आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलूया जे उघडपणे धमकी द्यायचे. जे मुंबई, देशाची राजधानी बनवू इच्छित होते, ज्याच्या दरबारात विरोधक देखील सहभाग घ्यायचे. त्यांचे नाव आहे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचे बालपणाचे नाव “बाळ केशव ठाकरे” होते, काळाबराबेर ते “बाळा साहेब ठाकरे” झाले.
१) बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते व ते नंतर राजकारणी बनले. एवढेच नव्हे तर ठाकरे एक लोकप्रिय क्रांतिकारक व्यंगचित्रकार होते. १९५० च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांच्येच रेखाटलेले व्यंगचित्रे मुद्रित करण्यात येत होते. १९६o मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली.
२) बाळासाहेब ठाकरेंना ‘हिंदू हृदय सम्राटा’ म्हटले जायचे. लाखो लोक त्यांची भाषणं ऐकण्यासाठी एकत्रित व्हायचे.
३) चांदीच्या सिंहासना वर बसलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या दरबारात विरोधक देखील सहभाग घायचे. व ते उघडपणे त्यांना धमकी द्यायचे.
४) जेव्हा बाळासाहेबांनी कोणाचा विरोध केला तेव्हा शत्रूसारखे आणि जेव्हा ते तारीफ करायचे तेव्हा ते खास मित्रासारखे वागायचे.
५) १९ जून, १९६६ रोजी शिवाजी पार्कमधे बाळासाहेब ठाकरे यांनी नारळ फोडून आपल्या मित्रांसह “शिवसेना” हा पक्ष तयार केला. जो अजूनही चालू आहे.
६) १९६o आणि १९७o च्या दशकात “लुंगी हटाओ, पुंगी बचाओ” मोहीम महाराष्ट्रात चालविले गेले. हे विशेषत: बिहारींसाठी होते कारण बाळासाहेबांनी आपल्या वृत्तपत्राच्या मुख्य पानावर लिहिले होते की “एक बिहारी, सौ बीमारी“.
७) १९८० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी मुसलमानांविषयी सांगितले, की ते कर्करोगासारख्या पसरत आहेत आणि देश त्यांच्यापासून संरक्षित व्हायला पाहिजे.
८) बाळासाहेब ठाकरेंची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मतोश्री, मुंबई येथे त्यांच्या घरी यायचे. बॉलीवूडमधील कलाकार त्यांच्या घरी बिअर पिण्यासाठी व घरी भेटण्यासाठी यायचे.
९) आपल्या भाषणात, बाळासाहेब ठाकरे नेहमी दोन गोष्टींचे कौतुक करायचे, एक “हिटलर” होता आणि दुसरा श्रीलंकेचा दहशतवादी संघटना “एलटीटीई”.
१०) १९९० या काळात, काश्मीर मधील इस्लामी दहशतवाद्यांनी कश्मिरी पंडितांना तिथून हकलावायला लावले होते. अमरनाथ यात्रा सुरू होती. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा थांबविण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी असे धमकाविले की जो कोणी या यात्रेसाठी येईल तो परत घरी जाणार नाही. तेव्हा बाळासाहेबांनी असे निवेदन केले की, ९९% हज यात्रेकडे जाणार्या फ्लाइट मुंबई विमानतळावरून जातात. बघूया मक्का-मदीना ला येथून प्रवास कसा केला जातो आणि दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली.
११) सन. १९९२ मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे ‘आप की अदालत’ या कार्यक्रमांमध्ये गेलेले. जेव्हा त्यांना असे विचारण्यात आले की या घटनेमागे शिवसैनिकांचा हात आहे का ? तेव्हा त्यांनी असे उत्तर दिले, ‘जर हे काम शिवसैनिकांनी केले तर ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असती ‘.
१२) बाळासाहेब ठाकरे यांचे काही विशेष छंद होते. जसे की सिगार, वाईन इ. त्यांच्या बहुतेक फोटो किंवा मुलाखातीमध्ये त्यांच्या हातात पाईप किंवा सिगार असायचे. १९९५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी पाईपची सवय तर सोडली परंतु सिगारची सवय मृत्यू नंतरच सुटली.
१३) १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्याची बंदी आणली गेली परंतु बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही.
१४) आपल्या मृत्यूचा दोन महिन्या अगोदर बाळासाहेब ठाकरे यांनी निवेदन केले होते की देशाचे सैन्य माझ्या हवाली केल्यास मी एका महिन्यांमध्ये या देशाचे निराकरण करेन.
१५) ठाकरे यांच्या जीवनात भरपूर दुःखे देखील होती. आधी त्यांच्या पत्नीचा मृत्यू नंतर सर्वात मोठा मुलगा बिंदूमाधव यांचे कार अपघातात निधन नंतर दुसरा मुलगाच जयदेव बरोबर मतभेद आणि आपला लाडका भाचा राज ठाकरे याचा नवीन पक्ष तयार करणे. राज ठाकरे यांना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असे मानले जायचे.
राज ठाकरे हे बाळासाहेब यांचे भाचे नसुन पुतणे आहेत. असे वाटते.