प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning | Mhani in Marathi


प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi Mhani | Mhani in Marathi - Part 4⇒ लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण स्वत : कोरडा पाषाण
स्वतः ला काही माहित नसताना लोकांना शहाणपणा शिकवणे.


⇒असंगाशी संग प्राणाशी गाठ
दुष्टांशी सांगत फार मोठा घात करू शकते.


⇒आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे.


⇒उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काल वाट पहावी लागते.


⇒उथळ पाण्याला खळखळाट फार
थोडेसे ज्ञान असलेला माणूस त्याचा गाजावाजा फार करतो.


⇒उचलली जीभ लावली टाळयाला
शक्याशक्यतेचा विचार न करता बोलणे .


⇒ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
उपकारकर्त्याला फार त्रास देऊ नये, त्यामुळे आपलेच नुकसान होते.


⇒उंदराला मांजर साक्ष
दोघेही एकमेकांचे साक्षीदार.


⇒एक घाव दोन तुकडे
त्वरित निर्णय घेणे.


⇒एका हाताने टाळी वाजत नाही
भांडणात दोष काही एकाचाच नसतो.


⇒करावे तसे भरावे
आपण जशी कृती करतो तसेच त्याचे फळ मिळते.


⇒एक न धड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक गोष्टी करत राहिल्यास त्यातली एकही गोष्ट चांगली होत नाही.


⇒ओळखीचा चोर जीवे न सोडी
ज्याला आपले वर्म माहित आहे, तोच आपले नुकसान करू शकतो.


⇒काप गेले पण भोके राहिली
अधिकार, संपत्ती जाते, पण त्यावेळाचा अंगी बाणलेला पोकळ अभिमान मात्र कायम असतो.


⇒काकडीची चोरी फाशीची शिक्षा
लहानश्या अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.


⇒कर नाही त्याला डर कशाला
ज्याने अपराध केला नाही, त्याला शिक्षेची भीती नसते.


⇒एका माळेचे मणी
सगळेच सारखे असणे.


⇒कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच
मुळचीच वाईट असणारी गोष्ट कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला, तरी ती चांगली होत नाही.


⇒कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
दूर्वर्तनी माणसाच्या कृत्याने एखाद्या चांगल्या कार्याचे नुकसान होत नाही.


⇒कामापुरता मामा
गरजेपुरता गोड बोलणारा.


⇒काखेत कळसा गावाला वळसा
आपली वस्तू आपल्याजवळच असते, पण लक्षात न राहिल्याने उगीचच तिचा शोध सगळीकडे करणे.


⇒कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे
मुळचा स्वभाव कधी बदलत नाही.


⇒कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
आपलाच एखादा नातेवाईक आपले नुकसान करतो.


⇒कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच
वाईट गोष्टींची कितीही चीकीस्ता केली, तरी त्यातून काहीही चांगले निर्माण होत नाही.


⇒कुंपणाने शेत खाल्ले
रक्षकानेच चोरी करणे.


⇒खर्चणाराचे खर्चाते, पण कोठावळयाचे पोट दुखते
देणारा उदार मनाने देतो, पण इतरांना ते पाहवत नाही.


⇒ खाई त्याला खवखवे
अपराध्याच्या मनात अपराधाची सतत जाणीव होत असते.


⇒गर्जेल तो पडेल काय
जो तोंडाने नुसती बडबड करतो, त्याच्या हातून काही होईलच याची खात्री नसते.


⇒गर्वाचे घर खाली
जो गर्वाने वागतो त्याचे गर्व कधीतरी नाहीसा होतो.


⇒गरज सरो नी वैद्य मरो
आपले काम झाले, कि मदत करणाऱ्याची पर्वा राहत नाही.


⇒गाढवापुढे वाचली गीता
मुर्खाला कितीही उपदेश केला, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.


⇒गाड्याबरोबर नळयाची यात्रा
एकमेकांशी संबधित असलेल्या गोष्टींपैकी एकाची जी स्थिती तीच दुसऱ्याची स्थिती होते.


⇒गाढवाला गुळाची चव काय
मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्व कळात नाही.

« 1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like