डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे | Dohale Jevan Ukhane in Marathi

Home > Marathi Ukhane list > डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे | Dohale Jevan Ukhane in Marathi

डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे | Dohale Jevan Ukhane in Marathi

Dohale jewan ukhane in marathi

⇒ मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;
--------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.


⇒ माझ्या सासर - माहेरची , लोकं सारी हौशी;
---------- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.


⇒ हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
---------- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस⇒ मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
---------- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल.


⇒ मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
---------- रावां चे नाव घेते, केला थाटमाट


⇒ आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
---------- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.⇒ तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
---------- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.


⇒ घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
---------- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे


⇒ पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
-------- रावांचे नाव घेते भरली माझी ओटी.


⇒ वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज.


⇒ कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
-------- रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.

⇒ फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
-------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी.


⇒ सरस्वतीच्या मंदिरात साहित्यांच्या राशी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.


⇒ देव्हाऱ्यात देवापाशी मंद ज्योत तेवते;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.


⇒ हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा;
-------- रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंव्हा पेढा


⇒ डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका;
-------- रावांचं नाव घेते लक्ष देऊन ऐका.


⇒ थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केल आज ;
-------- रावांनी मला घातला साज⇒ गोप-गोपिकांना करते धुंद कृष्णाची बांसरी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे सासरी.


⇒ नाटकात नाटक गाजले सुभद्रा-हरण;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण.


⇒ कृष्णाच्या गायींना चरायला हिरवे-हिरवे कुरण;
-------- रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण


⇒ सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात;
-------- रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला थाटात.


⇒ वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त,
-------- रावांचं नाव घ्यायला कारण लाभल मस्त


⇒ पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण,
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण.⇒ श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा;
-------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा.


⇒ पाच सुवासिनींनी भरली पाच फळांनी ओटी;
-------- रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी


Search For : ukhane, marathi ukhane for female, dohale jewan, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi

You May Also Like

;
;