Marathi Ukhane For Haladikunku and Mangalagaur | हळदीकुंकू व मंगळागौर साठीचे उखाणे

Marathi Ukhane For Haladikunku and Mangalagaur | हळदीकुंकू व मंगळागौर साठीचे उखाणे

हळदीकुंकू म्हटले कि उखाणे आलेच. म्हणूनच हे छोटे आणि नवीन उखाणे खास हळदीकुंकू आणि मंगळागौर कार्यक्रमासाठी

New and latest marathi ukhane specially for haladikunku , also marathi ukhane for mangalagaur, which you can use for other festivals also. So Marathi Ukhane for all festivals.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
—- चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी

जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला,
एवढे महत्त्व कशाला ….च्या नावाला.

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव, बदलावा लागतो स्वभाव,
……….. च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
…..च्या जीवनात….ही गृहिणी

अथांग वाहे सागर संथ चालते होडी
परमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी

मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,
….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!

एमेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते,
….. नावाने मंगळागौर सजवते.

निलवर्ण आकाशात चमकतो शशी
….नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.

सासर आहे छान, सासू आहे होशी,
…. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे,
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे

हिरव्या हिरव्या रानात चरत होते रानात ,
—– रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच कारण !

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment