तुम्हाला माहीत आहे का, रशिया म्हणजेच रुस हा जगातील सर्वात मोठा देश आहे! आकाराच्या दृष्टीने तो भारताच्या पाच पटीहून अधिक आहे. आज या लेखामध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Information about Russia in Marathi. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला रशिया या देशाबद्दल अशा काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत(Interesting Facts About Russia in Marathi) ज्या तुम्हाला माहीत नसतील.
रशिया विषयी काही मनोरंजक गोष्टी | Information about Russia in Marathi
1) रशियाची एकूण लोकसंख्या जवळपास 14,25,00,482 इतकी आहे.
2) रशियाच्या एकूण लोकसंख्येचा जवळपास 73.8% हिस्सा हा शहरांमध्ये राहतो आहे. या देशातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये
मॉस्को( लोकसंख्या 10.523 मिलियन)
सेंट पिटर्सबर्ग ( लोकसंख्या 4.575 मिलियन),
नोवोसीबिसर्क (लोकसंख्या 1.397 मिलियन),
येकतेरिनबर्ग (लोकसंख्या 1.344 मिलियन) आणि
निजझिय नोवगोरोड (लोकसंख्या 1.267 मिलियन) यांचा समावेश आहे.
3) जगात सर्वात जास्त बोलली जाणाऱ्या भाषेमध्ये रशिया या भाषेचा समावेश आहे. रशियन लोक लॅटिन अल्फाबेट्स वापरण्याऐवजी सिरिलिक अल्फाबेट्स वापरतात.
4) रशिया हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. युनायटेड स्टेटच्या तुलनेत रशिया जवळपास 1.8 पट मोठा आहे.
5) मास्को रशियातील सर्वात मोठे शहर असून ती रशियाची राजधानी आहे.
6) रशियाची सीमारेषा ही एकूण 14 देशांशी जोडलेली आहे. यात नॉर्वे, फिनलँड, इस्टोनिया, लाटविया, लिथुनिया, पोलंड, बेलारूस, चीन, युक्रेन, जॉर्जिया, अझरबैजन, कजाकिस्तान, मंगोलिया आणी उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. जगातील इतर कोणत्याही देशाच्या इतक्या सगळ्या देशांसोबत सरहद्दी नाही आहेत.
7) रशियाची जमिनी सीमा म्हणजेच लँड बॉर्डर ही 20,241 किलोमीटर इतकी लांब आहे. ही सीमा चीन या देशानंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमिनी सरहद्द आहे.
8) रशिया हा देश एवढा मोठा आहे कि या देशात एकूण 9 टाईम झोन आहेत.
9) राशियामधील सर्वात खोल असलेली जागा म्हणजे कॅस्पियन समुद्र आहे. याची खोली समुद्र सपाटीपासून 28 मीटर खाली आहे.
10) रशियातील सर्वात उंचीचे ठिकाण हे माउंट एल्ब्रस मध्ये असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 5,633 मीटर इतकी आहे. हा युरोपातील सर्वात उंच पर्वत आहे. इथे लिफ्टची मदत घेऊन तुम्ही 3000 मीटर इतक्या उंचीवर सहज पोहोचू शकता. त्यानंतर तुम्हाला पर्वताची चढाई सुरू करावी लागेल.
11) रशिया मधील बैकाल तलाव हा जगातील ताज्या आणि पिण्यायोग्य पाण्यांपैकी 20% आहे. हा जगातील सर्वात खोल तलाव आहे. वृक्ष आणि प्राण्यांच्या जवळपास 1700 प्रजाती या तलावात आढळतात.
12) एका सर्वेक्षणानुसार 25% रशियन पुरुष हे वयाच्या 55 व्या वर्षांपूर्वी निधन पावतात.
13) रशियाच्या पुरुषांचा सरासरी आयुर्मान हा 64.04 वर्ष तर महिलांचा सरासरी आयुर्मान हा 76.02 वर्ष आहे.
14) रशियातील लोकांचे सरासरी वय हे 39.6 वर्ष इतके आहे. प्रत्येक वर्षी रशियाची लोकसंख्या ही 0.02% ने कमी होते आहे.
15) राशियामधील साक्षरता दर हा खूप जास्त आहे. येथील 99.7% जनता ही वयाच्या 15 व्या वर्षीपासून लिहू वाचू शकतात.
16) ट्रान्स सायबेरीयन रेल्वे रोड हा रशियातील पूर्वीकडे मास्को मध्ये जोडला गेला आहे. ही जगातील सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे.
17) रशियातील प्रति व्यक्ती उत्पन्न हे 10,36,000 भारतीय रुपयां इतके आहे.
18) रशियाची अर्थव्यवस्था ही जगातील 8व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
19) रशिया मध्ये खूप जास्त प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. 2020 च्या करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये ट्रेनस्परन्सी इंटरनॅशनल मध्ये रशियाचे स्थान हे 177 देशांमध्ये 129 वे होते.
20) रशिया मधील 16 ते 49 वयातील जवळपास 4,68,12,552 लोक हे मिलिट्री सेवेसाठी तंदुरुस्त आहेत आणि 2,23,04,718 लोक हे मिलिटरी सेवेसाठी तंदुरुस्त नाहीत. जे फिट नाहीत त्यातील जास्तीत जास्त लोक हे कुठल्या तरी आजाराने पीडित आहेत.
21) रशियामध्ये 12 जिवंत ज्वालामुखी आहेत. कमचात्का प्रदेशातील Klyuchevskaya Sopka हा ज्वालामुखीचे मागील 270 वर्षात 50 पेक्षा अधिक वेळेस उद्रेक झाले आहे.
22) जगातील सर्वात प्रदूषित शहर नोरीलक्स हे रशियात मध्ये आहे. येथील तापमान साधारणतः -9.16 C आहे परंतु येथे असणाऱ्या खाणी मुळे हे शहर जगातील सर्वात जास्त प्रदूषित असलेले शहर बनले आहे.
23) 2011 मध्ये रशिया जगातील सर्वोत्तम तेल निर्मिती करणार देश बनला. त्यासोबतच नैसर्गिक वायूच्या उत्पादनात देखील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश रशिया हा आहे. त्यासोबत रशियाने जगातील सर्वात जास्त कोळसा असणारा देश आहे असा देखील दावा केलेला आहे. या सर्व गोष्टींमुळे या देशाला जगात एक सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
24) जगातील कोणत्याही शहराच्या तुलनेत मास्को मध्ये सर्वाधिक अरबपती लोक राहतात. सध्याच्या माहितीनुसार या ठिकाणी सध्या 74 करोडपती लोक राहतात.
25) 2011 मध्ये रशियामध्ये प्रत्येक अशी गोष्ट ज्यामध्ये 10% अल्कोहोल आहे तिला खाद्यपदार्थ म्हणले जायचे. त्यांना अल्कोहोल म्हणले जात नसे. त्यानंतर इथे ड्रिंकिंग अँड ड्राइव्ह हा कायदा लागू केल्यानंतर यात बदल करण्यात आले.
26) 12 जून हा दिवस रशिया दिवस म्हणून साजरा केला जातो.
27) रशियामध्ये एकूण 261.9 मिलियन मोबाईल फोन आणि 42.9 मिलियन लँडलाईन वापरले जातात. कम्युनिकेशन यंत्रणा देणाऱ्या इथे जवळपास 100 हुन अधिक कंपन्या आहेत.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला Information about Russia in Marathi या लेखामधून Russia या देशाबद्दल थोडे फार जाणून घ्यायला मदत झाली असेल.
तुम्हाला जर का या लेखामध्ये काही चुकीचे वाटत असेल किव्हा रशिया या देशाबद्दल अजून काही माहिती या लेखामध्ये जोडायची असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आम्ही हा लेख वेळोवेळो update करत राहतो.
तुम्हाला जर का Interesting Facts About Russia in Marathi हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रनोसोबत Facebook आणि Whatsapp द्वारे हा लेख नक्की शेअर करा.
1 thought on “Information about Russia in Marathi | रशिया विषयी काही मनोरंजक गोष्टी”