Jack ma biography in Marathi: जॅक मा, चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Information about jack ma in marathi.
मित्रांनो आपण थोडी आपली इच्छाशक्ती कशी आहे , हे test करून बघूया. विचार करा तुम्ही दिसायला खूपच साधारण आहात. तुमच्या घरचे आणि तुमचे शिक्षक तुमच्यावर सारखे चिडत असतात, तुमच्या वर ओरडत असतात असे करत करत तुम्ही चौथीमध्ये पोहोचता मग चौथीमध्ये तुम्ही दोनदा नापास होता. तुमच्या बरोबरचे सहावीला गेलेले असतात. नंतर तुम्ही कसेतरी तुम्ही आठवीत जाता. आठवीत तुम्ही तीन वेळा नापास होता. तुमच्या बरोबर असलेल्या बऱ्याच जणांनी पदवीचे शिक्षण चालू केले असते. नंतर तुम्ही पदवी साठी अर्ज करता. तिथे सुद्धा तुम्ही ५ वेळा entrance मध्ये नापास होता तुमच्या सगळे आजूबाजूचे, तुमचे मित्र, नातेवाईक तुम्हाला अपयशी म्हणायला लागतात, तुमची चेष्टा करायला लागतात मग तुम्ही ३० ठिकाणी नोकरी साठी अर्ज करता आणि प्रत्येक वेळेस अपयशी होता.
नंतर तुम्ही kfc मध्ये नोकरी साठी interview देता, २४ पैकी २३ लोकांना नोकरी लागते आणि फक्त तुम्हालाच नोकरी मिळत नाही. नंतर तुम्ही पोलीस मध्ये नोकरी साठी अर्ज करता तिथे ५ पैकी ४ लोकांना निवडले जाते फक्त तुमची निवड होत नाही. नंतर तुम्ही तुमच्या बायको बरोबर एक व्यवसाय चालू करता पण तो सुद्धा चालत नाही. नंतर तुम्ही तुमच्या नातेवाईकाबरोबर २ तास तापत्या उन्हामध्ये एक हॉटेलमध्ये नोकरी साठी line मध्ये थांबता पण नंतर तुमच्या नातेवाईकाला तुमच्या पेक्षा कमी गुण असून सुद्धा नोकरी लागते आणि तुम्हाला नकार मिळतो.
मित्रांनो विचार करा एवढ्या सगळ्या अपयशा नंतर आपण काय करू. मला वाटते, ९९% लोक म्हणतील आम्ही आयुष्यात हरलो, आता आम्हाला नवीन काही करायचे नाही. पण जॅक मा हे थांबले नाहीत प्रयत्न करीत राहिले म्हणूनच आज ते चीन मधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि जगातल्या २० श्रीमंतांच्या यादीत त्यांचा नंबर लागतो आणि त्यांच्या संपत्तीत ४० बिलियन डॉलर्स म्हणजे अंदाजे ३ लाख कोटी रुपये एवढे आहे.
जॅक मा यांचा जन्म चीन मध्ये १५ ऑक्टोबर १९६४ रोजी एक गरीब घरात झाला. त्यांना एक मोठा भाऊ आणि छोटी बहीण होती. १९७२ साली त्याकाळचे असलेले चीन चे जे राष्ट्रपती होते ते त्यांच्या शहरात आले आणि त्यामुळे त्यांच्या शहराचं नाव झालं आणि मग ते शहर पर्यटन स्थळ झाले. जॅक मा यांना इंग्लिश शिकायची खूप आवड होती त्यांचे शहर पर्यटन स्थळ झाल्या मुळे तिथे बाहेरून देशातून पर्यटक यायला लागले. तेव्हा जॅक मा १३ वर्षाचे होते. मग जॅक मा यांनी फ्री मध्ये guide चे काम करायला सुरुवात केली म्हणजे त्यांना इंग्लिश बोलता येईल आणि मग ते पर्यटकाबरोबर तुटक फूटक इंग्लिश बोलत.
असं करत करत ते अस्सल इंग्लिश बोलायला लागले. त्यांनी हे काम ९ वर्ष केले. जॅक हे नाव त्यांना त्यांच्या एका पर्यटक मित्रानेच दिले होते. जॅक ह्यांचे खरे नाव मा युन हे आहे, जे लोकांना बोलायला त्रास व्हायचा. बरेच अपयश पचवल्या नंतर जॅक यांनी आपल्या शहरातल्या एकदम कमी नाव असलेल्या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे अनेक ठिकाणी नोकरी साठी प्रयत्न केला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मग शेवटी त्यांनी त्यांच्या शहरात एक विद्यापीठात एका इंग्लिशच्या शिक्षकाची नोकरी महिना १२$ च्या पगारावर स्वीकारली.
Guide चे काम त्यांनी ९ वर्ष केल्यामुळे त्यांच्या बाहेरच्या देशातले बरेच मित्र झाले होते असेच अमेरिकेच्या एक मित्राच्या मदतीने जॅक मा १९९५ साली अमेरिकेला गेले. तिथे त्यांनी पहिल्यांदा internet हा शब्द ऐकलं त्यांच्या मित्रांनी त्यांना कॉम्प्युटर चालवायला सांगितले तेव्हा ते कॉम्प्युटरला हाथ लावायला सुद्धा घाबरत होते. मग त्यांनी कॉम्प्युटर वर पहिला शब्द बिअर हा टाकला तेव्हा त्यांना बिअर शब्दाबद्दल अनेक देशातली माहिती मिळाली पण चीन बद्दल त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्यांनी चीन बद्दल दुसरी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला पण चीन बद्दल त्यांना इंटरनेट वर कसलीच माहिती मिळाली नाही. ते इंटरनेटमुळे खूपच प्रभावित झाले मग त्यांनी विचार केला कि त्यांच्या देशातले सगळे मध्यम व्यवसाय इंटरनेटला जोडणार.
मग ते चीन मध्ये परत आले आणि त्यांनी त्यांच्या बायकोबरोबर मिळून एक china yellow pages हि वेबसाइटकाढली, ज्याचे काम होते मध्यम व्यवसायासाठी बनवणे. पण ह्या साईटला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि काही वर्षानंतर हा व्यवसाय सुद्धा बंद करावा लागला. पण ह्यावेळेस सुद्धा जॅक मा यांनी हार मानली नाही आणि परत आपल्या पत्नी आणि मित्रांसोबत एक वेबसाइट काढली अलीबाबा ह्याची संकल्पना अशी होती कि एक्सपर्टस त्यांची उत्पादने ह्या साईट वर टाकू शकत आणि ग्राहक थेट ती उत्पादने विकत घेऊ शकत म्हणजे मधले जे रिटेलर्स असतात त्यांना बाजूला केले.
पहिले ३ वर्ष त्यांनी ह्या कंपनी मधून काहीच पैसे कमावले नाहीत पण १९९९ साली २ मोठ्या कंपनीने अलीबाबा मध्ये २५ मिलियन डॉलर्स ची investment केली आणि २००५ साली yahoo ने अलीबाबा चे ४०% shares विकत घेऊन १ बिलियन ची investment केली जे जॅक मा यांच्या साठी खूप मोठे यश होते.
बघता बघता जॅक मा यांनी अमेरिकेची e commerce असलेली कंपनी ebay यांना आपल्या कंपनी मधून बाहेरचा रस्ता दाखवला. नंतर २०१४ साली अलीबाबा चा IPO मार्केट मध्ये आला जो google पेक्षा सुद्धा मोठा होता. नंतर जॅक मा चीन मधले सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आणि जगातल्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या २० जणांच्या यादीत जाऊन बसले.
मला वाटते आपल्या सगळ्यांसाठी जॅक मा यांचा एक गुण घ्या सारखा आहे कितीही अपयश आले तरीही हार नाही मानायची, काही चुकले तर बघायचे त्यात सुधारणा करायची आणि नवीन प्रयत्न करायचा.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Jack ma biography in Marathi | Information about jack ma in marathi | जॅक मा) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा: ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे
हे देखील वाचा: ब्लॉगिंग करण्याचे 12 फायदे काय आहेत?
1 thought on “Jack ma biography in Marathi | Information about jack ma in Marathi | जॅक मा”