लग्न सभारंभ झालं कि येते पूजा , आणि सण मग काय तेच तेच लग्नाचे उखाणे घ्यायचे . तुमच्यासाठी Navin Marathi ukhane घेऊन आलोय अनोखे वेगळे पूजेसाठीचे मराठी उखाणे.
Best Marathi Ukhane for Pooja, Festival Ukhane, navarisathiche Ukhane for you.
श्रावणात आकाशात, कडकडतात विजा…
__रावांसोबत करते, __ची पूजा
फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी
__ रावांचे नाव घेते, __च्या वेळी
भरजरी साडी, जरतारी खण…
__रावांचे नाव घेते, आहे__चा सण
हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
__च्या दिवशी, दारावर बांधले तोरण
__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?
उगवला सूर्य, मावळला शशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
__ची आरास, सर्वांना पडली पसंत
__रावांमुळे फुलला, जीवनी वसंत
__च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर
__पुढे मांडले, प्रसादाचे ताट
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट
__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी
_च्या समोर, ठेवले केशरी पेढे
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे
__च्या पुढे, फुलांचे सडे
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!
__पुढे लावली, समईची जोडी
__ मुळे आली, आयुष्याला गोडी
__ची पूजा, मनोभावे करते
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते
__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
आला आला __चा, सण हा मोठा
__राव असताना, नाही आनंदाला तोटा
मोत्यांची माळ, सोन्याचा साज
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज
सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
इज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
….. चे नाव घेते …. च्या दिवशी
दत्तदिगंबराला औदुंबराची सावली, पूजेच्या दिवशी नाव घेते,
……. रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी
जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
—-नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण
….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन
…..माझा हीरो मी त्याची हिरॉईन
नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि
…. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!
मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
…….नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती
__रावांच्या संसारात, मिळो सुखशांती
भर श्रावणात, पाऊस आला जोरात
__रावांचे नाव घेते, __च्या घरात
श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा
__रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा
श्रावणात येई, पावसाला जोर
__राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर
श्रावणात बरसतात, सरींवर सरी
__ रावांचे नाव घेते __ ही बावरी
__च्या __ला, आली खूपच धमाल
__रावांच्या कल्पकतेची, आहे सगळी कमाल