Secrete Of Success In Marathi | एक पाऊल यशाकडे
चुका देखील होतील आणि चुकीचे देखील समजले जाईल, हे जीवन आहे मित्रा, इथे स्तुती देखील होईल आणि नाव पण ठेवले जाईल. परंतु आपल्याला स्वतःचा अभिमान असायला हवा की आपण इतक्या दूरपर्यंत आलो आहोत, आणि आपल्याला स्वतःवर विश्वास असायला हवा की आपण आणखी दूरवर जाऊ शकतो. तुम्हाला तुमच्यामध्ये एक विजेता शोधायला हवा. डोळे आपल्याला केवळ दृष्टी देत असतात परंतु आपण कधी कशात काय बघायचे? हे आपल्या विचारांवर आधारित आहे. त्यामुळे आपले विचार हे उच्च ठेवा. कोणीतरी म्हणून गेले आहे की, जीवनात प्रॉब्लेम्स हे तर दररोज उभे राहतात परंतु जिंकतात तेच ज्यांचे विचार मोठे असतात.
आपल्या नशिबाला दोष देत बसू नका, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथे प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते तिथे नशिबाला देखील झुकावे लागते. यश प्राप्ती साठी आपले जिद्द आणि कष्ट देखील असले पाहिजेत कारण विचार तर प्रत्येक व्यक्ती करू शकतोय. मेहनत करण्याचा दम असायला पाहिजे कारण मोठमोठ्या बाता तर कोणीही मारत असते. वेडेपणा हवा असतो मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, छोटे विचार तर प्रत्येकजण ठेवत असतो. प्रेम असायला पाहिजे आपल्या स्वप्नांशी आणि आपल्या यशाशी, मनुष्यावर प्रेम तर कोणीही करत असते.
या विश्वाचा एक कडू सत्य आहे की, एक वेगळीच शर्यत आहे हे जीवन, जिंकाल तर कित्येक आपल्या लोकांना मागे सोडून जावे लागेल आणि पराभूत व्हाल तर कित्येक आपलेच लोक आपल्याला मागे सोडून जातील. मनुष्याच्या बरबादीची सुरुवात तर तेव्हा होते जेव्हा त्याचे आई वडील त्याच्या नाराज होण्याच्या भीतीने त्यांच्या गरजा सांगणे आणि त्याला सल्ला देणे बंद करतात. दुसरे त्यांच्या आयुष्यात काय करत आहेत, या गोष्टीने तुम्हाला तोपर्यंत काही फरक पडायला नको जोपर्यंत त्या कामांचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होत नसेल.
मनुष्याने कधीच त्याच्या वेळेवर बढाया मारल्या नाही पाहिजे कारण वेळ तर त्या नोटांची देखील गेलीये ज्या एक वेळी पूर्ण बाजारपेठ खरेदी कडू शकत होत्या. जेव्हा आपण गप्प बसून सर्व काही ऐकून घेत असतो तोपर्यंत आपण या जगाला खूप चांगले वाटत असतो, कधीतरी आपण जेव्हा खरी गोष्ट बोलून जातो तेव्हा सर्वाच्या नजरेत आपण वाईट होऊन जातो. जीवनात काही करायचे असेल तर लोकांना न ऐकल्यासारखे करायला शिका, कारण लोक तुमची निंदा तोपर्यंत करत राहतील जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत. आपले निर्णय स्वतः घ्यायला शिका कारण जो मनुष्य जीवनाचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही तो जीवनात आणखी काय करू शकेल?
जीवनात काही करायचे असेल तर स्वतःच्या आतील भीती अगोदर संपवून टाका. प्रॉब्लेम्स हे आपल्या जीवनात उगाचच येत नाहीत, तर त्यांचे येणे हे एक इशारा आहे की आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी बदलायला हवे आहे. मोठे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सफलता आणि असफलता यांच्या अनेक पायऱ्यांवरून जावे लागते.
पहिल्यांदा लोक चेष्टा करतील, नंतर लोक सोबत सोडून देतील आणि नंतर विरोध करतील आणि नंतर तेच लोक पुढे म्हणतील की आम्हाला माहीत होतं की एक ना एक दिवस तू काहीतरी मोठं करणार आहेस….
विचारांना ताब्यात ठेवा,
ते तुमचे शब्द बनतील
शब्दांना ताब्यात ठेवा,
ते तुमचे कर्म बनतील
कर्माला ताब्यात ठेवा,
ती तुमची सवय बनेल
सवयीला ताब्यात ठेवा,
ते तुमचे चरित्र बनेल
चरित्र ताब्यात ठेवा,
ते तुमचे भाग्य बनेल
आजच सुरुवात करा, एक पाऊल यशाकडे ते ही आपल्या विचारांना ताब्यात ठेवून! सर्वात मोठा यशाचा मंत्र आहे, विचार तुमच्या ताब्यात असतील तर संपूर्ण जीवन तुमच्या ताब्यात आहे.