Ukhane in marathi for female | Navariche Ukhane | नवरीचे उखाणे

लग्नाला जाताना उखाणे नक्की लक्षात ठेऊन जा, नाहीतर नातेवाईक तुमची वाट नक्कीच आडवतील. या लेखाच्या माध्यमातून आम्ही नवरीमुलीसाठी छान छान उखाणे सांगणार आहोत. तर लग्नाला किव्हा सणाला जाताना यातील तुमच्या आवडीचे ३-४ उखाणे तरी नक्की लक्षात ठेवा.

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप,
…. रावां समवेत ओलांडते माप

सोन्याच्या अंगठीवर नागाची खुन,
…. रावांचे नाव घेते …. ची सुन

कामाची सुरवात होते श्रीगणेशापासून,
…. रावांचे नाव घेण्यास, सुरवात केली आजपासून

साजूक तुपात नाजूक चमचा,
…. रावांचे नाव घेते, आशीर्वाद असु दे तुमचा

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
…. रावांचे नाव घेते …. च्या लग्नाच्या दिवशी

रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
…. रावांचे नाव घेते असु द्या लक्षात

महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकुन,
…. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखुन

जेजुरीचा खन्डोबा, तुळ्जापुरची भवानी,
…. रावांची आहे मी अर्धांगिनी

पौर्णिमेचा दिवस, चंद्राला लागते चाहूल,
…. रावांच्या जीवनात, टाकते मी पहिले पाऊल

श्रीकृष्णाने लिहिली भगवतगीता,
…. राव माझे राम, तर मी त्यांची सीता

विरह वाढविणारा अंतरपाठ क्षणात झाला दूर,
…. आणि …. च्या संसारात ऐकू येतील फक्त प्रेम सनइचे सूर

पती पत्नीचे नाते म्हणजे फुले अबोलीची,
…. च्या नावाला जोड मिळाली …. रावांच्या नावाची

दारा पुढे काढली रांगोळी फुलांची,
…. चे नाव घेते, नवी सून …. ची

नाव घे, नाव घे, आग्रह कशाचा,
…. रावांचे नाव ओठात, प्रश्न असतो उखाण्याचा

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
…. च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले

…. ची लाडकी लेक झाली, …. ची सून,
…. रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून

कळी उमळळी खुद्कन हसली, स्पर्श झाला वाऱ्याचा,
…. रावांचे नाव घेते, असावा आशीर्वाद सर्वांचा

नेत्राच्या निरंजनी अश्रूंच्या वाती,
…. साठी सोडली माझ्या माहेरची नाती

जिथे सुख शांती समाधान, तिथे लक्ष्मीचा वास,
… रावांना भरविते श्रीखंडाचा घास

Leave a Comment