कर्जाचे प्रकार किती आहेत? | Types of Bank Loan in Marathi
Types of Bank Loan in Marathi : जसे तुम्हाला माहितीच असेल की लोकांना त्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोन म्हणजेच कर्जाची गरज असते. हे लोन किंवा कर्ज ते एखाद्या बँकेकडून किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेकडून घेत असतात. त्यांना ती कर्जाची रक्कम त्यावरील व्याजासोबत त्या बँकेला परत करायची असते. तर आज मग आपण Types of Bank Loans in India या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की लोन म्हणजेच कर्ज किती प्रकारचे असतात?
टाईम पिरियडच्या अनुसार कर्जाचे तीन प्रकार असतात.
1. शॉर्ट टर्म लोन (Short Term Loan) – या प्रकारची कर्जे परत फेडण्यासाठी एक वर्षाहून कमी कालावधी दिलेला असतो.
2. मिडियम टर्म लोन (Medium Term Loan) – या प्रकारची कर्जे परत फेडण्यासाठी 1 वर्ष ते 3 वर्ष किंवा 5 वर्षांचा कालावधी दिलेला असतो.
3. लॉंग टर्म लोन (Long Term Loan) – या प्रकारच्या कर्जाची रक्कम परत करण्याचा कालावधी हा 5 वर्षाहून अधिक असतो.
नेट बँकिंग म्हणजे काय आणि वापर कसा करावा
Types of Bank Loans in India मध्ये भारतातील बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कोणत्या प्रकारची कर्जे देतात याविषयी जाणून घेऊयात.
1) पर्सनल लोन (Personal Loan information in Marathi)
पर्सनल लोन किंवा गैर जमानती लोन यांचा अर्थ स्वतःसाठी घेतले गेलेले लोन होय.तसे बघायला गेले तर सर्व लोन स्व्थासाठीच घेतलेले असतात मात्र पर्सनल लोन हे स्वतःच्या कामासाठी घेतलेले असते.हे पर्सनल लोन मुलांच्या शिक्षणाच्या फी साठी किंवा एखादे महागडे गिफ्ट घेण्यसाठी किंवा घरतील एखादी वस्तू विकत घेण्यसाठी घेतलेले असते. पर्सनल लोन साठी प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर असतात. सध्याच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडिया पर्सनल लोन साठी 12.50% ते 16.60% वर्षाला व्याज घेते. HDFC बँक जवळपास 10.99% ते 20.75% व्याजदर प्रत्येक वर्षाला घेते. तसे बघायला गेले तर पर्सनल लोन चे व्याज हे इतर कर्जांच्या व्याजांपेक्षा जास्त असते. पर्सनल लोन मध्ये बँकेला जास्त काही कागदपत्र द्यावे लागत नाहीत. तुम्हाला फक्त एक salary स्लीप द्यावी लागते. पर्सनल लोन तुम्हाला ५ वर्षांच्या कालावधी साठी मिळू शकते.
2) गोल्ड लोन (Gold Loan information in Marathi)
गोल्ड लोन मध्ये बँक लॉकर मध्ये आपले सोने तुम्ही ठेवून त्याबदल्यात लोन प्राप्त करू शकता. या प्रकारच्या लोन्स मध्ये तुम्हाला दिली जाणारी रक्कम हि तुम्ही ठेवलेल्या सोन्याच्या क्वालिटी आणि किमतीनुसार मिळत असते.तसे साधारणतः बघितले गेले आहे कि बँक तुमच्या सोन्याच्या 80% रक्कम तुम्हाला कर्ज देत असते. गोल्ड लोन हे शक्यतो लोक एखाद्या आर्थिक संकटात असताना घेत असतात. यांच्यावरील व्याज हे पर्सनल लोन पेक्षा कमी असते. सध्याच्या काळात गोल्ड लोन वरील व्याजदर हे SBI मध्ये 11.15% ते HDFC मध्ये 10% प्रति वर्ष आहे.
