Best Marathi Ukhane For Pooja | पूजेसाठीचे काही खास मराठी उखाणे 2024

Best Marathi Ukhane For Pooja | पूजेसाठीचे काही खास मराठी उखाणे 2024

Best Marathi Ukhane For Pooja: लग्न सभारंभ झालं कि येते पूजा, आणि सण मग काय तेच तेच लग्नाचे उखाणे घेण्यात काही मजा नाही आणि हीच तर वेळ असते आपल्या सासरच्या घरातल्या लोकांना प्रभावित करण्याची. लग्न झाले कि सत्यनारायणाची पुजा तर आपल्या महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी होते. आणि म्हणून आजच्या या लेखात आम्ही घेऊन आलो आहे Satyanarayan Pooja Ukhane in Marathi.

Satyanarayan Pooja Marathi Ukhane

Satyanarayan Pooja Marathi Ukhane
Satyanarayan Pooja Marathi Ukhane

श्रावणात, आकाशात कडकडतात विजा…
__रावांसोबत करते,  सत्यनारायण पूजा

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी
__ रावांचे नाव घेते,सत्यनारायण पूजेच्या वेळी

भरजरी साडी, जरतारी खण…
__रावांचे नाव घेते, आहे__चा सण

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__च्या दिवशी, दारावर बांधले तोरण
__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

उगवला सूर्य, मावळला शशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

Marathi ukhane for Satyanarayan Pooja

Marathi ukhane for Satyanarayan Pooja
Marathi ukhane for Satyanarayan Pooja

लक्ष्मीनारायणाच्या पायांशी
सोन्या मोत्याच्या राशी
…रावांचे नाव घेते सत्यनारायण
पूजेच्या दिवशी

महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी,
…रावांचे नाव घेते सत्यनारायण
पूजेच्या दिवशी

हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी, …
रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी

हरतालिकेला करतात पूजा
करतात महादेवाची,
…रावांचे नाव घेते आज
पूजा आहे सत्यनारायणाची

धनत्रयोदशीला पूजा
करतात ऐश्वर्य व धनाची,
… रावांचे नाव घेते आज
पूजा आहे सत्यनारायणाची

कोणत्याही पूजेसाठीचे मराठी उखाणे | Marathi Ukhane for Puja

__ची आरास, सर्वांना पडली पसंत
__रावांमुळे फुलला, जीवनी वसंत

__च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर

__पुढे मांडले, प्रसादाचे ताट
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट

__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी

_च्या समोर, ठेवले केशरी पेढे
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे

__च्या पुढे, फुलांचे सडे
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!

Best Marathi Ukhane for Pooja

Best Marathi Ukhane for Pooja
Best Marathi Ukhane for Pooja

__पुढे लावली, समईची जोडी
__ मुळे आली, आयुष्याला गोडी

__ची पूजा, मनोभावे करते
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते

__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

आला आला __चा, सण हा मोठा
__राव असताना, नाही आनंदाला तोटा

मोत्यांची माळ, सोन्याचा साज
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

इज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
….. चे नाव घेते …. च्या दिवशी

दत्तदिगंबराला औदुंबराची सावली, पूजेच्या दिवशी नाव घेते,
……. रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

सत्यनारायण पूजा उखाणे

आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
—-नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण

….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन
…..माझा हीरो मी त्याची हिरॉईन

नाकात नथ..पायात जोडवी..
पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….
कानात कुड्या….हातात पाटल्या..
बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….
नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली…
.भांगात कुंकू….हातात तोडे….
गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….
साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….
आणि …. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
…….नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी

श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती
__रावांच्या संसारात, मिळो सुखशांती

Satyanarayan Pooja Ukhane

भर श्रावणात, पाऊस आला जोरात
__रावांचे नाव घेते, __च्या घरात

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा
__रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा

श्रावणात येई, पावसाला जोर
__राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर

श्रावणात बरसतात, सरींवर सरी
__ रावांचे नाव घेते __ ही बावरी

__च्या __ला, आली खूपच धमाल
__रावांच्या कल्पकतेची, आहे सगळी कमाल

तर तुम्हाला Best Marathi Ukhane For Pooja च्या लेखात दिलेले पूजेसाठीचे मराठी उखाणे व Satyanarayan Pooja Ukhane कसे वाटले कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कडे सुद्धा काही असेच Satyanarayan Pooja Ukhane in Marathi असतील तर ते कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.

 

हे उखाणे देखील नक्की वाचा

Griha pravesh Ukhane

Marathi Ukhane for Male

Vat Purnima Marathi ukhane

Ukhane in marathi for female

Sasu Suneche Best Marathi Ukhane

Saartha Shri Satyanarayana Puja & Story

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment