Jeshth Nagrik Marathi Ukhane | जुन्या पिढीचे खास उखाणे । Old Age Ukhane In Marathi

वय जरी सरलं तरी नवरा बायको मधील प्रेम काही कमी होत नाही, उलट वयानुसार ते वाढत जातं आणि ते नातं अतूट होत. चला तर मग बघूया अशीच जेष्ठ नागरिकांसाठीचे काही खास उखाणे

Best Marathi Ukhane For Jeshth Nagrik who travel together a long journey. So New Marathi Ukhane on their lifestyle.

बघता बघता संसाराची __ वर्ष सरली
__च्या साथीने माझी, आनंदवेल बहरली

वयामुळे थकले अंग , तरीही मन ताजे
__माझी राणी आणि आम्ही तिचे राजे

उखाणे घेता घेता, सरली 50 वर्ष
__रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष

नाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे
__सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आ

प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी
__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी

बघता बघता __ सोबत 50 वर्षे लोटली
रोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली

हसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार
__सोबत मी वयाची, शंभरी गाठणार

म्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार
__मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार

__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू
__इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू

वय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं
__वरचं प्रेम, तरी अजिबात नाही आटलं

औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी
__रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी

माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात
__चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात

__मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु
हसत खेळत आम्ही आता __टूर करू

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो
तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो

केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी
माझ्या संसारवेलीचे __राव माळी

थोडं चाललं तरी, दुखतात गुढग्याच्या वाट्या
__मुळे तरलो आजवर, झेलीत सुख दुःखाच्या लाटा

झाले आता वय, जवळ आली साठी
शंभरी नक्की गाठेन, __चे प्रेम असता पाठी

पन्नाशी झाली, साठी झाली, आली आता सत्तरी
वय झाले, आता तरी थांबवा, तुमची चेष्टा- मस्करी

Leave a Comment