3) सिक्युरिटी वर मिळणारे कर्ज (Security Loan information in Marathi)
या प्रकारच्या कर्जात बँक तुम्हाला तुमचे सिक्युरिटी पेपर्स ठेवून कर्ज देत असते. मात्र मग प्रश्न हा उभा राहतो की हे सिक्युरिटी पेपर्स नक्की काय असतात? जर तुम्ही आधी पासूनच एखाद्या म्युच्युअल फंड, डिमांड शेअर, गव्हरमेंट स्कीम किंवा बॉंड मध्ये गुंतवणूक केलेली असेल तर हेच तुमचे सिक्युरिटी पेपर्स असतात. हे पेपर्स बँक स्वतःकडे ठेवून मग तुम्हाला लोन देत असते. जर तुम्ही कर्ज परत करू शकला नाहीत तर मग बँक तुमचे ते सिक्युरिटी पेपर्स जप्त करून घेते. हेच पेपर्स पुढे जाऊन बँक बाजारात विक्रीला काढत असते.
तुम्ही तुमचे सिक्युरिटी पेपर्स हे बँकेत गहाण ठेवू शकतात. बँक तुम्हाला या सिक्युरिटी पेपर्स च्या आधारावर बँक ओव्हर ड्राफ्ट ही सुविधा देत असते. ओव्हर ड्राफ्ट चा अर्थ असा होतो की जर तुमच्या खात्यात 0 बॅलन्स असेल तरी देखील तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात. यालाच ओव्हर ड्राफ्ट म्हणून ओळखले जाते.
4) प्रॉपर्टी लोन (Property Loan information in Marathi)
प्रॉपर्टी लोन हे लोन असे असते ज्यामध्ये तुम्ही तुमच्या संपत्तीचे कागदपत्रे ही बँकेकडे गहाण ठेवत असतात. हे लोन एखाद्याला जास्तीत जास्त 15 वर्षांसाठी मिळू शकते. साधारणतः तुमच्या संपत्तीच्या 40 ते 50% रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळत असते.
5) गृह कर्ज (Home Loan information in Marathi)
घर खरेदी करण्यासाठी जे कर्ज घेतले जाते त्याला होम लोन किंवा गृह कर्ज असे म्हणतात. तुम्ही फक्त घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेत नसतात तर तुम्ही तुमचे घर बनवायला लागणारी रक्कम, त्यासाठी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी चा खर्च आणि इतर देखील अनेक खर्च एकत्र करून मग बँकेकडून लोन घेत असता. बँक तुमचे घर बांधण्याच्या एकूण खर्चाच्या 75% ते 85% पर्यंत लोन देते. बाकी पैशांची जुळवाजुळव ही तुम्हाला स्वतःलाच करावी लागते. समजा तुम्ही एका प्लॉट साठी कर्ज घेतले ज्याची किंमत 10 लाख रुपये आहे. तर मग तुम्हाला याच्या 30% रक्कम ही बँकेत जमा करावी लागणार आहे. म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला आधी बँकेत ठेवायचे आहेत. बाकी सर्व पैसे बँक तुम्हाला देणार आहे. होम लोन परत करण्याचा कालावधी हा 5 वर्ष ते 20 वर्षांचा असतो. होम लोन घेताना त्याच्या व्याजासोबत अनेक इतर फी देखील असतात. यात प्रोसेसिंग फी, ऍडमिनीस्ट्रेटिव्ह चार्ज, लीगल फी, असेसमेंट फी यांचा समावेश होतो.
