Marathi Ukhane For Naming Ceremony | Marathi Barshyache Ukhane | बारश्या साठीचे नवीन उखाणे
बाळाचे नाव ठेवायचे म्हटले तर त्या आधी आई बाबांना एकमेकांचे नाव उखाण्यात तर घ्यावेच लागते नाही का? चला तर घेऊया बारश्याला एक एक गोड उखाणा
Are you looking for Best and latest marathi ukhane for barase (Name Ceremony) then you are at right place. Here we upload all small ukhane, easy ukhane for females also Marathi ukhane for bride and groom. So please check article to get New Marathi Ukhane for sasu ani sun.
Marathi Ukhane For Naming Ceremony
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
……. रावांच्या संसारात पडली नवी भर
दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
आज …. च्या मुलाच्या बारशाच्या दिवस
मावळला सूर्य उगवला शशी,
…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,
…. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
…. चं नाव घेते ….च्या बारशाच्या दिवशी
हिरवं लिंबू गारसं,
…. रावांच्या बाळाचं आज बारसं
Marathi Barshyache Ukhane
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
…. च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,
…. चं नाव घेते बारशाचं कारण
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,
…. चं नाव घेते …. च्या बारशाच्या दिवशी
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
दोघांची नावे घ्यायची, आमच्या जीवनात आला तिसरा साथी
Barshache Ukhane
नीलवर्ण आकाशात चमकतो शशी
…..चं नाव घेते…..च्या बारशाच्या दिवशी.
चंद्र तारागणाच्या मेळाव्यात ……… हसते,
………बरोबर तोडे घेऊन बारशाला येते…
आंब्यांच्या फांदीवर पाय कसा देऊ,
………बरोबर………घेऊन बारशाला येऊ…..
सौभाग्याची जीवनज्योत प्रीतीतेलाने तेवते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.
बारशाचे उखाणे
प्रीतीचा ठेवा प्राणपणाने जपते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते….
मातृत्वाच्या मांगल्याने मान मोहित होते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.
पतिव्रता धर्म नम्रतेने वागते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.
लक्ष्मी शोभते दाग-दागिन्याने, विनयाने विद्या शोभते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.
Barshyachya Divashi Ghyayachi Ukhane
तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला नवस करते,
………बरोबर………घेऊन बारशाला येते.
सकाळच्या वेळी अंगणात येतात काऊ, चिऊ,
………बरोबर………घेऊन बारशाला येऊ.
पाहुणे येणार म्हणून, वाटून ठेवलं सारण,
………रावांचं नाव घेते, बारश्याच्या कारण.
सर्वांच्या आहेत, नावाप्रमाणे राशी,
………च नाव घेते………च्या बारशाच्या दिवशी.
Barashachayveli ghenayche ukhane
………आहे पाटील, घराण्याचा वारसा,
आज आहे ………च्या मुलाचा बारसा.
तुमच्या सर्वांच्या येण्याने, बहरले घर,
………रावांच्या संसारात, पडली नवी भर.
बाळाचे नाव ठेवायला, जमल्या साऱ्या मावशी,
………रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी.
मेकअप करायला, पाहिजे समोर आरसा,
………रावांच्या घराला, लागलाय अखेर वारसा.
पाटीलबाई, जाधवबाई बारश्याला चला,
पाहुणा आला नवा, त्याच नाव ठेवा.
हे देखील वाचा
Sasu Suneche Best Marathi Ukhane
Marathi Ukhane For Haladikunku and Mangalagaur