नेट बँकिंग म्हणजे काय आणि वापर कसा करावा? | Information about Net Banking in Marathi
What is Net Banking in Marathi: आता बरेच लोक हे मोबाईल वरून युपीआय वापरून पेमेंट करायला लागले आहेत परंतु याला नेट बँकिंग म्हणायचे का? तर नाही! याला तुम्ही नेट बँकिंगचा एक भाग मात्र म्हणू शकता. आज आपण या लेखाच्या माध्यमातून खरोखर नेट बँकिंग म्हणजे काय असते आणि नेट बँकिंग कसे वापरतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
नेट बँकिंग म्हणजे काय? | What is net banking in Marathi?
जेव्हा आपण बँक मध्ये आपले खाते उघडतो त्यानंतर ATM कार्ड चा फॉर्म भरून देत असताना आपल्याकडे Internet Banking हे एक ऑप्शन देखील असते आणि जर आपण त्याला apply केले तर तुमचे देखील Net Banking चे खाते तयार होते. सध्या ATM मध्ये जाऊन पैसे काढण्यापेक्षा UPI वापरून पैसे इकडे तिकडे पाठवले जातात आणि त्याचप्रमाणे UPI येण्याच्या आधीपासून पैशांची देवाणघेवाण करणे, बँकेचे व्यवहार करणे मग त्यात फंड ट्रान्सफर करणे, बिल्स भरणे, बँकेतील सुविधांना ऑनलाइन apply करणे यासाठी नेट बँकिंग ही सुविधा होती. आजही नेट बँकिंगचा वापर अनेक लोक करत असतात.
सोप्या भाषेत सांगायचे झालेच तर बँकेचे सर्व व्यवहार आपल्याला या नेट बँकिंगच्या माध्यमातून घर बसल्या इंटरनेटच्या सहाय्याने करता येतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला बँकेत जाण्यास वेळ नसेल तर जवळपास बँकेचे सर्व काही व्यवहार आणि Applications तो घर बसल्या इंटरनेटच्या सहाय्याने करू शकतो.
नेट बँकिंगला आपण ऑनलाइन बँकिंग, इंटरनेट बँकिंग किंवा व्हर्च्युअल बँकिंग या नावाने देखील ओळखतो. जवळपास आता सर्व बँका ही सुविधा त्यांच्या ग्राहकांना देत असतात. यामध्ये तुम्हाला बँकेच्या साईटवर तुम्हाला मिळालेल्या युझर आयडी आणि पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करायचे असते. एकदा तुम्ही लॉगिन केले की तुमच्या बँकेचे पोर्टल तुमच्या समोर ओपन होईल. त्यावर दिलेल्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून तुम्ही सहज बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता.
नेट बँकिंग कशी सुरू करतात? How to start a Net Banking Account in Marathi?
नेट बँकिंगचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुमचे एखाद्या बँकेत खाते असायला हवे. जर तुमचे त्या बँकेत खाते नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा खाते खोलावे लागेल. आता जवळपास सर्व बँका या ग्राहकांच्या सेवेसाठी एक ग्राहक सेवा प्रतिनिधी शाखेत बसवतात. त्याची भेट घेऊन तुम्ही खाते उघडू शकता.
तुम्ही खाते असलेल्या बँकेत गेल्यानंतर तिथे Net Banking साठी लागणार फॉर्म भरून द्यावा. काही बँक या फॉर्म भरून दिल्यानंतर ग्राहकाला लगेच User Id आणि Password देतात तर काही बँक या तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर काही वेळात ती माहिती पुरवत असतात. एकदा तुम्हाला तो USER ID आणि Password मिळाला की तुम्ही तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग साठी असणाऱ्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करू शकता.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमची काही माहिती भरावी लागेल. यात जन्म तारीख, खाते क्रमांक, ATM कार्ड क्रमांक या काही सर्वांसाठी सारख्याच असणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला बँकेविषयी काही माहिती विचारलेली असेल तर ती पासबुक वर मिळून जाईल. इथे माहिती देत असताना ती सर्व योग्य आहे ना याची तुम्ही खात्री करून घ्यावी जेणेकरून पुढे तिच्यात बदल करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही.
एकदा सर्व काही भरल्यानंतर तुमचे इंटरनेट बँकिंगचे खाते सुरू होईल. बँकेने दिलेला पासवर्ड हा तुम्ही लगेच बदलून घेणे अधिक सुरक्षित असेल.
नेट बँकिंगचे फायदे | Benefits of Net Banking in Marathi
1 Net Banking म्हणजे इंटरनेट च्या माध्यमातून बँकेचे व्यवहार करणे. नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही जवळपास सर्वच बँकेचे व्यवहार हे घर बसल्या करू शकता.
2 Credit कार्ड, Check Book किंवा संपलेले पासबुक पुन्हा घेणे यासाठी आवेदन द्यायचे काम तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या शाखेत न जाता देखील करू शकता.
3 तुमच्या पासबुक वर बँक तुम्हाला तुमचे सर्व जुने Transaction प्रिंट करून देते असे नाही. जर तुम्ही वेळोवेळी बँकेत गेला नाही तर तुमच्या पासबुक वरून जुने काही व्यवहार हे गायब करून मग प्रिंट करून दिले जातात परंतु जर तुम्हाला तुमचे जुने सर्व व्यवहार बघायचे असतील तर नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता.