6) एज्युकेशन लोन (Education Loan information in Marathi)
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आर्थिक परिस्थिती मुळे हे शक्य नसते की तो त्याच्या आवडत्या संस्थेत शिक्षण घेऊ शकेल. एखाद्याला ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे असते मात्र तिथे आकारली जाणारी फी ही इतकी जास्त असते की तिथे जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करणे देखील खूप कठीण आहे. अशा परिस्थिती मध्ये तो विद्यार्थी बँक लोन घेऊ शकतो. एज्युकेशन लोन घेण्याआधी बँक त्याचं रिपेमेंट निर्धारित करत असते. बँक लोन त्याच विद्यार्थ्यांना देत असते ज्यांच्यामध्ये ते परत करण्याची क्षमता असते. त्या विद्यार्थ्यची क्षमता जाणून घेण्यासाठी बँक दोन प्रकारची कामे करते. एकतर त्या विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न बँक बघते किंवा तो विदयार्थी ज्या विद्यापीठात जाणार आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? हे देखील बघितले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विदयार्थी या कर्जाची परतफेड करू शकतो. एज्युकेशन लोन साठी एका गॅरंटर ची गरज असते. हा व्यक्ती विद्यार्थ्यांचा कोणताही एक नातेवाईक असू शकतो. आजच्या तारखेला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एज्युकेशन लोन 7.50 लाखांच्या वर असेल तर 10.70% आणि 7.5 लाखांच्या आत असेल तर 9.95% व्याजदर आकारला जातो.
7) वाहन किंवा कार लोन (Car Loan information in Marathi)
जेव्हा तुम्ही एखादे वाहन खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेता तेव्हा त्याला वाहन किंवा कार लोन म्हणून ओळखले जाते. कार लोन हे प्रत्येक इतर लोन प्रमाणेच फिक्स किंवा फ्लोटिंग रेट वर दिलेले असते. फिक्सड रेट म्हणजे तुम्ही त्यावेळी लोन घेता तेव्हा जो व्याजदर असेल त्याच व्याजदराने पैसे परत करणे होय.फ्लोटिंग रेट म्हणजे तुम्ही एकदा कर्ज घेतल्यानंतर ज्या प्रमाणे कर्जाचा व्याजदर कमी जास्त होतो त्यानुसार तुम्हाला पुढे कर्जाचे परतावे भरावे लागतात. कार लोन मध्ये जोपर्यंत आपण कर्जाचे पूर्ण हप्ते भरत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारे कारचा मालकी हक्क मिळत नाही. तोपर्यंत कारचा मालकी हक्क बँकेकडे असतो.
8) कॉर्पोरेट लोन (Corporate Loan information in Marathi)
बँक जेव्हा मोठे लोक जसे की रतन टाटा, विजय मल्ल्या, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा, बिरला, अंबानी यांना कर्ज देते त्याला कॉर्पोरेट लोन असे म्हणले जाते. सध्याच्या नियमानुसार बँक त्यांच्या कोर कॅपिटल (Core Capital) च्या 55% लोन कोणत्याही एका कंपनीला लोनच्या स्वरूपात देऊ शकते. परंतु काही दिवसांपासून होत असलेल्या गुन्ह्याच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष देता RBI ने सांगितले आहे की 1 जानेवारी 2019 पासून एक नवीन नियम लागू होईल. त्यानुसार बँक त्यांच्या कॅपिटल च्या 25% च रक्कम ही एखाद्या कंपनीला कर्ज म्हणून देऊ शकते. यामुळे आता बँका देखील असंभाव्य धोक्यांपासून वाचू शकतात.
Please Note: तर मित्रांनो आज आपण या पोस्ट च्या माध्यमातून “Types of Bank Loans in India” जाणून घेतले की भारतातील बँका किंवा आर्थिक संस्था किती प्रकारचे लोन आपल्याला देत असतात. आम्हाला आशा आहे की या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला लोन किती प्रकारचे असतात याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल.
लक्ष द्या: How many Types of loan in Marathi हा आमचा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुम्हाला या लेखामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर कंमेंट मध्ये नोंद करा कारण आम्ही वेळोवेळी हा लेख update करतो.
हे देखील वाचा