म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Information about Mutual Fund in Marathi 2024

Mutual Fund विषयी माहिती | Information about Mutual Fund in Marathi 2024

Information about Mutual Fund in Marathi : सचिन तेंडुलकरची म्युच्युअल फंड विषयी येणारी जाहिरात आपण पहिलीच असेल? याशिवाय सध्या स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड यांची खूप क्रेझ आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड हा शब्द कोणी ऐकला नाही असे नसेलच. म्युच्युअल फंड ही एक प्रकारे गुंतवणूक आहे जिथे तुम्ही तुमचा पैसा टाकू शकता आणि यातून तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स देखील मिळतो. परंतु या म्युच्युअल फंड मध्ये रिस्क खूप जास्त आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की हा म्युच्युअल फंड काय आहे? यामध्ये गुंतवणूक कशी करतात आणि म्युच्युअल फंड खरच “सही है” का? गुंतवणूक करण्याआधी म्युच्युअल फंड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणे तुम्हाला अधिक फायद्याचे ठरू शकते.

म्युच्युअल फंड काय आहे? – What is Mutual Fund in Marathi?

तुम्हाला स्टॉक मार्केट माहिती असेलच किंवा तुम्हाला एखाद्या पतसंस्थेत गुंतवणूक माहीत असेल जिथे मोठ्या प्रमाणात रिटर्न हे तुम्हाला दिले जातात? तर म्युच्युअल फंड मध्ये अनेक गुंतवणूक दारांचे पैसे एकत्र करून ते वेगवेगळ्या ठिकाणी गुंतविले जातात. यामध्ये ते स्टॉक किंवा एखाद्या व्यवसायात टाकले जातात. त्यातून जितका जास्तीत जास्त नफा येऊ शकेल तो त्या गुंतवणूकदाराला दिला जातो.

आता ते देखील गुंतवणूक करत असल्यामुळे यामध्ये रिस्क असते. कधी कधी जिथे गुंतवणूक केली आहे तिथून त्यांना अपेक्षित नफा मिळत नाही मग याचे नुकसान ज्याने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्याला सहन करावे लागते.

म्युच्युअल फंड इतिहास | History of Mutual Fund in Marathi

म्युच्युअल फंड ही सुरुवात भारत सरकारने केली होती. 1963 मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच UTI ची स्थापना ही भारत सरकारने केली. याचा उद्देश हा संपूर्ण भारतात म्युच्युअल फंड विषयी जनजागृती करणे हा होता. जेवहा सुरुवात झाली तेव्हा हे सर्व काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत चालत होते परंतु नंतर पुढे जाऊन 1978 साली म्युच्युअल फंड विषयी सर्व अधिकार हे आयडीबीआय बँकेला देण्यात आले.

1987 नंतर मात्र म्युच्युअल फंड हे खाजगी देखील व्हायला लागले. स्टेट बँक ऑफ इंडिया ने पहिल्यांदा NONUTI म्युच्युअल फंड सुरू केला.

टीप- जेव्हा कधी संपूर्ण देशात आर्थिक मंदीचे संकट असते तेव्हा आपल्याला म्युच्युअल फंड मध्ये नुकसान होऊ शकते ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी.

स्टॉक मार्केटपेक्षा म्युच्युअल फंड योग्य आहे का? | Why Mutual Fund is better then Stock Market in Marathi

यासाठी आपल्याला म्युच्युअल फंड काम कसे करतो हे जाणून घ्यावे लागेल. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना आपण ती कमीत कमी 500 रुपयांपासून देखील करू शकतो. म्हणजे इथे तुमच्याकडे जास्त पैसे असायला हवेत असे नाही. ज्या कंपनी हे म्युच्युअल फंड चालवत असतात त्याचे मॅनेजर हे सर्व छोट्या छोट्या रकमा एकत्र करून त्याची गुंतवणूक स्टॉक मार्केट मध्ये करत असतात. गुंतवणूक करत असताना ते खूप लोकांचे सल्ले देखील घेतात. गुंतवणूक करताना ते एका कंपनीत गुंतवणूक न करता त्यांची गुंतवणूक ही विभागून करतात आणि त्यामुळे एखाद्या कंपनीच्या स्टॉक मध्ये जरी नुकसान झाले तरी देखील दुसऱ्या कंपनीच्या स्टॉकस च्या माध्यमातून फायदा करून ते त्यांच्याकडे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला थोडाफार का होईना फायदा करून देतात.

