शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे,
जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.
शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.
शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे
आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मान-अपमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.
आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
स्वातंत्र्य म्हणजे संयम….. स्वैराचार नव्हे.
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका…
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक!
समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
शब्दांसारख शस्त्र नाही,
त्यांचा वापर जपुनच करावा.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते
तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते….
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
नेहमी तत्पर रहा….
बेसावध आयुष्य जगू नका.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
कले शिवाय जीवन म्हणजे सुगंधा शिवाय फूल
आणि प्राणा शिवाय शरीर!
बदलण्याची संधी नेहमी असते
पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का?
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे,
म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.
पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.
पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.
परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !
नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.
जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो,
परंतु जो विद्या वाढवितो, तो मान वाढवतो.
Happy teachers day
चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी.
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणे.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही
तो जगावर काय प्रेम करणार!
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला अस समजा.
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता!
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात.
तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम.
आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.
जिवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्ती साठी धडपडणं अयोग्य नाही.
पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
राष्ट्र निर्माण करायचे असेल तर
आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
श्रीमंताचे बंगले चांगले असतात
पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हा ही एक अनुभवच आसतो.
वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते.
कधी चुकवत नाही की फसवत नाही.
2 thoughts on “शिक्षण मराठी सुविचार । Education Quotes in Marathi | Education Marathi Suvichar”