नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male | Ukhane in marathi for Boy

नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male | Ukhane in marathi for Boy 2024

Marathi Ukhane for Male: मित्रांनो आपल्या माणसाच्या जीवनातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे आपले लग्न आणि लग्न म्हंटले कि उखाणे तर आलेच. म्हणूनच Ukhane in Marathi for male या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी सुंदर सुंदर Marathi ukhane for male घेऊन आलो आहोत.

लग्नाला जाताना मराठी उखाणे (Marathi Ukhane) नक्की लक्षात ठेऊन जा, नाहीतर नातेवाईक तुमची वाट नक्कीच आडवतील. या लेखाच्या माध्यमातून आम्ही नवरदेवासाठी(Marathi ukhane for male romantic) छान छान उखाणे सांगणार आहोत. तर लग्नाला किव्हा सणाला जाताना यातील तुमच्या आवडीचे ३-४ उखाणे तरी नक्की लक्षात ठेवा.

या लेखातील मराठी उखाणी ना केवळ फक्त लग्नासाठी तर कोणत्याही कार्यक्रमात कोणी तुम्हाला उखाणा घ्यायला सांगितले तर पटकन घेऊन त्यांच्यावर तुमची छाप पडू शकता. जर का तुम्हाला हे Marathi ukhane for male funny आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Marathi ukhane for male | New Marathi Ukhane For Groom

Marathi ukhane for male
Marathi ukhane for male

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!!😄

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !!!!!😻

चंद्र आहे चांदणीच्या संगती
आणि ….. आहे माझी जीवनसाथी

चंद्राला पाहून भरती येते सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

😻जाईच्या वेलीला आलाय बहार,
…..ला घालतो २७ मे ला हार.😻

जाईजुईचा वेल पसरला दाट
…बरोबर बांधली जिवनाची गाठ.😙

जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध
….. च्या सहवासात झालो मी धुंद.😙

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!!😙

Marathi Ukhane for Boys | नवरदेवासाठी उखाणे

Marathi Ukhane for Boys
Marathi Ukhane for Boys

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
…. नी दिली मला दोन गोड मुले.

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!🙂

🙂दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!🙂

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.

देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची साराथी

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
…. मुळे झाले संसाराचे नंदन.

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

हा दिवस आहे आमच्या करिता खास,
…..ला देतो गुलाब जामुन चा घास.

Marathi Ukhane Navardevasathi / नवरदेवासाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane Navardevasathi
Marathi Ukhane Navardevasathi

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश,
सौ….चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

 अग़ अग़ ….. खिडकी वर आला बघ काउ,
घास भरवतो जलेबीचा, बोट नको चाउ.

 अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
…… ला घास घालतो वरण-भात तूपाचा.

 आंबा गोड, ऊस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड
…. चे नाव आहे अमृतपेक्षा ही गोड.

 काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……. चं नाव येतं मात्र थेट माझ्या हृदयातून.

 कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
….. ला देतो मी लाडवाचा घास.

 सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे,
…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.

 कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
…… ला देतो मी श्रीखंडाचा घास.

 ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी
सुखी ठेवा गजानना ….. आणि माझी हि जोडी.

 गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
…. चे नाव माझ्या ओठी यावे.

 गाडीत गाडी डेक्कन क्वीन
……… आहे माझी ब्युटी क्वीन.

 आकाशात उडतोय पक्षांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

 आई-वडील, भाऊ बहीण, जणू गोकुळासारखे घर
…. च्या आगमनाने पडली त्यात भर.

 आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते गुंजन
सौ ….. सोबत करतो मी सत्यनारायण पुजन !!!!!

नवरदेवासाठीचे नवीन उखाणे / Marathi Ukhane for Groom

Marathi Ukhane for Groom
Marathi Ukhane for Groom

 उगवला रवी, मावळली रजनी,
… चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

 उभा होतो मळयात, नजर गेली खळयात,
नवरत्नांचा हार ………. च्या गळयात.

 उमाचा महादेव आणि सितेचा राम,
….. आली जीवनी आता आयुष्यभर आराम.

 कळी हसेल फूल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
….. च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद

 काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली …. माझ्या मनात.

स्मार्ट मराठी उखाणे / Smart marathi ukhane Male

Smart marathi ukhane male
Smart marathi ukhane male

नंदनवनात अमृताचे कलश
…. आहे माझी खूप सालस.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
…..झाली आज माझी गृहमंत्री !!!!!

निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान
…..चे नाव घेऊन राखतो तुमच्या सर्वांचा मान.

निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात
अर्धांगिनी म्हणून …. ने दिला माझ्या हातात हात.

नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी
…. चे नाव घेतो … च्या घरी.

पाणीपुरी खाताना लागतो जोरदार ठसका,
… ला आवडते बिस्किट ब्रिटानिया मस्का – चस्का.

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
…….. ची व माझी जडली प्रिती.

पाटावर बसून ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अगंठीने …. चे नाव लिहिले.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
…ला आवडते नेहमी दुधावारची साय.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

लग्नात लागतात हार आणी तुरे
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

वड्यात वडा बटाटावडा,
… मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

प्रसन्न वदनाने आले रविराज
… ने चालविला संसारात स्नेहाचा साज.

फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. नि माझे जन्मोजन्मिचे धागे.

बंगलौर, म्हैसूर ,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास भरवतो ……… बोट नको चाउ.

बकूळीच्या फुलांचा सडा पडे अंगणी
सौ….. आहे माझी अर्धांगिनी !!!!!

बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
……………. चे नाव घेतो लग्नाच्या राती.

भाजीत भाजी पालक,
… माझी मालकिन अन् मी मालक !

मनी असे ते स्वप्नी दिसे ओठी आणू मी हे कसे,
…माझी नववधू, शब्दात मी हे सांगू कसे.

मातीच्या चुली घालतात घरोघरी
….. झालीस तू माझी, आता चल माझ्या बरोबरी.

मायामय नगरी, प्रेममय संसार
….. च्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.

मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावली घंटी,
……. माझी बबली आणि मी तिचा बंटी.

मुंबापुरची मुंबादेवी आज मला पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.

मुखी असावे प्रेम, हातामधे दया
… सोबत जोडली माझी माया.

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
…. ला देतो गुलाबजामचा घास.

मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
…………….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

मोहमाया – स्नेहाची जाळी पसरली घनदाट
…… बरोबर बांधली नवीन जीवनाची गाठ.

रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा
जीवनाचा खेळ समजला … मुळे सारा.

रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळी सावळी तरीही …. माझी प्यारी.

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
… ला पाहून सूर्य चंद्र हसे.

रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी,
…… चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.

Marathi ukhane for male funny | नवरदेवासाठी Ukhane For Groom Marathi

Marathi ukhane for male funny
Marathi ukhane for male funny

साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरांचा मसाला
………. नाव घ्यायला आग्रह कशाला.

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ…..सोबत सुरु केला नवीन जीवनाचा प्रवास !!!!!

शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,
….च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले.

शेतात नांगरता नांगरता सापडली कवडी ||
………………. माझ्या गुडघ्या एवढी ||

श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण
… ला सुखात ठेवी हा माझा पण.

श्री गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून
……माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

संतांचे वाङमय म्हणजे ‘सारस्वताचा सागर’
… म्हणजे प्रेमाचा आगर.

संसाराच्या सागरात पतीपत्नी नावाडी
…मुळे लागली मला संसाराची गोडी.

संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर …… सारखी सूर्यकांता !!!!!

संस्कृत काव्यात श्रेष्ट आहे जयदेवाच गीतगोविंद,
………च्या नावाचा लागलाय मला छंद.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
…. चे नाव घेतो …. च्या घरात.

वर्षाचे महिने बारा,
….या नावात सामवलाय आनंद सारा.

सायंकळीच्या आकाशाचा निळसर रंग
आणि …… असते घरकमात दंग.

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ…..चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!

सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
….. आहे मला अनुरूप.

सिद्धिविनायकाच्या देवळाला सोन्याचा कळस
….. चे नाव घ्यायला मला नाही आळस.

सुराविना कळला साज संगीताचा,
………… नावात गवसला अर्थ जीवनाचा.

सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली
… राणी माझी घरकमात गुंतली.

स्वतंत्र भारताची तिरंगा ध्वजाने वाढवली शान
…… चे नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ…..चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी
…. च्या जीवनात मला आहे गोडी.

हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी
… झाली आता माझी सहचारिणी.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
…..चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ….चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!


एकदम नवीन नवरदेवासाठी उखाणे / Latest Marathi ukhane for Male

Latest Marathi ukhane for male
Latest Marathi ukhane for male

सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप,
……..मला मिळाली आहे अनुरुप.

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
…….. आहे माझी सर्वात सुंदर.

श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून,
………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून.

स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली
….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.

वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी
….. चे रूप सदैव असते माझ्या ध्यानीमनी.

काळोखी रात्र संपली ,धावत आली उषा
….. च्या सहवासात प्रीतीची चढली नशा.

असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड
….. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.

अंगणामध्ये चिमण्या चिवचिवाट करतात
….. चे हट्ट पुरवताना माझ्या नाकी नऊ येतात.

इंग्रजी भाषेमध्ये झोपलेला शब्द आहे हट
….. च्या नावासाठी करू नका कटकट.

सोन्याचा कप आणि चांदीची बशी
….. माझी आहे जणू काही उर्वशी.

पिवळ्याधमक हापूस आंबा फळांचा राजा
….. च्या प्रीती मध्ये जीव अडकला माझा.

भक्ती तेथे भाव ,भाव तेथे कविता
….. च्या नावाचा जप करतो येता-जाता.

श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून
….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.

लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून
….. ला पडली भूल आली प्रेमात फसून.

संसाराच्या डायरीमध्ये सुख करावे जमा
….. ला म्हटलं चल पिक्चरला, लवकर कर जामानिमा.

लग्न ठरलं, हळद लागली, हातावर रेखली मेहंदी
….. च्या सौंदर्याने मी झालो जायबंदी.

असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते
….. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते.

काळोख्या रात्री आकाशात फुलल्या चांदण्या
….. शी लग्न करण्यासाठी केल्या दाताच्या कण्या.

मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एस एम एस
….. आज झाली माझी मिसेस.

दारातल्या मोगर्‍याचा चढवला मांडवावर वेल
….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.

नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी
….. च्या सहवासात रात्र झाली थोडी.

अहो, वाट पहात होतो कितीतरी दिवस, दाद देईना कसली
पण आज मात्र….. माझ्या जाळ्यात फसली.

नेहरुंच्या शर्टवर लाल गुलाबाचे फुल
….. च्या सौंदर्याचे पडली मला भूल.

नाव घे ,नाव घे ,आग्रह करू नका
….. च नाव घेण्याचा प्रसंग आलाय बाका.

खडीसाखरेचा खड़ा खावा तेव्हा गोड
………च्या रूपात नाही कुठेच खोड

उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी
….. च नाव घ्यायला झालो मी राजी.

रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,
………… च्या साथीने आदर्श संसार करीन.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,
………च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी फल,
…….. चा घास देतो माझ्या प्रिय…….. ला.

………माझे पिता………माझी माता,
शुभमुहूर्तावर आणली ………ही कांता,

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………ना घेऊन सोडतो कंकण.


Marathi ukhane for male romantic | Marathi ukhane Male

Marathi ukhane for male romantic
Marathi ukhane for male romantic

इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,
………नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

देवळाला खरी शोभा कळसाने येते.
………मुळे माझे गृहसौख्य खुलते / दुणावणे.

कश्मिरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,
……….. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद,

नीलवर्णी आकाशातून पडती पावसाच्या सरी,
………चं नाव घेतो………च्या घरी.

जिजाऊसारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,
………च्या गळ्यात बांधले मी मंगळसूत्र.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
………बरोबर बांधली जीवनगाठ.

जगाला सुवास देत उमलती कळी,
………नाव घेतो………वेळी.

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व,
………… आहे माझे जीवन सर्वस्व.

सत्कर्याची करावी नेहमीच पूजा
….. ला म्हटलं लवकर करूया लग्न आता मीच वाजवतो बॅण्ड बाजा.

ऑस्कर पारितोषिकासाठी पिक्चर निवडला श्वास
….. झाली माझी लाडकी राणी खास.

बशी मध्ये ठेवला गरम चहाचा कप
….. ला म्हटलं चल पिक्चरला स्टँड अप.

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा
….. ला विचारतो मी आती क्या खंडाळा?

घर असावं नेहमी क्लीन अँड नेट
…… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.

राजकारणी लोक आणतात खरेपणाचा आव
….. च नाव घेतल्याशिवाय जायचं नाही मित्रांनी केला मज्जाव.

पौर्णिमेची रात्र ,मंद मंद वाहतो वारा
….. चा स्वभाव मला आज तरी दिसतोय बरा.

सातारला गेलो होतो आणला स्पेशल खवा
….. चा सहवास मला नेहमीच हवा.

चंद्र आहे रोहिणीचा सोबती,
………माझी जीवन साथी.

सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण,
………आहे घरकामात दंग.

आंबेवनात कोकीळा गाते गोड,
………आहे माझ्या तळहाताचा फोड.

शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता,
………राणी मिळाली स्वर्ग आला हाता.

मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
………वर जडली माझी माया.

ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला.
………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.

काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
………जीवनात मला आहे आनंद.

बशीत बशी कप बशी,
……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी.😊

लक्ष द्या

जर तुमच्या कडे सुद्धा काही अशाच Marathi Ukhane for male चा संग्रह असेल तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] नक्की शेअर करा. आम्ही तुम्ही दिलेले marathi ukhane navardevasathi आमच्या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

तर माझ्या मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Marathi ukhane for male romantic आवडले असतील. आणि हे ukhane in marathi for male तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा सुंदर सुंदर उखाणे निवडण्यास मदत होईल.

असेच Smart Marathi ukhane male पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या. तर चला मग वाट कसली बघताय या लिस्ट मधील २-३ Marathi Ukhane तरी तोंड पाठ करून घ्या.

हे देखील वाचा

Best Marathi Ukhane for Female

Lagnasathiche Navin Ukhane In Marathi

Funny Ukhane In Marathi

Jeshth Nagrik Marathi Ukhane

Ghas Bharavatanache Ukhane In Marathi

Best Marathi Ukhane For Pooja

Wedding Dresses & Outfits For Men

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment