Motivational Story In Marathi ! वॉचमन ते सुपरस्टार , वयाच्या ९० व्या वर्षी PhD आणि पेपर विकणारा राष्ट्रपती?

कोण आहे जो तुम्हाला थांबवतो आहे? पैशाची कमतरता, जास्त वय, सुविधांची कमतरता कि जास्त तणाव?

पैशाची कमतरता? नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्याकडे देखील पैसे नव्हते, कित्येक वर्षे त्यांनी रात्री जागून वॉचमनची नोकरी केली होती.

वय जास्त झाले आहे? डॉक्टर पॉल सिरोमनी एक असे व्यक्तीआहेत ज्यांनी 90 व्या वयात PhD करून जगाला दाखवून दिले की वय कधीच अडथळा बनत नाही.

सुविधांची कमतरता आहे? आपले मिसाईल मॅन, डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे आपल्या वडिलांची मदत करण्यासाठी सायकल वरून वृत्तपत्र वाटत असत.

जास्त तणाव आहे? तुमच्यापेक्षा कित्येक पट जास्त तणाव हा तुमच्या आई वडिलांना आहे.

तुम्ही स्वतःच स्वतःला थांबवत आहात.

जर तुमच्या समोरच्या व्यक्तीकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसे आहेत, कार आहे, यश आहे नाव आहे, तर त्याच्यावर जळण्याची गरज नाहीये, कारण तो व्यक्ती त्यासाठी पात्र आहे. त्याने त्याच्या जीवनात चालताना तुमच्यापेक्षा जास्त पाय झिजवले आहेत. जेव्हा तुम्ही टाईम पास करत होता तेव्हा तो व्यक्ती टाईम इन्व्हेस्ट करत होता. जेव्हा तुम्ही पैसे उडवून ऐश करत होतात तेव्हा तो व्यक्ती पैसे कमवायचे मार्ग शोधत होता. जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात होतात तेव्हा तो व्यक्ती हजारो नोकऱ्या निर्माण करण्यासाठी विचार करत होता.

जेव्हा तुम्ही लाईट गेल्यावर झोपत होतात तेव्हा तो व्यक्ती मेणबत्तीच्या उजेडात डोळे काळे करत होता. त्याला सुद्धा खूप जणांनी थांबवायचा प्रयत्न केला असावा परंतु त्याने स्वतःला कधीच थांबवले नाही. हाच फरक आहे तुमच्यात आणि एका यशस्वी माणसात!

स्वतः स्वतःला कधीच एखादे लक्ष गाठण्यापूर्वी थांबवू नका.

जेव्हा वाटेल झोप येत आहे, उठा तोंड धुवून या! 30 मिनिट आणखी अभ्यास करा. व्यायाम करताना थकलास, तर घाम पुस, पाण्याचा एक घोट घे आणि अजून एक सेट आणखी मार!

बँक बॅलन्स संपलाय तर हृदयातून जाणून घ्या की हिमतीचा बॅलन्स किती शिल्लक आहे तो? टेन्शन येते आहे तर लक्ष टेन्शन वरून हटवून ते टेन्शन दूर करण्यासाठीच्या solution कडे लक्ष द्या.

एखाद्या प्रॉब्लेम ला प्रॉब्लेम समजून बसाल तर तो मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा विचार कराल की ही एक यशाचा निर्णय घेण्यासाठी संधी आहे, तर त्या प्रोब्लेमला प्रॉब्लेम नाही तर आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट समजाल.

लहानपणी सर्वांनी शिकलेल आहे की थेंबे थेंबे तळे साचे! परंतु कधी ते तळे साचवण्याचा प्रयत्नच केला नाही. आणखी एक गोष्ट माहीत असेल की अर्धा भरलेला घडा जास्त पाझरतो, आपण शिकलो काय तर थोडंस माहीत आहे म्हणजे आपल्याला सगळं माहीत आहे. कधी पूर्ण ज्ञान घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

लहान असताना आपल्याला शिकवले गेले आहे की आळशी मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही, तो काही शिकू शकत नाही. जर तो शिकूच शकत नाही तर या जीवनात तो काय करणार? या जगात काहीतरी मोठं करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे नवीन काही करायची गरज नाहीये, जे आहे त्यालाच पुन्हा नवीन पद्धतीने करून दाखवा! फरक हा कामात नाही तर त्याच्या पद्धतीत असतो.

नापास होणारे विद्यार्थी देखील तेच पुस्तक वाचतात जे टॉप करणारे विद्यार्थी वाचतात. परंतु टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांची पद्धत वेगळी असते. ही पद्धत येते शिकण्यातून, त्यामुळे शिकत रहा आणि काहीतरी मोठं करा. देशातच नाही तर पूर्ण विश्वात आपल्या देशाचे नाव रोशन करा!

ऑल द बेस्ट!

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.