या नवीन लेखात आम्ही घेऊन आलो आहोंत तुमच्यासाठी खास नवीन , सोपे आणि छोटे उखाणे जे अगदी सहज तुमच्या लक्षात राहतील.
Are you looking for small, easy to remember, marathi ukhane. Then you are at right place . Here we upload everytime new, latest marathi ukhane, different marathi ukhane, home minister special marathi ukhane for bride and groom.
आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर
अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
…. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
.. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
—- रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
…. चं नाव घेते कुंकू लावून.
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
इंग्रजीत म्हणतात मून,
…. चं नाव घेते …. ची सून
हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.
परसात अंगण, अंगणात तुळस,
…. नाव घ्यायचा मला नाही आळस.
रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
…. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.
चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
…. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.
लग्नात लागतात हार आणि तुरे,
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे
बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले
लवर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
—– चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
शेल्या शेल्याची बांधली गाठ,
…….नाव मला तोंडपाठ.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..
सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात .. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!
कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
पिंपळाच्या झाडाखाली हरण घेते विसावा ,
—– रावांचे नाव घेते तुमचा आशिर्वाद असावा !
बटाट्याच्या भाजीला खोबरे टाकते किसून,
—- राव गेले रुसून तर त्यांना आणते फटफटी वर बसून
खनावर खन चौकडा खन,
—– रावांचे नाव घेते, तिळसंक्रातीचा सण
राम लक्ष्मण सीता , तिन्ही मूर्ती साक्षात ,
—— रावांचे नाव घेते नीट ठेवा लक्षात !
पाऊस आला चिखल झाला, चंद्र गेले ढगात ,
साहेबरावांचं नाव घेते जन्म घेतला जगात !
सायकल ची घंटी ऐकू आली दुरून
—– राव आले फिरून त्यांना पेला देते भरून
जात होती फुलाला, पदर अडकला वेलीला
—– रावांनी फासा टाकला पाटीलांच्या मुलीला
गुलाबाचे फुल उगवले तळ्यात ,
—— रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात !
इंग्रजी शाळेत मुले खेळत होते गेम,
—– रावांनी प्रश्न विचारला व्हॉट इस युअर नेम?
साडी घालते फॅशन ची पदर लावते साधा ,
——राव माझे कृष्ण तर मी त्यांची राधा
लांब लांब केसांची वेणी घालते दाट ,
——- रावांचे नाव घेते पाच मिनिटाच्या आत
लाल लाल टरबूज त्यात काळ्या काळ्या बिया
——— पिक्चर दाखवला मैने प्यार किया
सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.
वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा
…रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.
सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.
करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.
प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.
प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,
…रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.
निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,
…रावांवर आहे माझा विश्वास.
सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
…रावामुळेच लागला मला त्याचा लळा.
शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.
मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रुप मला फार आवडले,
आज सारे सुख माझ्या दारी दाटले,
…रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.