Information about Bollywood in Marathi | बॉलिवुड बद्दल काही मनोरंजक माहिती

बॉलिवूड कलाकारांचे लाखो चाहते आहेत त्यामुळे बाहेरच्या अनेक गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही गोष्टी सांगणार आहेत जे तुम्हाला कदाचित माहीतही नसतील.

१) सत्यम-शिवम-सुंदरम या चित्रपटाचे दिग्दर्शक राज कपूर यांनी चित्रपटाच्या शूटिंग पासून ते रिलीज पर्यंत दारू आणि मांस व्यर्ज केले होते.

२) आज पर्यंत कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात विदेशी कलाकारांनी काम केले नाही तर “लगान” हा एकच असा चित्रपट आहे ज्यामध्ये सर्वाधिक विदेशी कलाकारांनी काम केले आहे चीनमध्यें रिलीज झालेला हा पहिलाच भारतीय सिनेमा आहे.

३) “मेरा नाम जोकर” आणि “संगम” हे दोनच असे बॉलीवूड चित्रपट आहेत ज्यामध्ये दोन इंटरवल आहेत.

४) “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” या चित्रपटासाठी सैफ अली खान हा अभिनेता पहिला पर्याय होता आणि राज मल्होत्रा च्या भूमिकेसाठी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज यांचा विचार केला होता.

५) जेव्हा अनिल कपूर पहिल्यांदा मुंबईत आले होत तेव्हा ते राज कपूरच्या गॅरेज मध्ये राहिले होते.

६) “देविका राणी” ही पहिली अभिनेत्री होती जिच्याकडे चित्रपट-निर्मिती ची पदवी होती.

७) बॉलीवूडमधील सर्वात प्रदीर्घ चित्रपट “LOC” आणि “मेरा नाम जोकर” आहेत. हे चित्रपट चार तास पंचवीस मिनिटे या कालावधीचे आहेत.

८) बॉलिवूडमध्ये गजनी हा पहिला असा सिनेमा आहे ज्याने १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे आणि ३ इडीयट्स हा पहिला चित्रपट आहे ज्याने २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

९) “आलम आरा” हा बॉलीवूडमधील पहिला असा चित्रपट आहे ज्यामध्ये आवाज ऐकू येत होता.

१०) अमिताभ बच्चन वेळेचे इतके पाबंद आहेत की बऱ्याच वेळेला शूटिंगच्या दरम्यान ते चौकीदाराच्या अगोदर सेटवर पोहोचायचे.

११) शोले चित्रपटांतून अमजद खान यांना बाहेर काढले जाणार होते कारण चित्रपटाचे लेखक जावेद अख्तर यांना गब्बरच्या रोलसाठी अमजद यांचा आवाज कमकुवत वाटत होता.

१२) सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला भारतीय चित्रपट म्हणजे “कहो ना प्यार हे”. या चित्रपटाला ९२ नामांकन मिळाले होते.

१३) “इज्जत” हा बॉलिवूडमधील एकमेव असा सिनेमा आहे ज्यात जयललिता यांनी काम केले आहे.

१४) “रंग दे बसंती ” या चित्रपटाच्या सुरुवातीला एक घड्याळ दाखवण्यात आले आहे. हे घड्याळ भगतसिंगच्या फाशीच्या वेळी संध्याकाळी ठीक साडेसात वाजता बंद पडले होते. हे घड्याळ चित्रपटातील सू नावाच्या मुलीच्या आजोबांचे दाखवले गेले आहे ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी भगतसिंग यांना फाशी देताना पाहिले होते.

१५) १९९० पर्यंत अमिताभ बच्चन हे एकमेव असे बॉलिवूड कलाकार होते जे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त फी घ्यायचे.

१६) बॉलिवूड अभिनेत्री रेखा जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाला जायची तेव्हा ती फक्त गदड लाल किंवा चॉकलेटी रंगाची लिपस्टिक लावायची.

१७) शोले चित्रपटातील प्रसिद्ध संवाद “कितने आदमी थे” हा ४० रिटेक नंतर फायनल केला होता.

१८) अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. ही बाप-मुलाची पहिली अशी जोडी आहे, ज्यांनी ‘पा’ चित्रपटामध्ये, बापाने मुलाची भूमिका आणि मुलाने बापाची भूमिका निभावली होती.

१९) मिथुन चक्रवर्ती हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी नक्षलवादी होते व मार्शल आर्टमध्ये त्यांच्या कडे ‘black belt’ आहे. त्यामुळे ते अँक्शन फिल्म चांगली करतात.

२०) रजनीकांत बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी कुली, सुतार आणि बस कंडक्टर म्हणून काम करत होते.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment