हिंदू धर्माविषयीच्या आश्चर्यकारक गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील…
Information about Hindu dharma in Marathi: हिंदू धर्म हा असा धर्म आहे त्याच्याविषयी पुरेपूर माहीत कोणाला असेल असे नाही. कारण हिंदू धर्माची सुरुवात कधी आणि कशी झाली याचा काहीही पुरावा सापडत नाही. एक असा धर्म ज्याच्यात खूप साऱ्या चांगल्या रूढी परंपरा आहेत आणि बऱ्याच वाईट रूढी देखील आहेत. तरी देखील हा धर्म सर्वांना आश्चर्यात टाकतो. हिंदू हा असा एक धर्म आहे ज्याच्यात खूप साऱ्या देवी देवता आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सर्व देवी देवतांना पूजनीय मानले जाते आणि सर्वांना समान स्थान दिले जाते. हिंदू धर्माविषयी अशाच काही आश्चर्यकारक आणि मनोरंजक गोष्टी तुम्हाला आज मी तुम्हाला सांगणार आहे.
हिंदू धर्माविषयी आश्चर्यकारक गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील – Interesting Facts about Hinduism in Marathi
जगभरात विवाहाची संकल्पना ही हिंदू धर्मामुळे सुरू झाली. हिंदू धर्माच्या माध्यमातून लोकांनी विवाह करणे शिकले आणि विवाह काय असतो आणि त्याचे महत्व काय आहे हे हिंदू धर्माने शिकवले. हिंदू धर्म हा पहिला असा धर्म आहे ज्याने विवाहाची संकल्पना मांडली आणि साऱ्या विश्वाने ती स्वीकारली देखील.
हिंदू लोकांमध्ये 108 ही संख्या शुभ मानली जाते. या मागील कारण तुम्हाला कदाचित माहीत देखील नसेल. ज्यांना माहीत असेल त्यांना मुख्य कारण माहीत नसेल. खरंतर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर आणि सुर्याचा व्यास किंवा चंद्रापासून पृथ्वीचे अंतर आणि चंद्राचा व्यास यांच्या सरासरीच्या काही 108 पटीत या संख्या येतात. त्यामुळे हिंदू धर्मात या संख्येला महत्व आहे. तुम्ही बघितले असेल की हिंदू धर्माच्या जपमाळा आहेत त्यात 108 मणी असतात.
हिंदू धर्मात सध्याच्या वेळेला जवळपास 20 अशी मंदिरे आहेत ज्यांना एक हजार पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी झालेला आहे. आजही या मंदिरांमध्ये काही न काही तरी खास गोष्ट किंवा एखादा दैविक चमत्कार जाणवत असतो. त्यामुळे या मंदिरांना श्रद्धेचे स्थान प्राप्त झालेले आहे. काही मंदिरांमध्ये अशा अनोख्या चमत्कारिक घटना घडल्या आहेत की ज्यांना विज्ञान देखील उत्तर देऊ शकले नाही.
हिंदु हा जगातील एकमेव असा धर्म आहे ज्यात प्राण्यांना देखील पवित्र आणि कसल्या तरी गोष्टींचा संकेत मानले जाते. इथे प्रत्येक प्राणी हा देवतेशी जोडलेला आहे. प्रत्येक प्राण्याला आपल्या हिंदू धर्मात महत्वाचे स्थान दिले आहे. जगातील कुठलाही असा धर्म नसेल ज्यात प्राण्यांची पूजा केली जाते परंतु हिंदू धर्मात गाई आणि बैलांची देखील पूजा केली जाते.
हिंदू धर्मातील प्रत्येक प्रथा आणि पुराणांत लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीला आज विज्ञान मान्य करत आहे. खूप साऱ्या भयानक महामारी आणि आजारांच्या औषधांविषयी माहिती विज्ञानाला पौराणिक ग्रंथांमधून मिळाली आहे. याशिवाय खूप सारे असे विषय आहेत ज्यांना सोडवण्यासाठी हिंदू धर्माच्या ग्रंथांचा आधार घेतला जातो.
हिंदू धर्मामध्येच सर्वात अगोदर कामवासना हा विषय समोर आणला आहे आणि यात म्हणले आहे की हा मनुष्याचा एक स्वाभाविक गुण आहे. त्यामुळेच कामवासना हे पुस्तक जगातील कामना या विषयात विकल्या जाणाऱ्या पुस्तकांत अग्रेसर आहे.
जगात हिंदू धर्म असा धर्म आहे जो आपल्याला कोणत्याही जोखडांमध्ये जखडून ठेवत नसतो. आपण आता जे स्वातंत्र्य म्हणतो ते हिंदू धर्मात अगोदरपासून दिलेले आहे.
हिंदू धर्म हा एक असा धर्म आहे जो महिलेला शक्ती आणि देवीचे रूप मानतो. आज असा कोणताही असा धर्म नाहीये ज्यात महिलेला एका शक्तीचे रूप मानले जात असेल. हिंदू धर्मात महिलांना खूप जास्त सन्मान आणि देवीचे रूप दिलेले आहे.
हिंदू हा असा एकमेव धर्म आहे ज्यात माणसाच्या मृत्यूनंतर आत्मा वास करत असते असे सांगितले जाते. आणि आत्मा ही संकल्पना हिंदू धर्माने सांगितले आहे. या अगोदर कोणत्याही धर्माने याविषयी बोलले देखील नव्हते. हिंदू धर्मात केले जाणारे अंतिम संस्कार आणि त्यानंतरच्या दशक्रिया विधी सारख्या क्रिया या गोष्टीचे पुरावे आहेत.
हिंदू हा एकमेव असा धर्म आहे ज्यात 33 कोटी देव असून देखील सर्वांचा सार एकच आहे अशी धारणा आहे. म्हणजेच अनेकतेमध्ये एकतेचा सार हिंदू धर्मात दडलेला आहे.
मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला Information about Hindu dharma in Marathi या लेखाच्या माध्यमातून हिंदू धर्माबद्दल सर्व माहिती कळाली असेल. तसेच संपूर्ण हरिपाठासाठी या लिंक वर क्लिक करा.