डिविडेंड म्हणजे काय? | What is Dividend in Marathi
मी बऱ्याच वेळा लोकांकडून आपापसात बोलताना हे ऐकले असेल की, मी अमुक अमुक कंपनीचे शेअर खरेदी केले होते आणि आता त्या कंपनीचे शेअर खूप महाग झालेले आहेत अर्थात ती कंपनी आता चांगला नफा कमवत आहे. या कंपनीने मला खूप डिविडेंड (dividend) लाभांश दिलेला आहे. डिव्हीडंड ला मराठी मध्ये लाभांश म्हटले जाते. लाभांश कंपनीच्या शेअर धारकांना प्रस्तुत केली जाणारी धनराशी असते. कंपन्या याचा उपयोग कंपनीच्या प्रॉफिटला शेअर्स धारकांमध्ये वितरित करण्यासाठी करते.
मागील काही वर्षांमध्ये सलग चांगला नफा कमवणाऱ्या कंपन्या आपल्या शेअर धारकांना डिविडेंड Pay करत आलेली आहे. आता हे दिले जाणारे dividend मुख्यतः प्रति शेअर रोख किंवा बघा अतिरिक्त स्टॉकच्या स्वरूपात सुद्धा दिले जाऊ शकते. जर तुम्हाला डिवीडेंड बद्दल अधिक माहिती नसेल, तर डिविडेंड (Dividend) म्हणजे काय? Dividend चे किती प्रकार असतात याबद्दल आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत.
डिव्हिडंड म्हणजे काय ? । What is dividend in Marathi
जेव्हा एखादा व्यक्ती कोणत्याही व्यावसायिक कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा ती विशिष्ट व्यक्ती त्या व्यावसायिक कंपनीची शेअर होल्डर (share holder) म्हणजेच निवेशधारक बनते. जेव्हा त्या कंपनीला प्रॉफिट होतो तेव्हा त्यातील काही अंश हा शेअर धारकांना दिला जातो. प्रॉफिटच्या ज्या भागाचे विभाजन कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ला देते त्या भागाला डिव्हिडंड अर्थात लाभांश म्हटले जाते. कंपनीद्वारे दिला जाणारा हा लाभांश कॅश किंवा इतर स्वरूपात देखील असू शकतो. शेअर होल्डर्स ला लाभांश म्हणजेच डिव्हिडंड कोणत्या स्वरूपात द्यायचा आहे हा सर्वस्वी कंपनीचा निर्णय असतो.
डिविडेंड किंवा लाभांश देणे हे पूर्णपणे कंपनीवर निर्भर करते. तथापि डिविडेंड देण्याची घोषणा करणे कंपनीच्या संचालकावर निर्भर करते. वास्तविक, लाभांशाची घोषणा कंपनी व्यवस्थापनाद्वारे कंपनीच्या जनरल मीटिंगमध्ये केली जाते. तसं पाहायला गेलं तर अधिकांश कंपन्या ह्या मार्केटमध्ये नवीन असतात. त्या स्वतःच्या प्रॉफिटला कंपनीमध्ये गुंतवून स्वतःचा बिझनेस विस्तार करत असतात. अशा मध्ये डिव्हीडंड किंवा लाभांश हा खूप कमी कंपन्यांद्वारे दिला जातो, किंवा दिलही जात नाही.
डिव्हिडंड किंवा लाभांश तुमच्या पोर्टफोलिओच्या जोखीमेला कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही तुमच्या पैशाची इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या शेअर किंवा म्युच्युअल फंड मध्ये केली असेल तर तुम्ही लाभांश प्राप्त करण्याच्या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता. याबरोबरच तुम्ही जनरल शेअर्स सोबतच प्रेफर्ड स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करून लाभांश प्राप्त करू शकता. जनरल शेअर होल्डर्स ना दिला जाणारा डिव्हीडंड हा कंपनी परस्पर वेगवेगळा असू शकतो. तर प्रेफर्ड स्टॉकमध्ये, लाभांश सामान्य स्टॉकपेक्षा जास्त दिला जातो.
डिव्हिडंड किंवा लाभांश किती प्रकारचे असतात? । Types of dividends in Marathi
मुख्यतः डिवीडेंड किंवा लाभांश चे 6 प्रकार असतात, जे खालीलप्रमाणे आहेत :-
१. रोख लाभांश (Cash Dividend): रोख मध्ये दिल्या जाणाऱ्या लाभांशंपैकी हा सगळ्यात सामान्य प्रकार आहे. कॅश किंवा रोख लाभांश कंपनीद्वारे डायरेक्ट शेअर होल्डर च्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जातो. आजच्या घडीला बऱ्याच कंपन्या लाभांश चे पैसे हे ऑनलाइन प्रकारे करते परंतु कधी कधी हे पैसे चेक स्वरूपात देखील केले जातात.
२. स्टॉक लाभांश (Stock Dividends)
या प्रकारचे लाभांश तेव्हा दिले जातात ज्या वेळेस त्या कंपनीकडे कार्यरत रोख म्हणजेच पैशांची कमी असते, परंतु तरीही शेअर धारकांना खुश करण्यासाठी सामान्य स्टॉक्स दिले जातात. शेअर धारकांना त्यांच्याद्वारे पहिल्यापासून असलेल्या शेअर्स व्यतिरिक्त अतिरिक्त शेअर्स मिळतात आणि या बोनस शेअर्स साठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज नसते.
३. संपत्ती लाभांश (Property Dividend)
या लाभांशांचे पेमेंट रोख रक्कम शिवाय संपत्तीच्या रूपामध्ये केले जाते. जर कोणत्या कंपनीकडे ऑपरेटिंग कॅश ची कमतरता आहे, तर अशामध्ये शेअर होल्डर्स ना गैर-मौद्रिक लाभांश दिला जातो. संपत्ती लाभांश कोणत्याही स्वरूपात असू शकतो जसे की संपत्ती, वाहन, रियल इस्टेट इत्यादी मध्ये असू शकते.
४. स्क्रिप लाभांश(Scrip Dividend)
जेव्हा कोणत्या कंपनीकडे शेअर होल्डर्स ना देण्यासाठी पर्याप्त धनराशी नसते, अशा वेळेस ती कंपनी शेअर धारकांना ट्रान्सफरेबल वचन पत्र अर्थात प्रॉमिसरी नोट जारी करते, ज्यामध्ये ती कंपनी भविष्यातील तारखेला लाभांश चे पेमेंट करण्याची पुष्टी करते. या प्रकारचे लाभांश तेव्हा दिले जातात ज्यावेळेस कंपनीकडे पर्याप्त मात्रेमध्ये लिक्विडिटी नसते आणि कंपनीला स्वतःच्या ऐसेट्स ना कॅश मध्ये परिवर्तित करण्यासाठी वेळ हवा असतो.
५. परिसमापन लाभांश (Liquidation Dividend)
हा लिक्विडिटी डिव्हिडंड (किंवा लिक्विडेटिंग डिस्ट्रीब्यूशन) डिव्हिडंड चा प्रकार आहे. या प्रकारचा डिव्हिडंड कंपनी आपल्या शेअर्स धारकांना पूर्ण बंद होण्या आधी कॅश किंवा एसेट्स च्या स्वरूपात देते, एक कंपनी ह्या लाभांश चे पेमेंट आपल्या संचित उत्पन्नापेक्षा अधिक करते. एखादी कंपनी त्याच्या इतर जबाबदाऱ्या जसे की कर्जदार आणि इतर कर्जे पूर्ण केल्यानंतरच असा लाभांश देते.
जर कोणत्या कंपनीकडे दायित्वांपेक्षा कमी मालमत्ता असेल तर कोणतेही लिक्विडेशन वितरण केले जाऊ शकत नाही. असे यामुळे आहे की देणेदारांचे देणे दिल्यानंतर कोणतीही धनराशी उरत नाही. असे सहसा दिवाळीखोरी लिक्विडेशनच्या बाबतीत घडते. परीसमापन वितरण तेव्हा सुद्धा होऊ शकते जेव्हा एखादी कंपनी आपल्या व्यवसायाच्या एका हिस्स्याला रोख रकमेसाठी विकते आणि शेअर धारकांमध्ये वितरित केले जाते.
६. विशेष लाभांश (Special Dividend): जेव्हा कोणत्या कंपनीला विशिष्ट स्कीम किंवा प्रॉडक्ट च्या माध्यमातून जास्त प्रॉफिट मिळतो, तेव्हा कंपनी या प्रॉफिटला आपल्या शेअर होल्डर्स सोबत शेअर करते. या प्रकारच्या अतिरिक्त लाभांशलाच विशेष लाभांश किंवा स्पेशल डिव्हीडंड संबोधले जाते. स्पेशल डिविडेंड जनरल डिव्हिडंड च्या तुलनेमध्ये अधिक असतो. या डिवीडेंटला रेगुलर पेमेंट पॉलिसी व्यतिरिक्त वेगळ्या डिवीडंड चे पेमेंट कंपनी द्वारे केले जाते.
याप्रकारे आपण हे जाणून घेऊ शकतो की, सहसा लाभांश चे पेमेंट रोख रकमेतून केले जाते. परंतु काही परिस्थितीमध्ये अन्य प्रकारचे डिव्हीडंड देखील कंपनीकडून दिले जातात.
तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला आता डिविडेंड (Dividend) म्हणजे काय? Dividend चे किती प्रकार असतात या बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हा या व्यतिरिक्त अजून स्टॉक मार्केट संबंधी माहिती पाहिजे असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
तसेच मित्रांनो स्टॉक मार्केट संबंधी अजून माहिती मिळवण्यासाठी मी खाली २ लेख दिले आहेत ते देखील नक्की वाचा.
धन्यवाद.
हे देखील वाचा
What is Share Market in Marathi
Information about Mutual Funds in Marathi