Marathi Ukhane For Female | नवरीचे उखाणे / Navariche Ukhane 2020 | Ukhane in Marathiरुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
--------- रावांना भरविते मी प्रेमाचा घास


तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
------रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात


हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
------ रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत


एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
------ रावांची सारी माणसे मी आपली मानली


सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
------ रावांचे नाव घेते ------ ची सून


काढ्यात काढा पाटणकर काढा,
------ रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा


अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
-------- रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना


सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
------- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी


Search For : ukhane, marathi ukhane for female, marathi ukhane for male, marathi ukhane app, ukhane in marathi, comedy ukhane marathi

देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
----- रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश


अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ------- रावांची सौभाग्यवती


झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
----- राव सुखी रावो हीच आस मनाची


सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
------ रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात


जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
------ रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद


शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
------ रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता


सासरच्या कौतुकात राहील नाही काळाच भान,
------ रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान


प्राजक्ताच्या फुलांनी भरले अंगण,
------ रावांचे नाव घेऊन सोडले काकण


आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
------रावांना भरविते जिलेबिचा घास


मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
------ रावांनी दिला सौभाग्याचा आहेर


इन्द्रधनुष्य दिसतो, जेव्हा असतं पावसात ऊन,
------ रावांचे नाव घेते------ ची मी सुन


सोन्याची अंगठी रुप्याचे पैंजण,
------रावांचे नाव घेते ऐका सारेजण


लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
------रावांचे नाव घेण्यास आजपासुन करते सुरवात


मनाच्या वृन्दावनात भावनेची तुळस,
------रावांचा संसार हा सुखाचा कळस


आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहूल,
------ रावांच्या जोडीने संसारात टाकते पाऊल


मानसरोवरात राजहंस मोती भक्षी,
------राव आणि माझ्या विवाहाला अग्निनारायण साक्षी


मटणाचा रस्सा केला वाटण घालून घोटून,
---- राव बसले रुसून मग मीच खाल्ला चाटून पुसून


1 2 3 4 »

You May Also Like