4 तुमच्या अकाउंट मध्ये किती राशी शिल्लक आहे हे देखील नेट बँकिंगच्या माध्यमातून सहज बघता येते.
5 ज्याप्रमाणे आपण आता UPI म्हणजे Google Pay किंवा PhonePe च्या माध्यमातून पेमेंट करतो अशाच प्रकारे कोणत्याही वेबसाईटवर जिथे शॉपिंग करता येते किंवा काही गोष्टी ऑनलाइन विकत घेता येतात तिथे आपण नेट बँकिंग वापरून पेमेंट करू शकतो. मुख्यतः ऑनलाइन फॉर्म भरताना त्याचे पेमेंट हे नेट बँकिंग ने अधिक सुरक्षितपणे करता येते.
6 नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही सहज पैसे पाठवू शकता. किंवा पैसे घेऊ देखील शकता.
7 मोबाईल किंवा डिटीएच रिचार्ज, गॅस बिल, लाईट बिल, fast tag रिचार्ज यासारख्या सर्व गरजेच्या सुविधा नेट बँकिंग मध्ये उपलब्ध आहेत.
8 आपल्याला जर FD किंवा RD करायची असेल तर आपल्याला आधी बँकेत जावे लागायचे परंतु आता तुम्ही नेट बँकिंगच्या माध्यमातून FD/RD खाते देखील खोलु शकता आणि त्यावर व्यवहार देखील ऑनलाईन करू शकता. याचा एक फायदा हा होतो की RD खात्यात आपल्याला जी रक्कम तिथे बँकेत जाऊन भरावी लागते ती नेट बँकिंग सुविधा सुरू असेल तर आपोआप कट होऊन त्या RD खात्यात जमा होते.
नेट बँकिंग वापरताना घ्यावयाची काळजी | Safety Majors while using Net Banking in Marathi
1 नेट बँकिंग वापरताना तुम्हाला बँकेने दिलेला आयडी पासवर्ड हा लगेच बदलून घ्यावा. पासवर्ड टाकत असताना त्यात Capital Letter, Small Letter, Special Character आणि Number यांचा समावेश असणे गरजेचे आहे.
2 पासवर्ड हा जन्मतारीख व नाव यांचे साधे कॉम्बिनेशन ठेवू नये. हॅकर असे पासवर्ड सहज हॅक करतात आणि तुमच्या खात्यातून मग ते काहीही व्यवहार करू शकतात.
3 वेळोवेळी पासवर्ड मध्ये बदल करत रहा जेणेकरून आपले नेट बँकिंग अधिक सुरक्षित आणि सुखकर असेल.
4 नेट बँकिंग खाते फक्त आपल्या स्वतःच्या मोबाईलवर किंवा डेस्कटॉप लॅपटॉप वर लॉगिन करत जा, कधीही एखाद्या पब्लिक वायफायवर किंवा एखाद्या पब्लिक कॉम्प्युटर वर म्हणजे मग तो सायबर कॅफे असेल किंवा शाळेतील किंवा कॉलेजच्या लॅब मधील कॉम्प्युटर असेल, तिथे मात्र नेट बँकिंग लॉगिन खाते करू नका.
5 तुमचे नेट बँकिंग खाते जर एखाद्याला समजले आहे म्हणजे त्याने ते लॉगिन केले आहे अशी शंका जर तुम्हाला आली तर लगेच बँकेच्या शाखेशी संपर्क करून त्याविषयी पाऊल उचलावे जेणेकरून तुमच्या खात्यातील रक्कम सुरक्षित राहील.
6 तुमच्या कॉम्प्युटर मध्ये नेट बँकिंग वापरत असताना Anti Virus टाकलेला असेल तर योग्यच राहील कारण यामुळे तुमचे नेट बँकिंग खाते malware attack पासून सुरक्षित राहू शकेल. नेट बँकिंग वापरत असताना firewall protection नेहमी ऑन ठेवावे.
7 सर्वात महत्वाचे म्हणजे कोणतीही बँक तुम्हाला तुमचा हा लॉगिन आयडी आणि पासवर्ड किंवा तुमच्या मोबाईल वर येणारा OTP किंवा तुमच्या ATM कार्ड विषयी माहिती विचारत नाही. त्यामुळे तुम्हाला असा एखादा कॉल आल्यास त्यांना ही माहिती न देता बँकेशी संपर्क करून ज्या क्रमांकावरून फोन आला त्याविषयी बँकेला माहिती द्यावी.
Conclusion
नेट बँकिंग हा विषय तुमचे काम जितके सोपे करतो त्यात तितका धोका देखील आहे. अनेक असे प्रकार समोर येत आहेत ज्यामध्ये लोकांची ऑनलाइन फसवणूक केली जाते आहे. त्यामुळे तुम्ही जरी नेट बँकिंग वापरायचा विचार करत असाल तर सावधान! सुरक्षितता बाळगली तर तुमचा नेट बँकिंगचा प्रवास हा अधिक सुखकर होऊ शकेल.
best netbanking information