Remedies To Remove Pimples in Marathi | पिंपल्स घालवायचे उपाय

पिंपल्स येणे हि एक सामान्य बाब आहे. ते कोणाच्याही चेहऱ्यावर येऊ शकतात, पण प्रत्येकजण स्वत: सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. जेंव्हा आपल्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स होतात, तेंव्हा आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेत कमतरता येते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना पिंपल्स खूप वेळा येतात. जर ते पिंपल्स हाताने फोडले तर चेहऱ्यावर खड्डे पडतात. चेहऱ्यावर पिंपल्स होण्याचा कारण म्हणजे आपला आहार घेण्याच्या पध्दती आणि आपल्या शरीरात वाढलेली गर्मी.

जर आपल्याला आपला चेहरा पिंपल्स रहित ठेवायचा असेल तर आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलायला हवेत. हिरव्या पालेभाज्या आणि पोषक तत्व युक्त आहाराचे सेवन केले पाहिजे. चेहऱ्या वरचे पिंपल्स घालवण्यासाठीचे उपाय खूप सोपे आहेत. पिंपल्स हे जास्त करून किशोरवयात (तरुणवयात ) होतात. या वयात एन्द्रोजन हार्मोन चा अधिक स्त्रवण होतो त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉन, डीहाईड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) आणि डीहाईड्रोएपीईड्रोस्टेरॉन सल्फेट सारखे हार्मोन स्त्री व पुरुषांमध्ये उत्पन्न होतात, ज्यामुळे पिंपल्स येतात. चेहऱ्यावर रोम कूप च्या आत वासामय ग्रंथींची वाढ होते आणि मृत कोशिकांच्या मुळे त्या अजून वाढतात. यात कोणत्याहि सामान्य जीवाणू (propionibacterium acne) ची वाढ होऊ शकते. या जीवाणूंच्या संक्रमणामुळे पिंपल्स होतात.

आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी आणि वेळेवर आपल्या त्वचेला क्लीनअप , स्क्रब आणि मॉंइच्छराईज करायला हवे. यासाठी आपण आपला चेहरा कडुलिंबाच्या पाण्याने धुऊन घ्या. चेहरा धुउन झाल्यावर मॉंइच्छराईजर क्रीम लावा. आपल्या त्वचेच्या जरुरती नुसार आठवड्यातून चेहऱ्याची एक दोन वेळा स्क्रबिंग करा यामुळे आपल्याला फायदा होईल.

बेकिंग सोड्याच्या वापराने आपल्याला खूप फायदा होईल. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळवा आणि हा मिश्रण कापसाच्या बोळ्याला लाऊन हळू हळू आपल्या चेहऱ्या वर ज्या ठिकाणी पिंपल्स झालेत त्या ठिकाणी लावा. हे आपल्या चेहऱ्या वर कमीत कमी १० मिनिट लाऊन ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या. असे दिवसातून दोन वेळा जरी केलेत तर पिंपल्स कमी होतील. जर आपल्या चेहऱ्या वर असे केल्याने झोंबत असेल तर चेहरा लगेच पाण्याने धुवून घ्या.

लिंबाचा उपयोग आपल्यासाठी फायदेमंद आहे कारण हे सोप आहे व कमी खर्चिक आहे. लिंबू कापून घ्या आणि कापलेला लिंबू पिंपल्स झालेल्या भागावर लावा. जर आपल्याला झोंबत असेल तर घाबरू नका कारण हा खूप चांगला उपाय आहे. कारण यात साईट्रिक एसिड असत आणि हे पिंपल्स तयार करणारे जीवानुना मारून टाकत. नंतर चेहरा धुवून घ्या. बाहेर जायच्या आधी सनस्क्रीन लाऊन बाहेर पडा कारण लिंबा मध्ये साईट्रिक एसिड असतो त्यामुळे आपला चेहरा झोंबू शकतो म्हणून सनस्क्रीन लावल्याने आपला चेहरा झोंबणार नाही.

कच्चा बटाटा जसा आपल्या आहाराचा स्वाद वाढवतो तसाच आपण याचा उपयोग पिंपल्स वर देखील करू शकतो, यामुळे आपल्याला होणाऱ्या त्वचा रोगांवर कारगर ठरतो. यासाठी बटाटा कापून ज्या ठिकाणी पिंपल्स झालेत त्या ठिकाणी लावा. बटाटया मध्ये असलेले एन्टी-इनफ्लामेंटरी गुण जखम भरण्यास मदत करतात. बटाटा आपल्या चेहऱ्या वर ५ ते १० मिनीटान साठी तसेच ठेवा आणि थंड पाण्याने धुवून घ्या. असे आपण आठवडाभर करत असाल तर आपल्या चेहाऱ्यावरचे पिंपल्स जातील व आपला चेहरा चमकदार होईल.

चहा पिणे सगळ्यांनाच आवडते, पण चहाच्या पानांचा तेल खूप गुणकारी औषध असतो. यामुळे अनेक रोग ठीक होतात. चहा च्या पानांचा तेल एक चांगला जीवाणू रोधक म्हणून ओळखले जाते. याच्या वापराने कोणताही दुष्प्रभाव होणार नाही.

तुरटी चा उपयोग जास्त करून पाणी साफ करण्यासाठी किंवा जखम साफ करण्यासाठी करतात. पण एवढेच नाही तर यामुळे आपला चेहरा सुंदर बनवण्यासाठी उपयोग होतो. तुरटी एक एन्टी सेप्टिक आहे. यामुळे तुरटी आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स वर प्रभावी पणे कार्य करते. जर आपण पिंपल्स वर तुरटी लावत असाल तर याचे काही दुष्परिणाम आहेत, कारण तूरटीच्या सारख्या वापराणे पिंपल्स वाढू शकतात, म्हणून तुरटी चा वापर दिवसातून केवळ एक वेळा करा.

ऍपल (सफरचंद) सिरप पण आपल्या त्वचेसाठी फायदेमंद आहे. जर आपण ऍपल सिरप चा उपयोग करत असाल तर आपल्या चेहऱ्यावर जखमी झालेल्या मृत कोशिका काढून टाकून पिंपल्स दूर करण्यास मदत करतात . हा सिरप आपल्या चेहऱ्यावर कमी मात्रेत लावा कारण याचा जास्त उपयोग आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. ऍपल सिरप चा उपयोग करण्यासाठी हा सिरप आपण पाण्या सोबत मिसळून लावा, काही वेळासाठी तसाच ठेवा आणि १० मिनिटा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे केल्याने पिंपल्स दूर होतील. तेलकट व चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. आईंस्क्रीम, चॉकलेट, पिझ्झा, केक यांच्या सेवनाने समस्या वाढेल. साखर व शुद्धपीठाने बनवलेले खाद्य पदार्थ खाऊ नका. क्षारवाले फळांचा वापर जास्त करा. खरबूज, अंकुरित धान्यांचा सेवन करा. मध आपल्या साठी खूप उपयोगी आहे, कारण मध हा एक प्राकृतिक जीवाणूरोधी आहे, ज्यामुळे अनेक रोगांपासून आपला बचाव होतो. मध आपल्या चेहऱ्यावर रात्रभर लाऊन ठेवा आणि सकाळी चेहरा धुवून घ्या आपल्याला फायदा होईल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Remedies To Remove Pimples in Marathi | पिंपल्स घालवायचे उपाय”

  1. Nice information and remedies but baking soda pimples vr applya kelyantr inflammation hot so ghabrnyachi khi grj nhi na ani pimples khrch jatat ka baking soda ne…..

    Reply

Leave a Comment