नवीन वर्षाचे संकल्प | New Year Resolutions in Marathi | Resolutions Ideas in Marathi

नवीन वर्ष 2024 | New Year Resolutions in Marathi | Resolutions Ideas in Marathi

New Year 2024 Resolutions In Marathi: नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला, आम्ही एक संकल्प घेतो की आम्ही मागील वर्षी केलेल्या चुका पुन्हा करणार नाही. कोरोनाच्या या महामारीच्या काळात आपल्याला एक गोष्ट चांगली समजली आहे कि शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच मराठी वारसा च्या आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन वर्ष 2024 चे आरोग्यविषयक संकल्प.

असं म्हटलं जातं ‘Health is Wealth All Is Well!‘, हे जस ऐकायला चांगला वाटत, तसं ते आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. चला तर मग New Year 2024 मध्ये आपण आपल्या आरोग्याशी तडजोड करणार नाही अशी शपथ घेऊया. नवीन वर्ष 2024 मध्ये, तुमच्या जीवनात खाली दिलेल्या 10 Marathi Resolutions for new year.

नवीन वर्ष 2024 साठी संकल्प | New Year Resolutions in Marathi

प्रत्येक वेळी आपण नवीन वर्षासाठी दृढ हेतू करतो, परंतु आपल्या योजनांवर योग्यरित्या कार्य करण्यास आपण अक्षम राहतो. जर्नल ऑफ क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, केवळ 46% लोक त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण वर्षभर पाळण्यास सक्षम राहतात. याचा अर्थ असा की नवीन वर्षासाठी ध्येय निश्चित करणाऱ्या निम्म्याहून कमी लोक त्यात यशस्वी होतात. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी नवीन वर्षाचे सर्वोत्तम 10 संकल्प घेऊन आलो आहोत जे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेऊन सहज पूर्ण करू शकता.

1. नियमित व्यायाम करा
2. चांगली झोप चांगले आरोग्य
3. नियमित आरोग्य तपासणी करा
4. भरपूर पाणी पिण्याची सवय लावा
5. टेन्शनला बाय बाय म्हणा
6. आहार नियमित व योग्य असावा
7. नशे पासून दूर रहा
8. वजन नियंत्रित ठेवा
9. तुमच्या करिअरची योजना आखा
10.आरोग्य विमा घ्या

1. नियमितपणे व्यायाम करा: नियमित व्यायाम करा, आज नाही, उद्यापासून व्यायाम करेन, आज कंटाळा आला आहे, उद्यापासून करेन. मागील वर्षासह हे सर्व बहाणे डेक्खील मागे ठेवा. रोज सकाळी अर्धा तास सायकलिंग, डान्स, योगा, चालणे, जिम करणे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.

2. चांगली झोप चांगले आरोग्य: पुरेशी झोप घेतल्याने मेंदू आणि मन दोन्ही संतुलित राहते. पूर्ण झोप घेतल्याने शुगर, बीपी आणि स्ट्रोक सारख्या समस्या टाळता येतात. त्यामुळे रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हा नियम आपल्या आयुष्यात लागू करा.

3. नियमित आरोग्य तपासणी करून घ्या: आपल्यापैकी बहुतेक जण जेव्हा काही आजार असतो किंवा आपल्याला स्वस्थ वाटत नाही तेव्हाच डॉक्टरकडे जातात. परंतु ही पद्धत चुकीची आहे, आपण वर्षातून एकदा आपल्या संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे, जेणेकरून रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेता येतील. आजकाल अनेक प्रकारची Health Packages उपलब्ध आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घ्या आणि त्यांचा पुरेपूर लाभ घ्या.

4. भरपूर पाणी पिण्याची सवय लावा: पाणी आपल्या शरीराला चालवणारे इंधन म्हणून काम करते. म्हणूनच दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पण आपण तहान लागल्यावरच पाणी पितो, हे चुकीचे आहे, दिवसातून अनेक वेळा पाणी पिण्याची सवय लावा आणि मुख्यतः सकाळी रिकाम्या पोटी! यामुळे अनेक आजार टाळता येतात, पोट साफ होते आणि त्वचाही चमकते.

5. तणावाला बाय बाय म्हणा: तणाव हा तुमच्या आरोग्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुमच्या आयुष्यात कितीही समस्या असतील, तरीही तोंड पाडून बसू नका, त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी रहा. जर तुमची मानसिक स्थिती चांगली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणे साहजिक आहे. त्यामुळे जुन्या वर्षाबरोबरच तणावालाही निरोप द्या.

6. आहार नियमित व योग्य असावा: केवळ व्यायामामुळेच तुम्हाला फिटनेस मिळत नाही, तर त्यासोबतच तुम्हाला तुमच्या आहाराकडेही लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला असा आहार घ्यावा लागेल, ज्यामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण अधिक असेल, तसेच तेलकट अन्न आणि जंक फूडपासून दूर राहावे.

7. व्यसनापासून दूर राहा: जर तुम्हाला दारू, सिगारेट, तंबाखू यासारख्या गोष्टींचे व्यसन असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे काहीही झाले तरी, या वर्षातील पहिली गोष्ट म्हणजे या सर्व वाईट सवयी सोडणे. या सवयींमुळे तुमचे शरीर हळूहळू कमकुवत होत आहे. जर तुम्ही व्यसनाचे बळी असाल तर ते सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राची देखील मदत घेऊ शकता .

8. वजनावर नियंत्रण ठेवा: शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे लठ्ठपणा येतो. जागतिक आरोग्य संघटनेने स्थूलतेचा समावेश आरोग्यासाठी असलेल्या टॉप 10 धोक्यांमध्ये केला आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या वर्षी नियमित व्यायाम आणि योग्य आहाराद्वारे लठ्ठपणा कमी करण्याची शपथ घ्या.

9. तुमच्या करिअरची योजना करा: करिअरच्या महत्त्वाकांक्षा तयार करण्यासाठी अजून उशीर झालेला नाही आहे. तुम्ही ,मेहनत घेऊन तुमचे करिअर कधीही बदलू शकता, पण या क्षेत्राची आवड आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच निर्माण होते. त्यामुळे आतापासूनच तुमच्या करिअरच्या योजनांवर काम सुरू करा. हे काळानुसार बदलू शकते. करिअरची योजना बनवल्याने तुम्हाला चांगले आयुष्य जगायला मिळेल.

10. आरोग्य विमा घ्या: अनेक वेळा अचानक आजार किंवा अपघात झाला की एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यानंतर रुग्णालयातले बिल हे दिवसेंदिवस वाढतच जाते आणि पैसे पाण्यासारखे खर्च होतात, पण जर आरोग्य विमा असेल तर खूप दिलासा मिळतो. पण आरोग्य विमा घेतानाही अनेक गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून नंतर तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. तुमचा तुमच्या कंपनीचा आरोग्य विमा असला तरी, तुम्ही स्वतंत्र आरोग्य योजना घेणे आवश्यक आहे, कारण ती संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नसते आणि बर्‍याच वेळा कंपनीने दिलेल्या आरोग्य संरक्षणाचा लाभ नोकरी सोडल्यानंतर संपतो. त्यामुळे या नवीन वर्षात पूर्ण कुटुंबाचा आरोग्य विमा म्हणजे Health Insurance नक्की घ्या.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment