Raigad Fort information in Marathi | मराठा साम्राज्याची राजधानी किल्ले रायगड

Information about Raigad Fort in Marathi | मराठा साम्राज्याची राजधानी किल्ले रायगड

Information about Raigad Fort in Marathi
Information about Raigad Fort in Marathi

किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग! मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. 1674 मध्ये हाच किल्ला मराठा साम्राज्याची म्हणजेच स्वराज्याची राजधानी बनला.

सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला श्रीमान किल्ले रायगड हा समुद्रसपाटीपासून 820 मीटर अंतरावर आहे. गडाला एका बाजूने सरळ चढाई असलेला परंतु पायी जाऊ शकतो असा मार्ग आहे तर इतर सर्व बाजूनी किल्ला उंचच उंच ताशीव कड्यांनी बनलेला आहे.

Raigad Fort History in Marathi | रायगड किल्ल्याचा इतिहास

Raigad Fort History in Marathi
Raigad Fort History in Marathi

श्रीमान किल्ले रायगडाची निर्मिती ही 1030 साली चंद्रराव मोरे यांनी केलेली आहे. त्या काळात हा किल्ला “रायरी चा किल्ला” या नावाने प्रसिद्ध होता. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राचीन मौर्य वंशाच्या चंद्रराव मोरे यांच्याकडून किल्ला हस्तगत केला.

रायगड किल्ल्यांची पुन्हा बांधणी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराजांनी रायरीच्या किल्ल्याचा विस्तार केला आणि पुढे यालाच रायगड असे नाव दिले. रायगड म्हणजे राजीयांचा गड होय! मराठा साम्राज्यातील बलाढ्य बुलंद आणि बेलाग असा हा रायगड स्वराज्याची राजधानी बनला.

1698 मध्ये झुल्फिकारखान व औरंगजेबाने रायगड किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतल्यानंतर त्याचे नामकरण ‘इस्लामगड’ असे केले.

1765 मध्ये ब्रिटिशांनी चालवलेल्या नासधुशीमध्ये या किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे लक्ष बनला. अखेरीस 9 मे 1818 रोजी ब्रिटिशांनी कब्जा मिळाल्यानंतर गडावर लुट केली व सर्व वास्तू उध्वस्त केल्या.

Top Attractions of Raigad Fort in Marathi | रायगड किल्ल्यावरील आकर्षण

Top Attractions of Raigad Fort in Marathi
Top Attractions of Raigad Fort in Marathi

सुंदरतेने नटलेल्या किल्ल्यावर गंगासागर तलाव आहे. गडावर एक प्रसिद्ध वास्तू देखील आहे, त्यालाच हिरकणीचा बुरुज म्हणून ओळखले जाते.

रायगडाच्या आतमध्ये अनेक आकर्षण आहेत जसे नगारखाना दरवाजा, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा , टकमक टोक. पालखी दरवाज्याच्या डाव्या बाजूला 3 अंधाऱ्या कोठड्या आहेत त्यांना गडावरील दाण्याची कोठारे म्हणले जाते.

मुख्य बाजारपेठेच्या समोर महाराजांची सिंहसनाधीश मूर्ती आपल्याला बघायला मिळते. गडावर जगदीश्वराच्या देवळाकडे जाणार मार्ग इथूनच म्हणजे होळीच्या माळावरून आहे. महाराजांची समाधी आणि त्यांच्या विश्वासू वाघ्या कुत्र्याची समाधी देखील आपल्याला इथे बघायला मिळते. महाराजांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांची समाधी गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी आहे.

किल्ल्यावरील इतर आकर्षण म्हणजे हत्ती दरवाजा, गोमुखी महादरवाजा, चिलखती बुरुज,नाणे दरवाजा हे आहेत.

How to Reach Raigad Fort in Marathi | किल्ले रायगडावर कसे पोहोचणार?

श्रीमन किल्ले रायगड महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील महाड येथे स्थित आहे. रायगड किल्ल्यावर पोहोचायला सरळ वाटा नाहीत.

रायगड वरून एखादी गाडी तुम्हाला मिळेल जी पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी माँसाहेब जिजाऊंच्या समाधीजवळ पोहोच करेल. एकदा तुम्ही पाचाडला पोहोचायचे. गडावर जाण्यासाठी तुम्हाला रोप वे चे देखील सुविधा आहे. रोपवेच्या साहाय्याने तुम्ही अगदी 5 मिनिटात गडाच्या माथ्यावर पोहोचता.

Raigad Fort Ropeway information in Marathi | किल्ले रायगड रोपवे

Raigad Fort Ropeway information in Marathi
Raigad Fort Ropeway information in Marathi

जे लोक ट्रेकिंग करू शकत नाही किंवा ज्यांना ट्रेकिंग मध्ये आनंद भेटत नाही त्यांच्यासाठी ही रोपवेची व्यवस्था आहे. या प्रवासात जवळपास 750 मीटर लांबी आणि 400 मीटरची चढाई आहे. हा प्रवास रोपवेच्या मदतीने अगदी 4 ते 5 मिनिटात होतो.

Best time to visit Raigad Fort | किल्ले रायगडाला भेट देण्याचा सर्वात योग्य कालावधी

रायगड किल्ल्याला भेट देण्याचा कालावधी हा नोव्हेंबर ते मार्च हा असतो. या भागात थंडी जास्त नसल्याने आपल्याला वातावरण चांगले भेटते आणि ट्रेकिंग मध्ये मजा येते.

Raigad Fort Architecture | किल्ले रायगडाचे स्थापत्यशास्त्र

सध्याच्या काळात महाराजांची समाधी वगळता राजदरबार आणि जगदीश्वराचे मंदिर हेच चांगल्या स्थितीत आहेत. यांची देखील पडझड ही झालेली आहे. इतर सर्व वास्तू या मोडकळीस आलेल्या आहेत.

जगदीश्वराचे मंदिर आजही सुस्थितीत असून किल्ल्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांच्या कार्याची ओळख देणारी “ सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर” ही पायरी आहे.

राणी महालाचे काही अवशेष म्हणजे चौथरे फक्त शिल्लक आहेत. त्याच्याकडे बघून असे कळते की सहा खोल्या तिथे होत्या व प्रत्येक खोलीला जोडून एक शौचकूप देखील होते. मुख्य महाल हा देखील कदाचित लाकडाचा बनवलेला असावा असे वाटते. गडावर आजही मोडकळीस आलेल्या वास्तू पर्यटकांना आणि विशेषतः शिवप्रेमींना आकर्षित करत असतात.

श्रीमान किल्ले रायगड फक्त किल्ला नाहीये तर ते एक श्रद्धास्थान म्हणजेच पवित्र स्थळ आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी साकारलेल्या स्वप्नाची भव्यदिव्यता दर्शवते.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Chatrapati Shivaji Maharaj Status in Marathi

Shiv jayanti Wishes In Marathi 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Raigad Fort information in Marathi | मराठा साम्राज्याची राजधानी किल्ले रायगड”

Leave a Comment