Health Benefits of Coriander in Marathi | हिरव्या कोथिंबीर चे फायदे

Health Benefits of Coriander in Marathi
Health Benefits of Coriander in Marathi

घरोघरात वापरले जाणाऱ्या कोथिंबीर ची पाने खूप फायदेशीर आहे. तुम्हाला माहीत आहे का कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात. चला मग जाणून घेऊया कोथिंबीर खाल्याने तुमच्या शरीराला काय काय फायदे होतात.

१. कोथिंबीर आपल्या शरीराला हानी पोचवणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉल ला कमी करून आपल्या शरीरामध्ये गुड कोलेस्ट्रॉल ला वाढवण्यास मदत करते.

२. कोथिंबीर मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असते, कारण हे ब्लड शुगर वर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

३. कोथिंबीर खाल्ल्याने आपल्या शरीरात ‘विटामिन ए’ ची कमतरता होत नाही ज्यामुळे आपले डोळे नेहमी चांगले राहतात.

४. कोथिंबीर मध्ये असलेल्या ‘फाइटोन्यूट्रिएंट्स’ मुळे ‘रेडिकल डैमेज’ पासून सुरक्षा भेटते.

५. कोथिंबीर आणि पुदीना चटणी हे प्रत्येकाच्या घरी बनवलेच पाहिजे, जे खाल्ल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो आणि चांगली झोप येते.

६. सगळ्यांनी बघितलं असेल जेव्हा आपण पाणी पुरी खातो तेव्हा त्यावर थोडी कोथिंबीर पण टाकलेली असते कारण कोथिंबीर पचन शक्ती वाढवण्यास मदत करते.

७. कोथिंबीर खाल्ल्याने मिळणाऱ्या जीवनसत्त्वेमधून अलझायमर रोग दूर केला जाऊ शकतो.

८. कोथिंबीरची पाने मज्जासंस्था सक्रिय ठेवण्यात खूप फायदेशीर आहेत.

९. त्वचेवरील रोग, जसे की मुरुम, ब्लैकहैड्स आणि कोरडी त्वचा यांसारख्या अनेक त्वचेच्या समस्या कोथिंबीर खाल्ल्याने दूर होऊ शकतात.

१०. तोंडाच्या जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी देखील कोथींबीर प्रभावी आहेत, ज्यामध्ये एंटी-सेप्ट‍िक गुणधर्म आढळतात ज्यामुळे तोंडाच्या जखमा लवकर भरतात.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here