Sandeep Maheshwari information in Marathi | Sandeep Maheshwari Biography in Marathi
आजच्या या Sandeep Maheshwari information in Marathi लेखामध्ये, आम्ही तुम्हाला संदीप महेश्वरी यांच्या बद्दल अगदी त्यांच्या लहानपणापासून ते त्यांच्या करिअर पर्येंत सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्ही YouTube वर विडिओ बघत असाल तर तुम्हाला संदीप माहेश्वरी हे नाव माहित नाही असे होणार नाही. करोडो लोकांना प्रेरणा देऊन त्यांचे आयुष्य बदलणाऱ्या संदीप माहेश्वरीचे लहानपणापासूनचे आयुष्य कसे असेल याचे कुतूहल मला लागले आणि म्हणून या Sandeep Maheshwari Biography in Marathi घेऊन आलोय. संदीप ची खासियत ही आहे कि तो तुमच्या आमच्या सारखा सामान्य घरात जन्माला आलेला मुलगा. आज करोडपती तर झालाच पण नुसता पैशाच्या मागे न लागता करोडो लोकांना तो यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवत आहे, त्यांना नैराश्यातुन बाहेर काढायला मदत करत आहे, त्यांना करिअर व्यवसाय नोकरी साठी मार्गदर्शन करत आहे आणि हो ते हि अगदी मोफत म्हणजे एक रुपया हि न घेता. अश्या ह्या संदीप बद्दल आज आपण ह्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
पूर्ण नाव: | संदीप महेश्वरी (Sandeep Maheshwari) |
जन्म दिवस | 28 सितम्बर 1980 |
वय | 40 |
पत्नीचे नाव | Ruchi Maheshwari |
कमाई | Images Bazaar वेबसाइट वरून |
Images Bazaar चे नेट worth | जवळ जवळ 50 करोड रुपये |
कॉलेज | किरोरिमल कॉलेज, दिल्ली यूनिवर्सिटी |
शिक्षण | B.Com (Drop out) |
राशी | तूळ |
वडिलांचे नाव | रूप किशोर महेश्वरी |
आईचे नाव | शकुंतला रानी महेश्वरी |
Sandeep Maheshwari On Social Media
Social Media | Social Media Id | Social Media Followers |
Youtub | Sandeep Maheshwari | 13 मिलियन Subscribers |
Youtub | SandeepMaheshwariSpirituality | 804 k Subscribers |
sandeep__maheshwari | 1.5 मिलियन Followers | |
@imsandeepmahesh | 3317 Followers | |
SandeepMaheshwariPage | 11,268,263 Followers |
संदीप चे आयुष्य मी तुम्हाला ४ पॉईंट्स मध्ये सांगणार आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो कि तुम्ही त्याच्या प्रत्येक प्रसंगांबरोबर स्वतःला relate कराल. खर तर तुमच्या आमच्या सारखच आहे. YouTube वर त्याचे अंदाजे २०० आयुष्य बदलणारे व्हिडिओस आहेत. २ करोडच्या वर subscribers आहेत पण त्यांनी YouTube चे monetization चालू केलेले नाही. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो YouTube वर Monetization चालू केलं तर YouTube दर महिन्याला ज्याचं चॅनेल आहे त्याला YouTube ऍड दिसतात त्याचे पैसे देते. पण संदीप ने ते बंद ठेवले आहे आणि ते जर त्याने चालू केले तर संदीप ला किती पैसे भेटतील हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे.
जन्म आणि कुटुंब | Early Life of Sandeep Maheshwari in Marathi
संदीप माहेश्वरी चा जन्म २८ सप्टेंबर १९८० रोजी न्यू दिल्ली इथे एक मध्यम कुटुंबात झाला. लहानपणी संदीप खूप खोडकर आणि मस्तीखोर मुलगा होता. तो मुलांबरोबर मारामारी करायचा आणि मार पण खायचा. पण जस जस तो शाळेत पुढच्या वर्गात गेला तसा त्याचा आत्मविश्वास खूपच कमी होऊ लागला. तो स्वतःला कमी लेखू लागला. शाळेत त्याचे क्वचितच एखाद-दोन मित्र होते आणि एखादे दिवशी त्याचा मित्र सुट्टीवर असला कि संदीप एकदम घाबरून जायचा आपण एकटे पडले आहोत असे त्याला वाटायचे मग तो लांब झाडाखाली जाऊन डब्बा खायचा.
संदीप त्याच्या एक सेशन मध्ये सांगतो कि तो स्वतःला इतकं कमी लेखायचा कि त्याचे पॉसिटीव्ह गुण सुद्धा त्याला नेगेटिव्ह वाटायचे त्याला असे वाटायचे मी एवढा गोरा का आहे काळा का नाही, त्याचे केस तपकिरी रंगाचे होते त्याला वाटायचे काळे का नाही . दहावीत असताना त्याच्या वडिलांचा aluminum चा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे त्याच्या घरची आर्थिक अवस्था बिकट व्हायला लागली. मग संदीप ला वाटू लागले कि आपण सुद्धा घरात मदत केली पाहिजे. मग त्याच्या घरच्यांनी टाकलेल्या STD PCO बूथ वर तो बसू लागला आणि घरच्यांना जमेल तशी मदत करू लागला.
अकरावीमध्ये असताना संदीप ला वाईट मुलांची संगत लागली. मग तो त्या मुलांबरोबर सिगारेट ओढणे, गुटका खाणे, पान खाणे अश्या गोष्टी करू लागला. कसातरी तो बारावीत गेला. एकदा आपल्या मित्राबरोबर पानपट्टीच्या एका टपरी वर सिगारेट फुकत असताना त्याने त्याच्या मित्राला विचारले काय करणार आहे तू बारावीनंतर? तेव्हा त्याचा मित्र त्याला उत्तर देतो काही नाही यार ४-५ वर्ष एखाद्या डिग्री साठी प्रयत्न करेल आणि समजा काहीच नाही झालं तर वडिलांचा व्यवसाय सांभाळेल. तेव्हा संदीप च्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्याने विचार केला मी काय करणार बारावी नंतर. माझ्याकडे ना पैसे आहे ना माझ्या वडिलांचा मोठा व्यवसाय आहे आणि मी ह्या मित्रांबरोबर कित्ती दिवस फिरणार वेळ आल्यावर हे पण मला लाथ मारतील.
संदीप अस्वस्थ झाला, २-३ दिवस विचार केल्यानंतर संदीपला जाणवले कि आपली घरची परिस्थिती बिकट आहे आणि आपण असेच वागत राहिलो तर आपले आयुष्य वाया जाईल. तेव्हा मग त्याच्यात एक उर्मी जागृत झाली कि मी आयुष्यात काहीतरी करून दाखवणार. तेव्हापासून संदीप ने आजपर्यंत सिगारेट ला हाथ लावला नाही आणि मग बारावीत त्याने अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली आणि त्याला ८५% गुण मिळाले.
बारावीनंतर ३ वर्ष MBA करायची संदीप ची अजिबात इच्छा नव्हती कारण कि त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्याला लवकर असे काही करायचे होते कि income लवकर चालू होईल. मग त्याने १ वर्षाचा एक private कोर्स केला. कोर्स करताना त्याने अनेक छोटे-मोठे व्यवसाय केले जसे कि Liquid साबण बनवणे आणि तो विकणे पण हे व्यवसाय चालले नाहीत. त्याने कोर्स सुद्धा अर्धवट सोडला. लोक त्याला हसू लागले. मग त्याने कोडोइमल कॉलेज मध्ये कॉमर्स ला ऍडमिशन घेतले. कॉलेजला असताना त्याला modelling आणि फोटोग्राफी मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पण modelling मध्ये मॉडेल्स वर होणारा अन्याय पाहून त्याला वाईट वाटले.
मग त्याने मॉडेल च्या फोटो साठी Mash Audio Visual स्वतःची कंपनी चालू केली. हि कंपनी पण त्याला काही दिवसातच बंद करावी लागली . हे सगळे होत असताना संदीप ने एक MLM कंपनी जॉईन केली. तिथे तो सेमिनार्स अटेंड करू लागला . तेव्हा एका सेमिनार मध्ये त्याने पहिले कि २१ वर्षाचा एक मुलगा महिन्याला २.५ लाख रुपये कमवत होता हे बघून त्याच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला कि तो मुलगा करू शकतो तर मी सुद्धा करू शकतो पण काही दिवसातच ह्या कंपनी मधून सुद्धा तो बाहेर पडला. २ वर्ष कॉलेज केल्यानंतर त्याने कॉलेज सुद्धा अर्धवट सोडले.
