Information about Skin in Marathi | आपल्या त्वचेबद्दल काही महत्वाची माहिती

तुम्हाला माहीत आहे का? की आपल्या शरीराच्या वजनातील १५% वजन हे आपल्या त्वचेचे असते! आज मी तुम्हाला आपल्या त्वचेबद्दल महत्वाची माहिती सांगणार आहे.

१) त्वचा वास्तव्यात आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे.

२) लहान बाळाच्या त्वचेचा प्रत्यक्ष रंग त्याच्या जन्माच्या सहा महिन्यांनंतरच आपल्याला समजतो.

३) आपल्या त्वचेचा रंग आपल्या शरीरातील ‘मेलेनिन’ ठरवते. जितके जास्त मेलेनिन तितके अधिक गदड़ आपल्या त्वचेचा रंग असेल. आपल्या डोळ्याचा रंग देखील यावरच अवलंबून असतो.

४) व्हिटॅमिन सी सूर्यप्रकाशातून येणाऱ्या अल्ट्रा वायलेट किरणांपासून आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवतो. हे व्हिटॅमिन सी संत्रे, सफरचंद इ. मध्ये आढळले जाते.

५) जर मानवी शरीराची त्वचा जमिनीवर समांतर पसरून ठेवली तर ती त्वचा जवळ जवळ २o चौरस फुटाच्या आसपास असेल.

६) सोडा योग्य वेळेच्या अगोदर आपल्या त्वचेला वृद्ध करते, कारण त्यात उच्च प्रमाणात फॉस्फेट आढळतात.

७) वयाच्या २५ व्या वर्षानंतर, आपल्या त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरूवात होते. यामध्ये गुरुत्वाकर्षणाचाही मोठा हात असतो.

८) ज्या व्यक्ती दिवसातून १o किंवा त्या पेक्षा जास्त सिगारेट ओढतात, त्यांच्या कपाळावर खोल रेषा लवकरच दिसून येते.

९) झोपतेवेळी चेहरा उशीवर खाली ठेवून झोपल्यास आपल्या कपाळावर आणि कुठल्याही बाजूस कुशीवर झोपल्यास आपल्या हनुवटी व गालावर सुरकुत्या पडतात.

१०) कधी कधी वृद्ध लोकांच्या अंगाला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो त्याचे कारण म्हणजे २-नॉनेलल नावाचे रसायन आहे. वृद्ध लोकांच्या त्वचेतून हा वास बाहेर सोडला जातो.

११) प्रत्येक २o महिलांपैकी एक महिलेच्या चेहऱ्यावर मुरूम येतात तर १oo पुरुषांपैकी एकाच्या चेहऱ्यावर मुरूम येतात.

१२) आपल्या शरीरातील सर्वात पातळ त्वचा ही डोळ्यांची त्वचा असते, o.२ ते o.५ मिमी पर्यंत.

१३) आपल्या शरीरातील सर्वात जाड त्वचा आपल्या पायाच्या तळव्याची असते, 4 मिमी पर्यंत.

१४) मानवांसह प्रत्येक जीवांच्या त्वचेवर केस असतात जस की व्हेल आणि डॉल्फिनच्या त्वचेवर असतात.

१५) मानवांची त्वचा बहुतेकपणे डुकरांच्या त्वचेसारखी असते!

१६) आपली त्वचा प्रत्येक २८ दिवसात बदलते आणि संपूर्ण आयुष्यभरात सुमारे ९oo वेळा बदलते.

१७) सफरचंदाचे तेल त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. हे तेल त्वचेवरील सुरकुत्या, हातावरील खाज आणि सूज यापासून आराम देते.

१८) जेव्हा आपले हृदय काम करण्याचे थांबते, तेव्हा आपल्या त्वचेचा रंग पांढरा किंवा जांभळा होतो.

१९) आपल्या त्वचेमध्ये ५ प्रकारचे रिसेप्टर्स असतात, जे आपल्या मेंदूला स्पर्शापासून वेदने पर्यंत सगळी माहिती देतात.

२०) काळजी केल्याने फक्त आपल्या चेहऱ्यावर मुरुमच येत नाही, तर आपली त्वचा पातळ देखील बनते आणि आपण लवकर वृद्ध होऊ लागतो.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment