Are you suffering from hair loss or having dandruff in hair? Then here you will get solution on dandruff in marathi. Also treatments on dandruff in marathi. With these Home Remedies for dandruff your hairs will become strong.
आपण सर्वच आपल्या केसांची निगा ठेवतो, पण तरी देखील केसांमध्ये काही ना काही समस्या होतात. केसात कोंडा होणे, केसांचे गळणे, केस सफेद होणे इत्यादी. सगळ्यात जास्त जी समस्या होते ती म्हणजे केसात कोंडा होणे. कोंडा म्हणजेच dandruff. कोंडा आपल्या केसांसाठी हानिकारक असतो. आपले केस काळे, लांब, दाट असावेत यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील वेग वेगळे उपाय करत असतात. सगळ्यात आधी जाणून घेवूयात केसांमध्ये कोंडा का होतो व त्याची कारणे. केसांची योग्य प्रकारे निगा न ठेवल्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो. सगळ्यात जास्त केसात कोंडा थंडीच्या दिवसांमध्ये होतो कारण थंडीमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो त्यामुळे केसांमध्ये कोंडा होतो.
संक्रमणामुळे देखील केसात कोंडा होतो. कारण आपल्या डोक्याच्या त्वचे मध्ये मृत कोशिका असतात. ज्यांना डेड स्कीन सेल्स देखील म्हणतात. कान, नाक, चेहरा, पोट, पाठन येथे देखील हि समस्या होऊ शकते. आपल्या डोक्यात जर कोरडेपणा व खाज होत असेल तर याचा अर्थ असा होतो कि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे काम करत नाही आणि एनीमा हा रोग झाल्यामुळे देखील त्वचेत कोरडेपणा येऊन आपल्या केसांमध्ये कोंडा होतो.
केसांना पर्याप्त मात्रेत पोषण न मिळाल्यामुळे देखील कोंडा होतो. त्याचबरोबर जास्त तेलकट पदार्थ, तिखट व कमी पाणी प्यायल्यामुळे देखील कोंडा होतो. तसेच आपण केसांना झटपट सुंदर करण्यासाठी केमिकल युक्त कॉस्मेटीक प्रोडक्टस चा वापर करतो, यांच्या परिणामांमुळेमुळे देखील कोंडा होऊ शकतो.
जर आपल्या केसात कोंडा होत असेल आणि सारखी सारखी केसात कोंड्यामुळे खाज सुटत असेल तर हि एक गंभीर समस्या होऊ शकते. आपल्या केसात अजून इतर समस्या होऊ लागतात. जर आपल्याला या समस्यां मुळापासून नष्ट करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय करून पहा. यामुळे आपल्या केसातील कोंडा व कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस जाड, मोठे, दाट आणि सुंदर होतील.
१. लिंबू (Lemon For Dandruff) :
लिंबू आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. ३ ते ४ लिंबू घ्या व त्यांची साले काढून त्यांना जवळ जवळ अर्धा लिटर पाण्यात १५ ते २० मिनटासाठी उकळवा व नंतर पाणी थंड झाल्यावर हा पाणी आठवड्यातून २ वेळा आपल्या केसां मध्ये लावा. असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील.
२. मेथी (Methi Seeds For Dandruff) :
मेथी मुळे आपले अनेक रोग बरे होण्यास मदत होते. जर आपल्याला आपले केस मजबूत करायचे असतील व कोंडा घालवायचा असेल तर २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व सकाळी हि मेथी वाटून घ्या व याची पेस्ट बनवा आणि हि पेस्ट कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्या केसांमध्ये व डोक्यात लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर आपले केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या. असे महिन्यातून कमीत कमी ३ ते ४ वेळा करा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा नाहीसा होईल.
अंघोळ करायच्या आधी जर आपण केसांमध्ये लिंबाच्या रसाने मालिश करत असाल तर यामुळे आपल्या केसातील चिकटपणा दूर होईल आणि आपले केस चमकदार होतील. विनेगर (सिरका) व पाणी समान मात्रेत एकत्र मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा व सकाळी आपले केस स्वच्छ धुवा असे केल्याने आपल्या केसातील कोंडा दूर होईल.