कॉलज मधून बाहेर पडल्यानंतर संदिपनी आपल्या २ मित्रांबरोबर एक नवीन MlM कंपनी चालू केली. कंपनीला रिस्पॉन्स चांगला भेटला पण ६ महिन्यात पार्टनर्स सोबत झालेल्या मतभेदामुळे संदीपला बाहेर पडावे लागले आणि त्यात संदिपचे आर्थिक नुकसान झाले. मग संदीपने एक नेटवर्क मार्केटिंग वर पुस्तक लिहिले. ते पुस्तक पण चालले नाही पण संदीप हार मानायला तयार नव्हता. हे पुस्तक लिहिण्यासाठी संदिपनी मार्केटिंग मधली शेकडो पुस्तके वाचली होती ह्या ज्ञानाचा उपयोग संदीपला नंतर झाला. पुस्तक फेल गेल्यानंतर संदिपनीं परत फोटोग्राफी चालू केली. त्याने ७००० चा कॅमेरा विकत घेतला आणि फक्त ७ दिवसाचा फोटोग्राफीचा कोर्स केला. २००३ मध्ये त्यांनी १० तास ४५ मिनिटांमध्ये १२२ मॉडेल्स चे १०००० फोटोग्राफ्स घेतले आणि एक World रेकॉर्ड स्थापित केला आणि ह्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झाली . संदीपचे नाव झाल्यामुळे संदीपला चांगली कामे मिळू लागली.
इंटरनेट आणि काळाची गरज ओळखून संदीपने २००५ साली इमेजेस बाझार वेबसाइट बनवली. पण पहिले ७ महिने हि वेबसाइट एकदम स्लो असल्यामुळे काहीच व्यवसाय झाला नाही. वेबसाईट पूर्ण लोड होण्यासाठी ५-७ मिनटे घेत त्यामुळे कस्टमर्स ची चिडचिड होत. संदीपने ज्या कंपनी कडून वेबसाईट बनवून घेतली होती ते सांगत कि तुमच्या साईट वर इमेजेस असल्यामुळे साईट ला वेळ लागतो. संदीपला काय करावं सुचत नव्हते मग संदीपने स्वतः ऑफिस मध्ये सलग ८ दिवस २०-२० तास काम करून अंघोळ न करता प्रोग्रामिंग डाटाबेसे चे ज्ञान संपादन केले आपल्या वेबसाईट मध्ये कुठे कुठे समस्या आहे हे शोधून काढले आणि जी वेबसाईट लोड होण्यासाठी ५ ते ७ मिनटे घ्यायची ती आता काही सेकंदात लोड होऊ लागली आणि मग कस्टमर्स वाढू लागले नंतर संदीपने मागे वळून पाहिले नाही आज संदीपची इमेजेस बाजार भारतातली इमेजेस आणि व्हिडिओस असलेली जगातील नंबर एक ची कंपनी आहे.
आज ह्या वेबसाईट वर लाखो इमेजेस आणि व्हिडिओस आहेत ४५ देशांमध्ये ७००० पेक्षा जास्त clients आहेत. अंदाजे ह्या कंपनी ची वार्षिक उलाढाल १०० करोड पेक्षा जास्त आहे. संदीप माहेश्वरी ने जर ठरवले असते तर ह्या व्यावसायिक क्षेत्रात गुंतवणूक करून बरेच नवीन व्यवसाय त्याला चालू करता आले असते पण संदीपने देशाचा विचार केला. त्याने देशाच्या युवकांना बदलण्याचा निर्णय घेतला म्हणून तो आज पूर्ण भारतामध्ये फ्री मोटिवेशनल life changing सेमिनार्स करतो.
सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे त्याने जर YouTube चे monetization चालू केले तर तो वर्षाला ४० ते ५० लाख आरामशीर कमावेल म्हणजे महिन्याला ४ लाख पण तो ते करत नाही त्याचे म्हणने आहे कि तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल तर ते त्याला द्या ज्याला त्याची जास्त गरज असेल.
FAQ on Sandeep Maheshwari Biography in Marathi
Q. संदीप माहेश्वरी यांच्या पत्नीचे नाव काय आहे?
Ans. रुची माहेश्वरी
Q. इमेजेस बाजार या कंपनीचे CEO कोण आहेत?
Ans. संदीप माहेश्वरी
Q. संदीप माहेश्वरी यांच्या बहिणीचे नाव काय आहे?
Ans. शिवानी माहेश्वरी
Q. संदीप माहेश्वरी यांच्या आई व वडीलांचे नाव काय आहे?
Ans. रूप किशोर माहेश्वरी आणि शकुंतला राणी माहेश्वरी
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Sandeep Maheshwari information in Marathi | Sandeep Maheshwari Biography | संदीप माहेश्वरी) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा: Indira Gandhi Biography in Marathi
हे देखील वाचा: Information about about Ratan Tata in Marathi
1 thought on “Sandeep Maheshwari information in Marathi | Sandeep Maheshwari Biography in Marathi”