Information about earthquake in Marathi । भूकंपासंबंधित तथ्य । bhukamp in marathi

Information about earthquake in Marathi । भूकंपासंबंधित तथ्य । bhukamp in marathi

Information about earthquake in Marathi


What is Bhukamp in Marathi? । भूकंप म्हणजे काय?

पृथ्वीच्या कवचात अचानक उत्पन्न झालेल्या तणावामुळे, पृथ्वीवरील पृष्ठभाग अचानक काही सेकंदासाठी थरथरायला किव्हा हलायला लागते, त्याला भूकंप असे म्हणतात. भूकंप ही नैसर्गिक आपत्तीतील सर्वात भयंकर आपत्ती आहे ज्यामुळे मानवी जीवनाचे खूप नुकसान होते.

Amazing Facts about Earthquake

1. पृथ्वी वर प्रत्येक वर्षी सुमारे 5 दशलक्ष भूकंप येतात त्यांपैकी फक्त 1 दशलक्ष लक्षात येतात आणि फक्त 100 हे प्रचंड उलथापालथ करतात.


2. भूकंपामुळे प्रत्येक वर्षी 8 हजार लोक मृत होतात आणि त्यापेक्षा अधिक लोक जखमी होतात.


3. सन 1960 मध्ये चिली येथे आलेला भूकंप हा आधुनिक युगातील अत्यंत मोठा भूकंप मानला जातो त्याची तीव्रता 9.5 होती.


4. 2011 मध्ये जपान मध्ये आलेल्या भूकंपांमुळे पृथ्वीची परिभ्रमणाची गती 1.8 मायक्रोसेकंदनी वाढली होती.


5. 1811 मध्ये एक प्रचंड भूकंपामुळे मिसिसिपी हि उत्तर अमेरिमधील एक नदी उलट दिशेने वाहू लागली होती.


6. 2015 मध्ये नेपाळ मध्ये आलेल्या भूकंपामुळे माऊंट एवरेस्ट एक इंच (2.5 सेंटीमीटर) खाली आला होता.


7. 1201 मध्ये इराक, सीरिया आणि इराण मध्ये आलेल्या भूकंपांना इतिहासातील सर्वात जास्त भयंकर भूकंप मानले जाते कारण त्यात सुमारे14 दशलक्ष लोक मरण पावले होते.


8. एक सरासरी भूकंपाचे धक्के एक मिनिटापर्यंत लक्षात येऊ शकतात.


9. हिंदू धर्माच्या विश्वासानुसार पूर्ण जग हे एक कासवाच्या पाठीवर स्थित असून हा कासव एक सापाच्या शिरावर तोल सांभाळून बसलेला आहे. जेंव्हा ह्या दोन प्राण्यांपैकी एक जण सुद्धा हलतो तेंव्हा भूकंप येतो.


10. एक जपानी आख्यायिकेनुसार पृथ्वीच्या पोटात राहणारा मांजु नावाचा मासा हा भूकंपासाठी कारणीभूत आहे.


11. प्राचीन ग्रीक मान्यतेनुसार समुद्राचा देव पोसाईडन हा भूकंपांसाठी कारणीभूत आहे. जेंव्हा त्याला राग येतो आहे तेव्हा तो त्याच्या त्रिशूलाने पृथ्वीला हलवतो ज्यामुळे भूकंप येतो.


12. एक भूकंपाचा सर्वात जुना लिहिलेला पुरावा इ.स.पू. 1831 मध्ये म्हणजे सुमारे 3800 वर्षे पूर्वी लिहिलेला असून तो चीन येथे आहे.


13. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात दक्षिण गोलार्धपेक्षा अधिक भूकंप येतात.


14. जागतिक 90 टक्के भूकंप प्रशांत महासागर आणि त्याला जोडल्या गेलेल्या क्षेत्रांमध्ये येतात.


15. एक साधारण तीव्रतेचा भूकंप हा सन 1945 मध्ये हिरोशिमावर सोडल्या गेलेल्या आण्विक बॉम्बपेक्षा 100 पट अधिक ऊर्जा तयार करू शकतो.


16. चंद्रावर येणाऱ्या भूकंपांना 'MoonQuake' म्हटले जाते. हे फार कमी तीव्रतेचे असतात.


सन 1900 नंतर आलेले 5 मोठे भूकंप


. स्थान ( वर्ष ) ➡तीव्रता

चिली (1960) ➡ 9.5

अलास्का (1964) ➡ 9.2

इंडोनेशिया (2004) ➡ 9.1

जपान (2011) ➡ 9.0

रशिया (1952) ➡ 9.0


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Information about earthquake in Marathi । भूकंपासंबंधित तथ्य । bhukamp in marathi) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

हे देखील वाचा: ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे
हे देखील वाचा: ब्लॉगिंग करण्याचे 12 फायदे काय आहेत?

Tags: Information about earthquake in Marathi, भूकंपासंबंधित तथ्य, bhukamp in marathi, bhukamp nishkarsh in marathi, bhukamp upay yojana in marathi, bhukamp mapak yantra information in marathi, bhukamp wikipedia in marathi


Comments

Add a Comment
The answer is

You May Also Like

;
;