Success Story of Mark Zuckerberg in Marathi । मार्क झुकरबर्गच्या यशाची कहाणी

1. फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे पूर्ण नाव मार्क इलियट जुकरबर्ग असे आहे.
2. त्यांचा जन्म 14 मे 1984 रोजी अमेरिकेत झाला होता.
3. मार्क जुकरबर्गने 4 फेब्रुवारी 2004 रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक लाँच केले होते.
4. फेसबुक मार्कची पहिली वेबसाइट नव्हती, जेव्हा मार्क 12 वर्षांचा होता तेव्हा त्याने ZuckNet नावाचा एक मेसेजिंग प्रोग्राम तयार केला जो त्याच्या घरात संवाद साधण्यासाठी वापरला जात असे.
5. यानंतर जेव्हा तो उच्च माध्यमिक शाळेत होता, तेव्हा त्याने mp3 प्लेयर देखील बनविला होता.
6. फेसबुक तयार होण्याच्या एक वर्ष आधी मार्क ने Facemash नावाची एक वेबसाइट तयार केली, ज्यासाठी त्याने हार्वर्ड कॉलेजचा डेटाबेस हॅक केला होता.
7. Facemash एक Voting based वेबसाइट होती, ज्यामध्ये दोन मुलींचा फोटो टाकण्यात येत असे आणि जास्त सुंदर कोण आहे हे वोटिंग च्या आधारे निवडले जात असे.
8. Facebook ही साइट अगदी कमी वेळातच खूप लोकप्रिय झाली आणि हार्वर्डचा सर्व्हर काही वेळातच क्रॅश झाला आणि जुकरबर्गवर हॅकिंगचा आरोप करण्यात आला होता.
9. तुम्हाला माहिती आहे का फेसबुक या वेबसाइटची आयडिया मार्क कडे दिव्या नरेंद्र घेऊन गेले होते, दिव्या नरेंद्र सोबत आणखी दोन साथीदार सुद्धा होते.
10. मार्क जेव्हा दिव्या नरेंद्र यांच्या हार्वर्ड कनेक्शन वेबसाइट वर काम करत होते तेव्हा त्यांच्या डोक्यात स्वतःची एक वेबसाइट बनवण्याचा विचार आला.
11. मार्क यांनी फेब्रुवारी 2004 मध्ये ‘Thefacebook.com’ नावाची वेबसाइट सुरू केली, ज्याला नंतर फेसबूक म्हणून ओळखले जाऊ लागले.
12. त्यांना हि वेबसाइट सुरु करायला Eduardo Saverin यांची साथ भेटली होती.
13. आज मार्क झुकरबर्ग जगातील सर्वात कमी वय असलेल्या अब्जाधिशांपैकी एक आहे.
14. मार्कने १ मे, २०१२ रोजी कॅलिफोर्निया मधील त्याची खूप वर्षां पासूनची प्रेमिका Priscilla Chan शी लग्न केले.
Tags: Mark Zuckerberg in Marathi, facebook story in marathi, information about facebook in marathi, information about Mark Zuckerberg in marathi
Comments