T-shirts मध्ये सध्या चालत आहे प्रिंटेड टीशर्ट ची फॅशन – Designs बघा!

आजच्या काळात Fashion ची आवड सगळ्यांनाच आहे. प्रत्येकाला अस वाटत कि आपण फॅशनेबल असाव. त्यातल्या त्यात फॅशन मध्ये T-Shirt प्रत्येकाला आवडतात. T-Shirts ह्या सहजच घालण्याकरिता उत्तम व एकदम आरामदायी असतात. काही लोक प्लेन तर पुष्कळ लोक designs वाले T-shirts खूप वापरतात.

T-Shirt वरती वेगवेगळ्या designs चा जणू काही ट्रेंडच सुरु असतो. पुष्कळ लोक वेगवेगळे designs असलेले T-shirt वापरतात. तर Printed T-Shirts च एक वेगळच वेड लागलंय, आणि त्यात महाराष्ट्रात Marathi T-Shirts ला पुष्कळ demand आहेत.

अस म्हणतात कि T-Shirt वरची design खूप काही बोलते. तर आज आपण जाणून घेणार आहोत काही अश्याच T-Shirts बद्दल जे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकतात, आणि त्यावरच्या designs देखील तुम्हाला खूप आवडतील. तर चला, जाणून घेऊयात ह्या वेगवेगळ्या T-Shirts बद्दल!

“सब इसकी गलती है” 

11 Marathi varsa

पुष्कळ लोकांबरोबर अस होत असत कि ते मनाला वाटेल म्हणून काही तरी करतात, आणि मग कळत कि ते चुकीच होत. अस खूप वेळा ज्या लोकांबरोबर होतंय, ते मात्र एक T-Shirt पुष्कळ वापरत आहेत, आणि ती म्हणजे “सब इसकी गलती है”. ह्या design मध्ये बघितल जातंय कि “इसकी” म्हणजे “मन” आहे, व जे काही होतंय ते मनामुळे होतंय अस सांगायला ही “सब इसकी गलती है” design असलेली T-Shirt मात्र पुष्कळ लोक वापरत आहेत.

ट्रेंड follow करता तुम्ही सुद्धा हि “सब इसकी गलती है” वापरू शकता.

“शरीफ लडका” खरच शरीफ असतात का?

22 Marathi varsa

“शरीफ लडका” ही design असलेली T-Shirt सुद्धा आज काल पुष्कळ मुल वापरतांना दिसत आहेत, व जणू काही “शरीफ लडका” ह्या design असलेल्या T-Shirt चा ट्रेंडच आला आहे. “शरीफ लडका” लिहलय T-Shirt वर म्हणून काही हे मुल “शरीफ” नाही होणारे, पण कदाचित हेच ते design असलेली T-Shirt घालण्यामागच कारण असाव.
मी “शरीफ” नाही हे सांगण्याकरिता “शरीफ लडका” design असलेली T-Shirt पुष्कळ वापरली जातेय.

“Save Water Drink Beer” वा! काय विचार आहे

33 Marathi varsa

पाणी वाचवायला सांगणारे स्लोगन तर तुम्ही पुष्कळ ऐकले असतील, पण ह्या T-Shirt चा विषयच काही वेगळा दिसतोय. नियमित पाणी पिण हे प्रत्येक मनुष्यासाठी आवश्यक आहे, पण चक्क “पाणी वाचवा” आणि “बिअर प्या” अस सांगत आज काल लोक T-Shirt घालतांना दिसतात. ह्या T-Shirt वरती तुम्ही “Save Water Drink Beer” असा स्लोगन लिहलेला बघू शकता.

आधी मलाही वाटत होत की अशी T-shirt कोणी कशी अणि का घालेल बर? पण हे खरच होतय अणि लोक अशे डिजाईन चे T-Shirt देखील वापरतांना दिसत आहेत.

“My Yoga Pose”?

44 Marathi varsa

आज काल अस ही बघितल जातंय कि पुष्कळ लोक “My Yoga Pose” लिहलेली T-Shirt घालत आहेत. हे जे लिहले त्याने वाटत असेल की T-Shirt घालणारी व्यक्ति ही योगा प्रेमी दिसते, पण T-Shirt वर असलेली design बघून तुम्हाला देखील समझेल कि ह्यांची “योगा Pose” म्हणजे नेमक काय. design मध्ये चक्क तुम्ही एका पांडा ला headphones घालून झोपलेल पाहू शकता.

 

म्हणजे चक्क T-Shirt घातलेली व्यक्ती ही आळशी असल्याच कळतंय. पण म्हणाव लागेल कि ह्या झोपलेल्या पांडा वाली T-Shirt पुष्कळ लोक घेत आहेत, कारण हे design बघतांना थोड “Sarcastic” वाटतंय.

टी – शर्ट वर लिप्स? 

55 Marathi varsa

एक आणखी T-Shirt जी खूप पहिली जातेय, ती म्हणजे “लिप्स” च प्रिंट असलेली T-Shirt. हो, तुम्ही खरा वाचताय, आणि खरच पाहताय, चक्क लोक “पिंक लिप्स” च प्रिंट असलेले T-Shirt घालत आहेत. आता ह्या T-Shirt च नेमक म्हणणं काय आहे हे तर ठाऊक नाही, पण हे मात्र म्हणाव लागेल कि ह्या “पिंक लिप्स” च्या T-Shirt चा जणू काही ट्रेंडच आलेला दिसतोय.

तुम्ही पाहिलंय का कोणाला अशी “पिंक लिप्स” च design असलेली T-Shirt वर?

बेशरम?

66 Marathi varsa

बेशरम म्हणल कि डोक्यात विचार येतो अश्या व्यक्तिमत्वाचा, ज्याला लाज नाहीये, किवा जो वेगळा वागतो. मराठी मध्ये आपण अश्या व्यक्ती ला निर्लज्ज म्हणतो. आता हा शब्द काही वागवायला चांगला नाहीये, पण अस पहिल जातंय, कि लोक “Besharam” अस design असलेली T-Shirt घालत आहेत.

आता नेमका ह्यांच हे design असलेल T-Shirt घालण्यामागच कारण अजून स्पष्ट नाहीये, पण जस दिसून येतंय, हा “Besharam” T-shirt जणू काही ट्रेंडच होत चाललाय.

जस आपण बघितलय कि लोक खूपच अतरंगी अशे design असलेले T-Shirt घालत आहेत. “पिंक लिप्स” असो, किव्वा “बेशरम”, किव्वा “Save Water Drink Beer” T-Shirt नी चक्क लोक पाणी वाचवा आणि बिअर प्या, असा संदेश देखील देतांना दिसत आहेत. अस वाटत कि अशे design असलेले T-Shirt कदाचितच कोणी वापरेल, पण दिसतंय कि लोक तर ह्याचा ट्रेंड बनवतायत.

 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment