टर साहेब! माझ्याकडे मुळीच पैसे नाहीत. पन्नास हजार रुपये मी कुठून देणार? ”सर्वांसमोर तो खूप लज्जित झाला. डॉक्टर म्हणाले, “तुला पैसे द्यावे लागतील, अन्यथा तू तुझ्या बायकोला घरी घेऊन जाऊ शकत नाही. “मनी खूप अस्वस्थ झाला. एवढा पैसा कुठून आणावा हे त्याला कळत नव्हते. सनीही त्याच्यासोबत होता. सनी हा मनीचा परम मित्र होता, तो त्याला संकटात पाहू शकला नाही. तो म्हणाला, “ मित्रा! काळजी करू नको. मी तुझ्याबरोबर आहे तू तुझ्या बायकोला घेऊन घरी जा, मी आलोच.”

मनी ला समजले कि सनी त्याला मदत करू इच्छित आहे. त्याने सनीच्या मदतीचा स्वीकार केला नाही आणि म्हणाला, ‘मित्रा, तु मला नेहमीच समजावले की पैशाची बचत करणे खूप महत्वाचे आहे. पण मी तुझे कधीच ऐकले नाही. आज मीच माझ्या वाईट परिस्थितीसाठी जबाबदार आहे. कृपया मला ह्याच परिस्थितीत सोड मी यासाठीच पात्र आहे. मनीला आता समजले की जीवनात पैसे वाचवणे खूप महत्वाचे आहे. आजचे वाचवलेले पैसे, उद्या नक्कीच कामाला येतात. सनीने अधिक आग्रह केल्यानंतर मनीने सनीच्या मदतीचा स्वीकार केला आणि वचन दिले की आतापासून तो आपल्या गरजेनुसार पैसे खर्च करेल आणि भविष्यासाठी पैसे वाचवेल.

या घटनेमुळे मनीला पैशाचे आणि बचतीचे महत्त्व लक्षात आले.

तर मग मित्रांनो तुम्हाला सुद्धा या गोष्टीवरून पैसे वाचवण्याचे महत्व समजले असेल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment