Virat Kohli Information in Marathi | कर्णधार विराट कोहली यांचा जीवन परिचय

विराट कोहली जीवन परिचय । Virat Kohli Biography in Marathi

Virat Kohli Information in Marathi: विराट कोहली, यांना कोण नाही ओळखत? विराट हे भारतीय क्रिकेट संघाचे एक दिग्गज खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेट संघामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर संघाला मजबुती देण्याचे काम विराटने केले आहे. भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वात एक वेगळी छाप विराटने सोडलेली आहे. विराटने त्याच्या क्रिकेटमधून प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली आहे.
विराटला भारतीय क्रिकेटचा पाठीचा कणा म्हणून संबोधले जाते. विराट हा Right handed बॅट्समन आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावशाली असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. सध्याच्या काळात विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो युवा पिढीला स्टाईल आयकॉन देखील आहे.

विराट कोहली जीवन परिचय । Virat Kohli personal information in Marathi

पूर्ण नाव (Name): विराट प्रेम कोहली
जन्म (Birth Date): 5 नोव्हेंबर 1988
जन्म स्थळ (Birth Place): दिल्ली
टोपणनाव (Nickname) : चिकू
आई (Mother) : सरोज कोहली
वडील (Father) : प्रेमजी कोहली
पत्नी (Wife) : अनुष्का शर्मा कोहली (बॉलिवूड अभिनेत्री)
मुलगी (daughter) : वामिका कोहली

विराट कोहली विषयी माहिती – Virat Kohli Information in Marathi

Virat kohli with father prem kohli
Virat kohli with father prem kohli

भारतीय क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू विराट कोहली याचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील म्हणजे प्रेमजी कोहली हे एक क्रिमिनल ऍडव्होकेट होते तर त्यांच्या आई सरोज प्रेमजी कोहली या साधारण गृहिणी होत्या. याशिवाय विराट कोहली याचा मोठा भाऊ विकास आणि एक मोठी बहीण भावना देखील आहे.

तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा विराट कोहली फक्त तीन वर्षांचा होता तेव्हा त्यांच्या खेळण्यांमध्ये क्रिकेटची बॅट देखील होती. जसे जसे विराटचे वय वाढत गेले तस तसे त्याची क्रिकेटमधील आवड ही समोर येत गेली.

विराटच्या वडिलांनी सुरुवातीलाच विराटची क्रिकेटमधील आवड ओळखली होती. त्यामुळे ते विराटला दररोज क्रिकेट ट्रेनिंगसाठी घेऊन जात असे.

Virat kohli with family members
Virat kohli with family members

विराट कोहली शिक्षण – Virat Kohli Education

विराट कोहली याचे सुरुवातीचे शिक्षण हे विशाल भारती पब्लिक स्कुल दिल्ली येथे झाले. शिक्षणात विराट सरासरी विद्यार्थी होते परंतु त्यांचे लक्ष कायम क्रिकेटकडे असायचे. ज्यामुळे मात्र 9 वर्षाच्या वयात विराट कोहली याचे ऍडमिशन त्याच्या वडिलांनी क्रिकेट क्लब मध्ये केले. याचे कारण एकच होते जेणेकरून क्रिकेटमधील ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्याला समजायला हव्यात.

सुरुवातीपासून विराटचे लक्ष हे क्रिकेटकडे होते. फक्त खेळात रुची असल्याने त्यांनी मात्र 12 वी पर्यंत शिक्षण घेतले आणि पुढे संपूर्ण वेळ हा क्रिकेटसाठी देऊ लागला. विराट कोहली यांना दिल्लीत असताना क्रिकेट, हे राज कुमार शर्मा यांनी शिकवले तर सुमित डोंगरा नावाच्या एका अकॅडमी मध्ये त्यांनी पहिली मॅच खेळली.

विराट कोहली यांचे करियर – Virat kohli Cricket career

Virat Kohli Career
Virat Kohli Career

विराट कोहली हा Right handed Batsman आहे. त्याने 2002 या वर्षी अंडर-15 स्पर्धा खेळलेली आहे. त्यानंतर 2006 या वर्षी विराटची निवड ही अंडर 17 संघासाठी झाली. त्यानंतरच्या काळात त्यांच्या खेळण्याच्या शैलीत खूप सारे बदल बघायला मिळाले. पुढे 2008 साली त्याची निवड अंडर 19 प्रतियोगीतेसाठी देखील करण्यात आली.

विराट कोहली यांनी अंडर 19 मध्ये मलेशिया विरुद्धच्या सामन्यात भारताला विजय प्राप्त करून दिला होता. त्यानंतर विराटची निवड ही वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी झाली. विराटने ही मॅच श्रीलंका संघविरोधी खेळली होती. त्यानंतर त्यांना 2011 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली व भारताने हा विश्वचषक जिंकला.

त्यानंतर विराट एकापाठोपाठ एक सामने खेळत गेले व त्यांची गणना ही सगळ्यात चांगल्या बॅट्समन मध्ये केली जाऊ लागली. सध्याच्या काळात ते क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत.

विराट कोहली यांचे वनडे इंटरनॅशनल करियर – Virat kohli OneDay Match Career

Virat Kohli cricket career information in Marathi
Virat Kohli cricket career information in Marathi

विराट कोहली यांनी 2011 साली टेस्ट मॅच मध्ये आपली जागा कायम केली होती. त्यानंतर त्याने वनडे क्रिकेट मध्ये 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. या काळात त्यांना सलग दोन मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु त्या गोष्टीने ते खचले नाही. त्याशिवाय त्यांनी या सामन्यांत पराभवातून काही तरी शिकून पुढील मॅच मध्ये 116 रानांची एक उत्कृष्ट खेळी केली. ही मॅच ते भारताला जिंकवू शकले नाही परंतु त्या मॅच मध्ये शतक करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू बनले.

इतकेच नाही तर पुढे कॉमनवेल्थ बँक ट्रायअँग्यूलर सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंके विरोधात 7 पैकी 2 मॅच मध्ये विजय संपादित केला. या मालिकेच्या फायनल मध्ये जाण्यासाठी श्रीलंकेविरोधात 321 रानांचे टार्गेट होते तेव्हा विराट कोहलीने 133 रन करून भारताला विजय मिळवून दिला होता. विराट या सामन्यात मैन ऑफ द मॅच देखील बनले होते.

विराट कोहलीच्या सततच्या उत्तम प्रदर्शनामुळे एकामागून एक खेळायच्या संधी मिळत गेल्या. 2012 साली त्यांना एशिया कप मध्ये उपकप्तान हे पद देखील मिळाले. याच काळात विराटला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्याची गोष्ट केली गेली. जर पुढे देखील विराटने असे प्रदर्शन ठेवले तर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तो दावेदार आहे. पुढे जाऊन विराट कोहली भारतीय संघाचे कर्णधार बनले.

पाकिस्तान विरोधात एका वन डे मॅच मध्ये त्यांनी 148 चेंडू मध्ये 183 रन बनवले. या सामन्यात देखील विराट कोहली हे मॅन ऑफ द मॅच बनले.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये विराट कोहलीचे करियर – Virat Kohli IPL Career

Virat Kohli IPL Career information in Marathi
Virat Kohli IPL Career information in Marathi

विराट कोहली यांनी 2008 मध्ये आयपीएल चा पहिला सामना खेळला होता. त्या काळात विराट कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाने 20 लाख रुपये देऊन विकत घेतले होते. तेव्हा त्यांनी 13 मॅच मध्ये 15 च्या सरासरीने 165 रन बनवले होते.

2009 साली त्यांनी RCB संघाला आयपीएल फायनल मध्ये पोहोचवले होते. त्या वेळी अनिल कुंबळे यांनी विराटची खूप प्रशंसा केली होती. परंतु तोपर्यंत भारतीय संघात विराटची जागा पक्की झालेली नव्हती.

2014 मध्ये विराटचे आयपीएल प्रदर्शन तितके काही खास नव्हते. मात्र 37 च्या एव्हरेज ने रन बनवले. या काळात महेंद्रसिंग धोनी ने निवृत्ती घेतल्यामुळे भारतीय टेस्ट संघाची धुरा ही विराटच्या खांद्यावर आली.

कर्णधारची भूमिका विराट यांनी अगदी चोख पणे पार पडली. त्यानंतर विराट संघाला मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करायला लागले. त्यानंतर 2015 मध्ये विराट 500 रानांचे रेकॉर्ड तोडण्यास यशस्वी झाले.

2016 मध्ये विराट कोहली यांनी एशिया कप आणि टी20 मध्ये भारतासाठी आणि आयपीएल मध्ये RCB संघासाठी खूप चांगले प्रदर्शन केले. त्याकाळात विराटच्या खेळण्याची पद्धत लोकांना आवडायला लागली आणि त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. आयपीएल 2018 मध्ये त्यांना जवळपास 18 करोड या किंमतीत विकत घेतले गेले.

याशिवाय विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये अनेक जबरदस्त खेळी करत अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर कोरले आहेत. काही सामन्यांमध्ये विराटला पराभवाचा स्वीकार देखील करावा लागला आहे.

संपूर्ण जगात फक्त 8 असे खेळाडू आहेत ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये 20 पेक्षा जास्त शतक केले आहेत. त्या 8 खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहलीचे नाव देखील आहे. सचिन तेंडुलकर यांच्या नावावर असलेला सर्वात जलद 20 शतक करण्याचा रेकॉर्ड हा विराटने मोडला आहे.

इतकेच नाही तर भारतीय क्रिकेट विश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर, महेंदसिंग धोनी आणि सौरभ गांगुली यांच्या नंतर विराट कोहली हे वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सलग 3 वर्षे 1000 पेक्षा जास्त रन बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथे खेळाडू बनले.

विराट कोहली 1000, 3000, 4000 आणि 5000 रनांचा रेकॉर्ड बनवणारे सर्वात जलद भारतीय क्रिकेटपटू आहे. यासोबत व्यु रिचर्ड यांच्या सॊबत ते 5000 रन सर्वात लवकर बनवणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत.

विराट कोहली रेकॉर्डस् – Virat Kohli Records

1) वर्ष 2011 मध्ये वर्ल्ड कप मध्ये शतक
2) मात्र 22 वर्षात ODI मध्ये 1000 रन बनवणारे तिसरे भारतीय खेळाडू
3) ODI क्रिकेटमध्ये 1000, 3000, 4000 आणि 5000 रन सर्वात जलद बनवणारे पहिले भारतीय खेळाडू
4) 2013 मध्ये जयपूर मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात मात्र 52 चेंडू मध्ये शतक
5) ODI मध्ये 7500 रन सर्वात फास्ट बनवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू

विराट कोहली पुरस्कार – Virat kohli Awards

Virat kohli Awards information in Marathi
Virat kohli Awards information in Marathi

विराट कोहली सध्या खूप मोठ्या स्तरावर पोहोचले आहेत. विराटची या स्तरावर पोहोचण्यासाठी खूप संकटांची झुंज लक्षात घेण्याजोगी आहे. विराट अनेक वादांमध्ये देखील अडकलेले आहेत. क्रिकेटमधील विराटच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
• 2012 – पीपल चॉइस अवॉर्ड फॉर फेवरेट क्रिकेटर
• 2012 – आयसीसी ओडीआय प्लेयर ऑफ द इयर अवॉर्ड
• 2013 – अर्जुन अवॉर्ड फॉर क्रिकेट
• 2017 – सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ द इयर
• 2017 – पद्मश्री अवॉर्ड
• 2018 – सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी

विराट कोहली विवाह – Virat Kohli Marriage

Virat Kohli Marriage
Virat Kohli Marriage

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विराट कोहली यांचा विवाह हा 2017 साली झाला आणि काही दिवसांपूर्वीच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
याशिवाय विराट कोहली त्यांच्या लुक्स साठी कायम चर्चेचा विषय असतात. मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हा विराट कोहलीच्या लूक ला फॉलो करत असतो. इतकेच नाही तर विराट कोहली त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत खुप गंभीर असतात.

मित्रांनो मला आशा आहे Virat kohli information in Marathi हा लेख वाचून तुम्हाला टीम इंडियाचा सुपर हिरो कर्णधार विराट कोहली यांच्या जीवन परिचयाबद्दल थोडी फार माहिती मिळाली असेल.

तर तुम्हाला या Virat Kohli Biography in Marathi या लेखामधील काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील किव्हा तुम्हाला अजून काही आम्हाला Suggestions द्यायच्या असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

अखेरीस विराट अशाच प्रकारे क्रिकेट विश्वात रेकॉर्डस् मोडत राहील आणि भारतीय क्रिकेट संघाचे नाव उज्वल करेल हीच आशा!

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment