नवरा आणि बायको मराठी विनोद | Husband and Wife Marathi Jokes


मोबाईल विकत घेतल्या वर आणि
लग्न केल्यावर माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो
.
.
.
थोड अजुन थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं...

😆😆😆😆😆😆😆 ती म्हणाली प्रेमात प्रत्येकाने ताजमहाल बनवायची काही गरज नाही,

रोज भांडी घासली आणि कपडे धुतले तरी खुप झालं.......!
(Anniversary special)

पती सोफ्यावर आडवा पडला होता.

पत्नीने त्याच्या डोक्यात दंडुका मारला.

पती: का मारलीस यार !

पत्नी: तुमच्या खिशात एक चिठ्ठी सापडली .तिच्यावर रेशमा असे लिहिले होते.

पती: अगं ती रेसची घोडी आहे. कालच्या रविवारी मी रेस खेळायला गेलो होतो ना!

पत्नी: सॉरी.

चार दिवसांनंतर पती घरी येताच त्याच्या डोक्यात पुन्हा दंडुका बसला.

पती: आता का मारलीस ?

पत्नी: घोडीचा फोन आला होता.

सासुबाई: नवर्या मुलाला विचारतात..

वर्हाडी एवढे आनंदात वेडयासारखे का नाचू राहिलेत?
.
.
.
नवरदेव- कारण त्यांना सांगितल आहे कि..
हुंड्याच्या पैस्यातून सगळ्यांची उधारी दिली जाईल..

नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?

बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून
आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.

नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात. '

बायको ने विचारलं: ​"मी कशी दिसते ओ

मी म्हणालो: ​श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे....​!

​तांब्या​ फेकुन मारलं ना राव....

पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात.
पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो.

पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.

बायकोचा मेसेज असतो: "किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!" 😃

बायको बराच वेळा पासुन बाथरुम मधुन बाहेर आली नाही

म्हणुन सहज दरवाजा वाजवला .......

आतुन मोठ्याने आवाज आला ......

"आहे .....आहे....तुमची श्रीदेवी अजुन जिवंत आहे ........

बायको : पाहुणे येणार आहेत, घरी फक्त डाळच आहे.

नवरा : तू एक काम कर, किचन मध्ये एक भांडं पाड,
मग म्हण "अरे देवा, पुलाव सांडला" नंतर,
दुसरं भांडं पाड आणि म्हण "अगं बाई,
बिरयाणी सांडली" मग,
मी पाहुण्यांना सांगीन आज डाळ भात खाऊ....

पाहुणे येतात...
किचन मधून भांडं पडल्याचा आवाज येतो...

नवरा "काय झालं???"
बायको : आईच्या गावात....डाळच पडली

बायको: तुम्ही आपल्या शेजारनी ला "आय लव यु" तर नाही न म्हटलं?

नवरा: नाही तर ... का? काय झालं ?

बायको: ती कालपर्यंत मला "वहिनी" म्हणत होती,
आज अचानक "ताई" म्हणतेय!!

पत्नी: पूरा दिन क्रिकेट, क्रिकेट ..!!
मैं घर छोड़ कर जा रही हूँ ...

पति: (कोमेन्टरी के अंदाज़ में)
पहलीबार कदमों का बेहतरीन इस्तेमाल!

*बायकांचे ११ प्रकार*

१. *आळशी बायको*
स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.

२. *धमकवणारी बायको*
कान खोलून ऐकून घ्या या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.

३. *इतिहासाची आवड असलेली बायको*
सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते.

४. *भविष्य-वाचक बायको*
पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.

५. *गोंधळलेली बायको*
तूम्ही माणूस आहात की पायजमा

६. *स्वार्थी बायको*
ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे.
तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.

७. *शंकाळू बायको*
फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?

८. *अर्थशास्त्रज्ञ बायको*
कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?

९. *धार्मिक बायको*
देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.

१०. *निराश बायको*
माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?

आणि शेवटी ☆☆☆☆☆

११. *टिकाऊ बायको*
मी होते म्हणून टिकले दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.

यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!!

पति: काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस..

पत्नी: तूमचा काही तरी गैरसमज झालेला दीसतोय.

पती: कसला गैरसमज ?

पत्नी: हाच की मी झोपेत होते म्हणुन…

बायको: अहो सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार तरी करत जा.
कामं चांगली होतात.*

नवरा: काहीही चांगलं होत नाही.

लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातील सर्व देवांना नमस्कार केला.
काय झालं.

नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते

आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो, तेव्हा ती म्हणते…

आई….. दादा आला!

सुखी राहायच असेल तर आतला आवाज ऐका
.......
.........
आतला आवाज म्हणजे
.
.
.
किचन च्या आतला आवाज

*"अहो ऐकल का"*

बायको आपल्यावर खुपच प्रेम करते असे वाटत असेल तर,

जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा...

तुमचा सगळा गैरसमज दूर होईल...!!

डिलिवरी च्या वेळेस …

बायको – देवा, मुलगा होऊ दे ….
नवरा – देवा, मुलगी होऊ दे प्लीज

देव – माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल,
कि तुम्ही दोघपण रडत बसाल, आणि तो टाळी वाजवेल.

बायको: माझ्यासाठी वाघाची शिकार करा,
मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे….

नवरा: अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग

बायको: ठीक आहे,
तुमच्या मोबाईल मधले व्हाटसप चे मेसेजेस दाखवा….

नवरा: वाघ साधा हवा की पांढरा?


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3 4 5 6 7

You May Also Like

Add a Comment