आजच्या या Marathi Ukhane लेखामध्ये मी तुमच्या साठी नवीन घास भरवितानाचे उखाणे घेऊन आलो आहे.
Ghas Bharavanyache Best Marathi Ukhane
दत्ताच्या देवळात सुगंधाचा वास,
—– ला भरवतो लाडूचा घास
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
—— ला भरवितो लाडूचा घास
गाण्यांच्या भेंड्यांचा मूड आहे खास,
—– रावांना भरविते जलेबी/लाडूचा घास
पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास,
—- रावांना भरवते मी —- चा घास
भरल्या पंक्तीत उदबत्तीचा वास,
—- रावांना भरविते जलेबीचा घास
दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,
—– रावांना भरविते मी —– चा घास
उटी, बंगलोर, म्हैसूर, म्हणशील तिथे जाऊ,
—– तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ
जाई – जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास,
—–रावांना देते मी —– चा घास
भाद्रपद महिन्यात गणपती बसवितात शाडूचा,
—– ला घास भरविते लाडूचा
कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास,
—– रावांना भरविते मी —- चा घास
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची,
—– रावांना घास देते, पंगत बसली मित्रांची
अभिमान नाही संपतीचा, गर्व नाही रूपाचा,
—– रावांना घास भरविते वरण, भात, तुपाचा
अंबाबाईच्या देवळात बिरवली आरसा,
—- रावांना खाऊ खालते अनारसा
कृष्णाच्या बारीला राधेचा ध्यास,
—- रावांना भरविते मी —- घास
सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
—- रावांना भरविते मी —— चा घास
महादेवाच्या मंदिरात नदीचा वास,
—- रावांना भरविते मी —— चा घास
सर्वांनी आग्रह केला खास,
म्हणून —- रावांना भरविते —— चा घास
सर्वांच्या आग्रहाखातर भरविते पुरी- श्रीखंड,
—– रावांच्या साठी मी सोडून चालले आशियाखंड
लग्नासारख्या मंगलदिनी कोणी नका रागावू आणि रुसू,
—– रावांना घास भरवताना येते मला गोड हसू
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची,
—– रावांना घास देते पंगत बसली थोरांची