स्टॉक मार्केट मध्ये तुम्हाला गुंतवणूक करताना स्टॉक मार्केट विषयी माहिती असायला हवी. त्यात होणारे बदल, चढ उतार हे तुम्हाला समजून घ्यायला लागतात परंतु म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला फक्त गुंतवणूक करायची असते मग त्याची जबाबदारी ही त्या फंड मॅनेजर कडे असते. त्यामुळे तुम्ही गुंतवलेला पैसा हा सुरक्षित हातात असतो आणि त्यांना त्याचे ज्ञान असल्याने शक्यतो फायदा जास्तीत होतो. आता तुम्ही म्हणाल की आम्ही स्वतः स्टॉक मार्केट मध्ये पैसे टाकू आणि मग आम्हाला फायदा करून घेऊ. हो तुम्ही असेही करू शकता आणि हे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. परंतु यात स्टॉक मार्केट विषयी ज्ञान गरजेचे असते. त्यामुळे ज्यांना त्याविषयी जास्त माहिती नाहीये आणि पैसे गुंतवायचे आहेत ते लोक म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवणूक करू शकता.

स्टॉक मार्केट मध्ये आपल्याला टॅक्स हा द्यावा लागतो परंतु म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला काही टॅक्स द्यावा लागत नाही. जो काही टॅक्स दिला जातो तो त्या म्युच्युअल फंड कंपनी देतात. म्युच्युअल फंड चा सर्वात मोठा फायदा हा होतो की आपण यात कमी कमी पैशामध्ये देखील सुरुवात करू शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त गुंतवणूक करायला काही नाहीये परंतु ते जास्त कालावधीसाठी थोडी थोडी गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड सही है!

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करतात? | How to invest money in mutual fund in Marathi

म्युच्युअल फंड हे ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करण्याचे ऑप्शन देतात. तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनी मध्ये जावे लागेल किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये जावे लागेल. परंतु जेवहा तुम्ही एखाद्या एजंट च्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात तेव्हा तुमच्या फायद्यातील काही भाग हे ते स्वतः नफा म्हणून ठेवून घेतात. त्यामुळे तुम्हाला जितका मोबदला भेटायला हवा तो मिळत नाही.

म्युच्युअल फंड या कंपनी आता वेबसाईट आणि apps देखील सुरू करत आहेत. बाजारात सध्या अनेक वेबसाईट आहेत जिथे आपण घरबसल्या आपले म्युच्युअल फंड खाते सुरू करू शकतो. म्युच्युअल फंड खाते सुरू करत असताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक यासारख्या ओळखपत्रांची गरज KYC म्हणजे Know Your Customer ही पात्रता पूर्ण करण्यासाठी लागेल.

फक्त वेबसाईटच नव्हे तर आता काही app देखील बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यातील Zerodha हे app विश्वसनीय देखील आहे. App च्या माध्यमातून खाते उघडणे अधिक सोपे होते. आणि या app वरूनच तुम्हाला हवी तशी इन्व्हेस्टमेंट देखील करता येते.

How to invest money in mutual fund in Marathi
How to invest money in mutual fund in Marathi

म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवताना घ्यावयाची काळजी | Things to remember while investing in Mutual fund in Marathi

आपण एखाद्या ठिकाणी आपले पैसे गुंतवत असतो तर मग आपल्याला त्यातून जास्तीत जास्त फायदा हा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड मध्ये देखील पैसे टाकत असताना जास्तीत जास्त नफा देणाऱ्या कंपनीकडे आपण पैसे गुंतवले पाहिजे. त्यासाठी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना काय खबरदारी घ्यावी आणि काय गोष्टी आधी बघाव्यात याविषयी सविस्तर माहिती देत आहोत.

