Dohale Jevan Ukhane in Marathi | डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे

⇒ मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;
——— रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

⇒ माझ्या सासर – माहेरची , लोकं सारी हौशी;
———- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.

⇒ हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
———- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस

⇒ मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
———- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल.

⇒ मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
———- रावां चे नाव घेते, केला थाटमाट

⇒ आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
———- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.

⇒ तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
———- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.

⇒ घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
———- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे

⇒ पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
——– रावांचे नाव घेते भरली माझी ओटी.

⇒ वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज.

⇒ कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
——– रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.

⇒ फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
——– रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी.

⇒ सरस्वतीच्या मंदिरात साहित्यांच्या राशी;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

⇒ देव्हाऱ्यात देवापाशी मंद ज्योत तेवते;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

⇒ हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा;
——– रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंव्हा पेढा

⇒ डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका;
——– रावांचं नाव घेते लक्ष देऊन ऐका.

⇒ थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केल आज ;
——– रावांनी मला घातला साज

⇒ गोप-गोपिकांना करते धुंद कृष्णाची बांसरी;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे सासरी.

⇒ नाटकात नाटक गाजले सुभद्रा-हरण;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण.

⇒ कृष्णाच्या गायींना चरायला हिरवे-हिरवे कुरण;
——– रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण

⇒ सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात;
——– रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला थाटात.

⇒ वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त,
——– रावांचं नाव घ्यायला कारण लाभल मस्त

⇒ पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण,
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण.

⇒ श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा;
——– रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा.

⇒ पाच सुवासिनींनी भरली पाच फळांनी ओटी;
——– रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.