३. दही (Yogurt For Dandfruff) :
दही आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे. आपल्या केसात थोडा दही कमीत कमी एका तासासाठी लावून ठेवा व नंतर केस नीट धुवून घ्या, असे केल्याने आपल्याला फरक जाणवेल. आपल्याला हि प्रक्रिया आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यानें फायदा होईल.
४. अंडा (Egg For Dandruff):
अंडा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी असतो, अंडा खाल्याने आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमी दूर होते. तसेच अंडा आपल्या केसांसाठी देखील फायदेमंद आहे. अंड्याची पेस्ट बनवून आपल्या केसांमध्ये लावा यामुळे आपल्या केसातील कोंडा दूर होईल. आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. तसेच आपले केस चमकदार व दाट होतात यामुळे आपल्या केसांचे गळणे थांबते.
५. केसांमध्ये बदामाचा तेल किंवा नारळाचा तेल किंवा जैतून चा तेल गरम करून आपल्या केसांमध्ये मालिश करत असाल तर आपल्या केसातील कोंडा दूर होईल.
मालिश केल्यावर आपले केस तसेच ठेवावेत. असे केल्याने आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल. केस लांब व घनदाट होतील. तसेच ५ चमचे नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिळवा आणि हा मिश्रण आपल्या केसांमध्ये लावा. सफरचंद व संत्रे बरोबर मात्रेत घेवून याचा लेप बनवा आणि आपल्या डोक्याला लावा आणि हा लेप २० ते ३० मिनिटांसाठी तसाच लावून ठेवा आणि नंतर केस स्वच्छ धुवून घ्या आपले केस मुलायम व कोंडामुक्त होतील.
६. कडुलिंब मध्ये खूप सारे औषधी गुण असतात ज्यामुळे आपले अनेक रोग बरे होतात. कडुलिंब ची पाने बारीक वाटून घेवून त्याची पेस्ट बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसातील कोरडेपणा, पांढरे केस यासारखी समस्या दूर होईल आणि आपले केस लांब, दाट व कोंडामुक्त होतील.
७. तुळस देखील आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे. तुळशीची पाने व आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिळवा आणि याचा लेप बनवा आणि या लेपाने आपल्या केसांची मालिश करा. अर्ध्या तासासाठी असेच ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. आपल्याला फायदा होईल.
आपल्या केसातील कोंडा दूर करण्यासाठी २ चमचे लसून पावडर, एक चमचा लिंबाच्या रसात मिळवा आणि त्याचा लेप बनवा आणि हा लेप आपल्या डोक्यात लावा. जवळ जवळ ४० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस स्वच्छ धुवून घ्या असे केल्याने आपले केस लांब, दाट होतील आणि आपल्या केसातील कोरडेपणा दूर होईल.
८. केसांसाठी रीठ्या पासून बनलेला साबण खूप उपयोगी असतो. रिठा पावडर घ्या व लेप बनवा आणि आपल्या केसांमध्ये लावा आपल्या केसांमधील कोंडा दूर होईल. तसेच कांद्याचा रसामध्ये आल्याच्या रस मिळवा व यात बीट मिळवा आणि तिघांना चांगल्या प्रकारे वाटून घ्या आणि लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये रात्रभर लावून ठेवा. सकाळी आपले केस स्वच्छ धुवून घ्या जर आपण असे ४ ते ५ रात्र करत असाल तर आपल्या केसातून कोंडा दूर होईल. बेसन ला दही सोबत मिळवा व लेप बनवा आणि हा लेप आपल्या केसांमध्ये २० मिनिटांसाठी लावून ठेवा व नंतर केस चंगल्या प्रकारे धुवून घ्या आपल्या केसातील कोंडा दूर होईल.
९. बेकिंग सोडा देखील आपल्या केसांसाठी उपयोगी आहे. केस धुताना केसांमध्ये चिमुटभर बेकिंग सोडा मिळवा, बेकिंग सोड्यामुळे कोंडा दूर होतो. रोजमेरी ची पाने विनेगर सोबत पिळून घ्या व आपल्या केसांमध्ये १५ ते २० मिनीटान साठी लावा आणि नंतर केस धुवून घ्या असे केल्याने आपल्या केसांसाठी फायदेमंद ठरेल. तसेच रोजमेरी चा तेल व नारळाचा तेलाच मिश्रण देखील लावू शकतो व आपले केस धुवून घ्या हे काही घरगुती उपाय आहेत ते करून पहा.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.