  • म्युच्युअल फंड मध्ये कॅटेगरी असतात आणि त्यातील जी कॅटेगरी तुम्हाला जास्तीत जास्त NAV देतो त्याची तुम्ही निवड करावी. आता NAV म्हणजे काय? NAV म्हणजे NET VALUE ASSET होय. ही Mutual Fund च्या एका unit ची किंमत असते. यातून म्युच्युअल फंड कसा परफॉर्म करतोय हे आपल्याला कळते.
  • म्युच्युअल फंड देणाऱ्या अनेक कंपनी सध्या बाजारात आहेत आणि त्यामुळे यापैकी निवड कोणती करावी हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो परंतु जर तुम्ही एखाद्या कंपनीत गुंतवणूक करणार असाल तर त्यांचा मागील इतिहास देखील तपासून बघा. तुम्हाला त्या कंपण्याविषयी माहिती घेत असताना त्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना किती फायदा मिळवून दिलेला आहे हे देखील बघायला हवे. काही लोकांना भीती वाटत असते की माझे पैसे कुठे वाया जाणार नाहीत ना तर त्यांनी गुंतवणूक करताना जेव्हा मार्केट पडलेले असते तेव्हाचा त्या कंपनीचा परफॉर्मन्स बघावा म्हणजे तुम्हाला त्याची देखील भीती निघून जाईल.
  • म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे रिस्की आहे परंतु जर तुम्ही आधी एखाद्या जाणकार व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन घेतले तर तुमच्या पैशाला जास्तीत जास्त प्रमाणात नफा देखील इथे मिळू शकतो.
  • आपण जे app वापरत असतो ते trusted आहेत का याची खात्री करून घेणे गरजेचे आहे अन्यथा ज्या कंपनीचे कुठेच रजिस्ट्रेशन नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करून तुम्हाला नुकसान होऊ शकते.

Conclusion

आज आपण म्युच्युअल फंड विषयी भरपूर माहिती बघितली. म्युच्युअल फंड चे वेगवेगळे प्रकार असतात त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला या लेखाततुन मिळाली असेल. Information about Mutual Fund in Marathi हा लेख वाचून सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Q. १ वर्षात Mutual fund मधून किती रिटर्न्स मिळू शकतो?

A: Mutual fund जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही कमीत कमी १० वर्षांसाठी पैसे गुंतवा. तुम्ही एक वर्षासाठी सुद्धा पैसे गुंतवू शकता पण तिथून कदाचित तुम्हाला एवढा फायदा होणार नाही जेवढा तुम्हाला १० वर्ष पैसे गुंतवून होईल.

Q. Mutual fund मधून किती वर्षात पैसे डबल होतात?

A: जर तुम्हाला 12 टक्केचा परतावा मिळाला तर तुमचे पैसे फक्त 6 वर्षात दुप्पट होतील. तर जर तुम्हाला 5 टक्के रिटर्ननुसार, तुमचे पैसे 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट होतील.

Q. म्यूचुअल फंड कसे विकत घ्यायचे?

A: Mutual fund मध्ये पैसे गुंतवण्यासाठी आज मार्केट मध्ये भरपूर वेबसाइट्स आणि अँप्लिकेशन आहेत मी Mutual fund मध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी zerodha या अँप्लिकेशन चा वापर करतो.

Q. म्यूचुअल फंड मधून नुकसान होऊ शकतो का?

A: जर तुम्ही योग्य म्यूचुअल फंड घेतलेत तर तुमचा कधीच नुकसान होणार नाही. आणि LIC किव्हा बँक एफ डी पेक्षा जास्त च रिटर्न्स तुम्हाला यातून भेटतील.

हे देखील वाचा

What is Dividend in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

5 thoughts on “म्युच्युअल फंड म्हणजे काय? | Information about Mutual Fund in Marathi 2024”

  1. Hello,
    As I was navigating through marathivarsa.com, I felt a sense of originality in your approach. I’m into helping websites not just grow, but flourish with a personal touch. How about I share some insights that crossed my mind about marathivarsa.com? It might ignite some interesting ideas for you. Feel free to email me directly at [email protected]

    Reply

Leave a Comment