Teacher day Information in Marathi शिक्षक दिन विशेष 2022

आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा स्मृतिदिन. हा दिवस आपल्या भारतात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १८८८ रोजी डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉ. राधाकृष्णन हे एक शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती ही होते. त्यांचा स्मृतिदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या दिवशी शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जातो. शिक्षकांचा सन्मान करण्याची ही परंपरा जुनी आहे. शिक्षक म्हणजे तरी काय?

शि म्हणजे शिल
क्ष म्हणजे क्षमा
क म्हणजे कला
ज्याच्याकडे शिल, क्षमा आणि कला याचा त्रिवेणी संगम आहे तो म्हणजे शिक्षक. डी. एड किंवा बी.एड ची डिग्री घेऊन आपण आपल्या नावापुढे शिक्षक हे लेबल पण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की खरंच झालोय का मी शिक्षक?

खरं तर शिक्षक हा लाखो करोडो मन घडविणारा शिल्पकारच! कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन मडकं घडवत असतो तेच काम शिक्षकाच आहे. काही लोक बोलताना माझे विद्यार्थी असा उल्लेख करतात. त्यात चुकीचं काहीच नाही पण माझी मुलं कानाला ऐकायला जास्त बरं वाटतं. माझी मुलं म्हणण्यात जो गोडवा आहे तो विद्यार्थी म्हणण्यात नक्कीच नाहीये. असो हा वादाचा मुद्दा आहे.

शिक्षक असणं हा नोकरी व्यवसायाचा भाग म्हणून पाहिलं तर आपण एक आदर्श शिक्षक कधिच बनू शकणार नाही. जोवर शाळेतील मुलांना आपण आपली मुलं म्हणून पहात नाही तोवर आपण शिक्षक झालो असं म्हणतात येणार नाही. मागे कोणीतरी म्हंटलेलं ऐकलं की शाळेतली मूलं आहेत म्हणून आपली मुलं शिकतात मी तर म्हणेन ती मुलं आहेत म्हणून आपली मुलं जेवतात. आपलं पोट भरण्याचं साधन जर आपली नोकरी असेल तर आपली मुलं त्याचा पाया आहे. शेवटी काय हो मुलं आहेत म्हणून शाळा आहे आणि शाळा आहे म्हणून आपण आहोत. हे असंच सूत्र आहे. मग आपलं काम तेवढ्याच आत्मीयतेने, प्रामाणिकपणाने करणं क्रमप्राप्त आहे.

पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आपण आदर्श नको बनुयात. आपण आपल्यालाच आदर्श घालून घेतला तर पुरस्कार काय हो लाखो सत्कारमूर्ती तयार करू शकतो. कधीतरी आपल्या शाळेतला एखादा जुना मुलगा भेटतो आपल्याला बऱ्याच वर्षांनी आणि त्याचं यश ऐकत असताना आपसूकच उर भरून येत असतो आपला. अहो मग हाच तर सर्वोत्कृष्ट पुरस्कार असतो अपल्या आयुष्यातला.

असे अनेक पुरस्कार मिळवण्यासाठी आणि आपलं काम प्रामाणिकपणे करण्यासाठी सर्व शिक्षक मित्रांना खूप खूप शुभेच्छा!!

2 thoughts on “Teacher day Information in Marathi शिक्षक दिन विशेष 2022”

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.