Information about Bones in Marathi | मानवी शरीरातील हाडांबद्दल महत्वाची माहिती

Information about Bones in Marathi
Information about Bones in Marathi

मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आज मी तुम्हाला हाडांबद्दल अशा काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहिती नसतील.

१) मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात ३०६ हाडे असतात, परंतु मोठे होईपर्यंत फक्त २०६ हाडे राहतात कारण वाढत्या वयासोबत शरीरातील काही हाडे एकमेकांशी जोडली जातात.

२) जन्माच्या वेळी केवळ आपल्या कानाचे हाडच पूर्णपणे विकसित झालेले असते.

३) आपल्या शरीरातील हाडांपैकी निम्म्यापेक्षा अधिक हाडे हात आणि पायांचे असतात.

४) आपल्या शरीराचे १४ टक्के वजन हाडांचे असते.

५) मानव आणि जिराफ या दोघांच्या घशातील हाडे सारखी असतात.

६) जेव्हा आपण ३० वर्षांपेक्षा जास्त वयोगटाचे होतो तेव्हा आपल्या हाडांच्या घनतेचे नुकसान होऊ लागते.

७) शरीराचे सर्वात लहान हाड कानाचे आहे(०.११ इंच) आणि सर्वात मोठे हाड मांडीचे असते.

८) आपल्या हातात, मनगटात आणि बोटांमध्ये ५४ हाडे असतात जे लेखन करण्यास, मोबाईल वापरण्यास आणि पियानो वाजवण्यास मदत करतात.

९) दर सात वर्षात जुन्या हाडांची जागा नवीन हाडे घेतात.

१०) अस्थीमज्जा(Bone Marrow) हे आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या चार टक्के भाग असतो हे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करते जे ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी काम करते.

११) मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड जांघेचे आहे आणि सर्वात कमजोर हाड नाक आणि पाठीच्या कण्याचे असते.

१२) आपल्या शरीराचा मांडीचे हाड खूप शक्तिशाली असते.

१३) माणसाचे तोंड हे १४ हाडांपासून बनलेले असते.

१४) आपल्या शरीरातील पूर्ण कैल्शियम पैकी ९९% कैल्शियम आपल्या हाडात आणि दातांमध्ये असते.

१५) जेव्हा मुलगा जन्माला येतो त्यावेळेला महिलेला होणारा त्रास हा एका वेळी २० हाडे तुटल्यावर होणाऱ्या त्रासाएवढा असतो.

१६) तुटलेल हाड ठीक होण्यासाठी सुमारे १२ आठवडे लागतात.

१७) सगळ्यात पटकन आणि जास्त तुटणारे हाड हे आपल्या हाताचे असते.

१८) आपले दात सापळ्याचा(Skeleton) एक भाग असतो पण ते आपल्या हाडांमध्ये मोजले जात नाही

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here